तापी नदी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
हा लेख महाराष्ट्रातून वाहणारी 'तापी नदी' याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, तापी.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| तापी | |
सुरत जवळील तापी नदी |
|
| अन्य नावे | ताप्ती |
| उगम | मुलताईजवळ ७४९ मी. |
| मुख | अरबी समुद्र |
| लांबी | ७२४ कि.मी. कि.मी. |
| देश | मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात |
| उपनद्या | पूर्णा, गिरणा नदी, वाघूर |
| पाणलोट क्षेत्र | ६५,१४५ किमी² |
| धरण | उकाई धरण, काकरापार धरण, हतनूर धरण |
तापी नदी ही भारताच्या पश्चिम भागातून वाहणारी नदी आहे. ही 'पश्चिमवाहिनी' नदी भारताच्या मध्य प्रदेश, महाराष्ट्र व गुजरात या राज्यांमधून वाहते. तापीच्या खोऱ्यात मध्यप्रदेशातील बेतुल जिल्हा, महाराष्ट्रातील विदर्भाचा पुर्व भाग, खानदेश, व गुजराथेतील सुरत जिल्हा समाविष्ट आहे.
अनुक्रमणिका |
[संपादन] उगम
तापी नदी मध्यप्रदेशातील बैतुल जिल्ह्यात मुलताईजवळ उगम पावते. या ठिकाणाचे संस्कृतातील मूळ नाव मूळतापी" आहे.
[संपादन] मुख
७२४ कि.मी. लांबीचा प्रवास केल्यानंतर तापी सुरत शहराजवळ खंबाटच्या आखातात अरबी समुद्राला जाऊन मिळते.
[संपादन] उपनद्या
- पूर्णा नदी
- शिवा नदी
- गोमाई नदी
- अरुणावती नदी
- वाकी नदी
- मोसम नदी
- बुराई नदी
- अनेर नदी
- गिरणा नदी
- पांझरा नदी
- वाघूर नदी
- कान नदी
- गिमा नदी
- तितुर नदी
- वाघुर नदी
- नळगंगा नदी
- निपाणी नदी
- विश्वगंगा नदी
- मास नदी
- उतवळी नदी
- विश्वामैत्री नदी
- निर्गुण नदी
- गांधारी नदी
- आस नदी
- वाण नदी
- मोरणा नदी
- शाहनूर नदी
- भावखुरी नदी
- काटेपूर्ण नदी
- उमा नदी
- पेंढी नदी
- चंद्रभागा नदी
- भुलेश्वरी नदी
- आरणा नदी
- गाडगा नदी
- सिपना नदी
- कापरा नदी
- खंडू नदी
- तिगरी नदी
- सुरखी नदी
- बुरशी नदी
- गंजल नदी
- आंभोरा नदी
- नेसू नदी
[संपादन] इतर
पौराणिक दाखल्यांनुसार तापीला सूर्यकन्या मानले जाते.
या नदीच्या नावावरून १९१५ साली थायलंड येथील एका मोठ्या नदीचे 'तापी' असे नामकरण केले गेले.
[संपादन] हेही वाचा
|
|||||||||||