प्रवरा नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्रवरा
इतर नावे अमृतवाहिनी
उगम रतनगड
मुख रत्नाबाईची गुहा
पाणलोट क्षेत्रामधील देश महाराष्ट्र
लांबी २०० किमी (१२० मैल)
उगम स्थान उंची ८५२ मी (२,७९५ फूट)
ह्या नदीस मिळते गोदावरी
उपनद्या मुळा, आढळा, म्हाळुंगी
धरणे भंडारदरा, निळवंडे

प्रवरा ही महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातून उगम पावणारी नदी आहे. हिला मुळा, आढळा, म्हाळुंगी या उपनद्या असून ही नदी पुढे गोदावरीला जाऊन मिळते.

प्रवरानदीच्या किनाऱ्यावर अकोले, संगमनेर, कोल्हार, नेवासा ही प्रमुख गावे आहेत. नदी रतनवाडीला उगम पावून गोदावरी नदीस मिळते. प्रवरा नदी भंडारदरा धरणापासून ते ओझरपर्यंत कालवा मानली जाते. तिथपासून नदीचे दोन कालवे निघतात संगमनेर,अकोलेश्रीरामपूर तालुक्यातील लोकांची जीवनदायी असलेल्या प्रवरा नदीला अमृतवाहिनी असेही म्हटले जाते. संगमनेर येथून निघून वाघापूर, जोर्वे असा प्रवास करून ओझर येथे धरणात तिचे पाणी अडविले जाते. या धरणातून निघणाऱ्या डाव्या व उजव्या कालव्यातून संगमनेर व श्रीरामपूर तालूक्यातील शेतीला पाणी दिले जाते.प्रवरा नदी प्रवरा संगम येथे गोदावरी नदीला मिळते.[ संदर्भ हवा ]

कालवे[संपादन]

कालव्याचे नाव डावा कालवा उजवा कालवा
लांबी (कि.मी.) ७७ ४५
क्षमता (घन मी./सेकंद) २६.३६ ६.८२
ओलिताखालील क्षेत्र (हेक्टर) ५९,६२५ २९,८६६
ओलिताखालील शेतजमीन (हेक्टर) ४०,०९० २३,६५०

धरणे[संपादन]

प्रवरा नदीवर भंडारदरानिळवंडे ही धरणे आहेत.

संदर्भ[संपादन]