आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकचे बोधचिन्ह
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचे सुटे भाग

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक हे अंतराळात बांधले जाणारे संशोधन केंद्र आहे. याचे बांधकाम १९९८ मध्ये चालू झाले.

१९९८ मध्ये अंतराळात पाठवलेले हे स्थानक २०११ पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित होईल, तेव्हा ते आतापर्यंत अंतराळात पाठवलेले सर्वांत मोठे स्थानक असेल. तेव्हा ते फुटबॉलच्या मैदानापेक्षाही मोठे असेल. जगभरातील सोळा देशांनी एकत्र येऊन हा प्रकल्प राबविला आहे.

तासाला २७,७२४ किलोमीटर एवढ्या प्रचंड वेगाने ते पृथ्वीला प्रदक्षिणा घालते; म्हणजे ९१ मिनिटांत एक प्रदक्षिणा पूर्ण होते.

पृथ्वीवरील गुरुत्वीय बदलामुळे येथे करता न येणारे प्रयोग या अंतराळ स्थानकात करण्यात येतात. वजन विरहीत अवस्थेमध्ये मनुष्याचे वास्तव्य किती दिवस वाढवता येईल, जेणेकरून मंगळावरील मोहिमेसाठी माणूस पाठवता येईल, याचा अभ्यास केला जात आहे.


वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये