Jump to content

आर. माधवन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आर. माधवन
आर. माधवन
जन्म आर. माधवन
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय

आर. माधवन (तमिळ: ஆர்.மாதவன் ; रोमन लिपी: R. Madhavan ;), जन्मनाव माधवन रंगनाथन (रोमन लिपी: Madhavan Ranganathan ;), (जून १, इ.स. १९७०; जमशेदपूर, झारखंड, भारत - हयात) हा तमिळ चित्रपटसृष्टीतील नामांकित अभिनेता आहे. तमिळ चित्रपटांशिवाय त्याने काही कन्नड, हिंदी, तेलुगू, इंग्लिशमलय भाषांतील चित्रपटांतूनही भूमिका साकारल्या आहेत.

कारकीर्द

[संपादन]

चित्रपट

[संपादन]

माधवनने १९९६मध्ये इस रातकी सुबह नहीं या चित्रपटातील छोट्या भूमिकेपासून आपली कारकीर्द सुरू केली. मणिरत्नमच्या अलै पयुतेय या चित्रपटात त्याला पहिली मोठी भूमिका मिळाली. २०००पर्यंत अनेक यशस्वी तमिळ चित्रपटांतून कामे केल्यानंतर त्याने हिंदी चित्रपटांतून भूमिका करणे सुरू केले. त्याच्या रंग दे बसंती, गुरू आणि थ्री इडियट्स या चित्रपटांना प्रचंड यश मिळाले. यांतील ३ इडियट्स हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट झाला.[] २०११-१२मध्ये तनू वेड्स मनू आणि वेट्टाई या यशस्वी चित्रपटांनातर त्याने ३ वर्षे कामातून तात्पुरती निवृत्ती घेतली. २०१५मध्ये पुन्हा काम सुरू केल्यावर त्याने काम केलेले तीन चित्रपट तनू वेड्स मनू रिटर्न्स, इरुदी सुत्रू आणि विक्रम वेदा हे सुद्धा यशस्वी झाले.[][]

यांशिवाय माधवनने मुंबई मेरी जान, सिकंदर, हिसाब बराबर आणि केसरी चॅप्टर २ या चित्रपटांतूनही काम केले.

दूरचित्रवाणी

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]


संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "PK, Dhoom 3, Kick: Bollywood's 10 Biggest Blockbusters Ever". Rediff desk. Rediff. 5 January 2015. 24 November 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 28 November 2015 रोजी पाहिले.
  2. ^ "Tanu Weds Manu Returns - Movie - Box Office India".
  3. ^ "VIKRAM VEDHA becomes R Madhavan's biggest Tamil blockbuster! – Trade News". BollywoodTrade.com. 17 August 2017. 20 September 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 22 January 2018 रोजी पाहिले.