सामना (वृत्तपत्र)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सामना
प्रकार दैनिक

प्रकाशक सुभाष देसाई,
प्रबोधन प्रकाशन
संपादक बाळ ठाकरे
व्यवस्थापकीय संपादक संजय राऊत
राजकीय बांधिलकी शिवसेना
भाषा मराठी
मुख्यालय भारत मुंबई, महाराष्ट्र, भारत

संकेतस्थळ: सामना.कॉम


सामना (वृत्तपत्र) हे भारताच्या मुंबई शहरातून प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र आहे.


२६ वर्षापूर्वी बाळासाहेबांनी शिवसेना पक्षाचे मुखपत्र काढण्याचे ठरवले. तेव्हाच त्यांनी ‘सामना’ हे शीर्षक ठरवले होते. हरिश केंची ज्यांनी सामना वर्तमानपत्रात काम केले त्यांच्यानुसार हे शीर्षक सामना हे नाव सोपे आहे. १९७४ साली जब्बार पटेल दिग्दर्शित चित्रपटाचे नाव सुध्दा सामना असल्याने ते मराठी जनमानसात रुजलेले होते. तसेच बाळासाहेबांनी विचार केल्याप्रमाणे हे शीर्षक आक्रमक होते. बाळासाहेबांनी कळाले की हे शीर्षकाची आधीच नोंद झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे राहणार्याा वसंत कानडे यांनी १९७५ साली हे शीर्षक नोंदवून ते स्वतः प्रकाशन चालवत होते. बाळासाहेबांना हेच शीर्षक आपल्या मुखपत्रास असावे अशी मनापासून होती आणि कानडे यांनी त्यांना मदत करावी अशी त्यांची मनोभावना होती. स्व. वसंत कानडे यांच्या पत्नी नर्मदा म्हणाल्या की अतिशय कठीण असा प्रसंग होता. कुठलेही पालक आपलं मुल कोणालाही द्यायला तयार होणार नाही. १२ ऑगस्ट १९८८ रोजी वांद्रे कोर्टात वसंत कानडे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना शीर्षक देताना म्हणाले की “माझे मुल मी तुम्हाला देत आहे काळजी घ्या”. वैभव पुरंदरे ज्यांनी ‘Bal Thackray and the Rise of Shivsena’ हे पुस्तक लिहिले त्यांच्यानुसार सामना म्हणजे ज्वलंत हिंदुत्वाचे पुरस्कार करणारे एकमेव मराठी दैनिक. चार पानी साप्ताहिक सामना १० ऑक्टोबर १९७५ साली नगरपालिकेच्या सभागृहात सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते प्रकाशित झाले. पहिल्याच अंकात एका चौकटीत मथळा दिला होता त्यानुसार कानडे यांनी प्रोग्रेसिव्ह मुस्लीम आकादमीच्या प्रा. नसीमा पठाण यांना सोलापूरहून पाठिंबा देण्याचे जाहीर केले. “नवीन प्रकाशन सुरू करतांना आम्हाला अतिशय आनंद होत आहे, आम्ही नियमितपणे नसीमा पठाण यांची बाजू या प्रकाशनाच्या माध्यमातून मांडू”. कृष्णधवल फोटो खाली कानडे यांनी सविस्तर विवेचन दिले होते. कानडे यांचे लिखाण वाचकांना राजकीय घडामोडींकडे आकर्षित करणारे होते. १९७० च्या दशकात सहा वर्षाहून अधिक कानडे यांनी माढा गावाचे सरपंचपदी म्हणून काम पाहिले. काँग्रेसमधल्या जिल्हा आणि तालुका पातळीवरील राजकीय प्रतिस्पर्धी ज्यांचा ग्रामीण महाराष्ट्रात वर्चस्व होते अशा लोकांबरोबर काम करताना त्यांच्या पत्रकारितेचे प्रतिबिंब दिसू यायचे. कानडे यांनी महाराष्ट्रातील दुष्काळ, अंधश्रध्दा, निरक्षर अशा अनेक विषयांवर लिखाण केले.  १९७९ साली कानडे माढाहून जवळच असलेल्या बार्शीमध्ये त्यांच्या पत्नीसह रहायला गेले. १९७४ साली कानडे यांनी नर्मदा यांच्याशी आई वडिलांच्या इच्छेविरोधात गुपचूप लग्न केले. नर्मदा माने म्हणतात की आमचा विवाह हा आंतरजातीय होता. त्यावेळेला पैसे आणि वेळेच्या कमतरतेमुळे सामना नियमितपणे प्रकाशित नाही करता आला. कानडे यांना आपल्या कुटुंबासाठी लहान मोठ्या दैनिकांत १००-१५० रू महिना काम करण्यास सुरूवात केली. नर्मदा माने यांनी १९७९ साली राज्य कृषी विभागात कनिष्ठ कारकून म्हणून नोकरी मिळवली. १९८० च्या मध्यात त्यांना लक्ष्मीराज आणि देवराज अशी दोन मुले झाली. अशा धकधकीच्या जीवनात सुध्दा आम्ही सुखी होतो. कानडे यांना पैशांची चिंता नव्हती आणि त्यांच पत्रकारितेवर प्रेम होते असे कानडे यांच्या पत्नी सांगतात. १९८८ साली ग्रामीण महाराष्ट्र शिवसेनेच्या प्रभावाखाली आला. त्यावर्षी माढा आणि बार्शीच्या स्थानिक शिवसैनिकांनी कानडेंना सांगितले की बाळासाहेब ’सामना विकत घेण्यास उत्सुक आहेत’ शिवसेनेतील ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी सोलापुरातील शिवसेनेचे नेते राम भटकळ यांना या गोष्टीचा पाठपुरावा करण्यास सांगितले. भटकळ यांनी कानडेंना मुंबईला जाऊन प्रत्यक्ष बाळासाहेबांची भेट घेण्याचे सुचवले. नर्मदा माने म्हणाल्या की “सामना शीर्षक त्यांना देऊन टाका. सर सलामत तो पगडी हजार”. कानडे यांनी तीन दिवस ठाकरे कुटुंबियांबरोबर घालवले. बाळासाहेबांनी मैत्रीपूर्ण वागणूक दिली. मीनाताईंनी खूप चांगला पाहुणचार केला. असे स्वतः नर्मदा माने म्हणाल्या. सामनाच्या बदल्यात तुम्हाला काय हवे असे बाळासाहेबांनी विचारले. तेव्हा हाडाचे पत्रकार कानडे यांनी सुध्दा सामनासाठी सोलापूर जिल्ह्यासाठी स्वतंत्र वार्ताहर असावा अशी मागणी केली. आणि बाळासाहेबांनी ती तात्काळ मान्य केली. कानडे हे जरी त्या वर्तमानपत्राचे नियमित कर्मचारी नसले तरी त्यांना प्रत्येक महिन्याला त्यांचे मानधन मिळत होते. (१) कानडे यांची लिखाणाची भाषा वेगळी होती. शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ ची भाषा वेगळी होती तरी बाळासाहेबांसाठी त्यांनी काम केले. बाळासाहेब म्हणतात की मराठी वाचक वर्ग हा भिन्न स्वरूपाचा आहे. बाळासाहेबांचे जात, स्त्रिया आणि इतर सामाजिक प्रश्नांवरील विचार अतिशय पुरोगामी होते. बाळासाहेबांना काँग्रेसचे महाराष्ट्रातून समूळ उच्चाटन करायचे होते. असे असून सुध्दा कानडे आणि बाळासाहेब यांच्यामध्ये मतभेत झाले नाही. (२) कानडे हे असे पत्रकार होते ज्यांनी लोकसत्ताच्या रूसी कारंजिया, सकाळ, संघाचे मुखपत्र तरूण भारत मध्ये सुध्दा काम केले. कानडे सामना साठी काम करताना बाळासाहेबांनी त्यांना हवे ते लिखाण करण्यासाठी आणि इतर प्रकाशनासाठी लिखाण करण्याची परवानगी दिली होती. कानडे यांनी सामना शीर्षक हस्तांतर केल्याबद्दल बर्यााच टीकांना सामोर जावं लागलं. १९९९ साली त्यांनी काढलेल्या नवीन साप्ताहिक ‘भ्रष्टाची चाहूल’ या प्रखर शब्दांत उत्तर दिल. त्यांनी लिहिल की ‘बरीच लोकं म्हणतात की मी सामना शीर्षक विकल जे खोटं आहे. मी एक रूपया सुध्दा त्याबद्दल घेतला नाही.” ते बार्शीच्या एस.टी स्टॅण्ड जवळ असलेल्या लहान घरातच राहण पसंत केले. १९९७ साली कानडेंना कॅन्सर रोगाने ग्रासलं. बार्शीच्या नर्गिस दत्त मेमोरियल हॉस्पिटलमध्ये नर्मदा मानेंनी त्यांचा इलाज केला. नर्मदा माने म्हणाल्या की कानडेंकडे काही महिन्यांचा अवधी आहे असे डॉक्टरांनी सांगितले, पण आम्ही दोघांनी यातुन जिंकण्याचा निर्धार केला होता. कानडेंनी सामना आणि इतर वृत्तपत्रांना कळवले की त्यांच्यात आता लिहिण्याची ताकद नाही.” १० ऑक्टोबर २००२ रोजी कानडे यांचा मॄत्यू झाला. २०१२ साली बाळासाहेब गेले तेव्हा विषण्णपणे सामनाने कानडेंना मानवंदना देताना म्हटले की शिवसेनेचे मुखपत्र सामना जे राजकीय आणि सामाजिक विषय नेमही आक्रमकपणे मांडले. वसंत कानडे ज्यांनी सामनाला जन्म दिला आणि बाळासाहेबांनी मोठं केलं ते दोघेही आज आपल्यात नाही.