Jump to content

विकिपीडिया:समाज मुखपृष्ठ/चहा

लघुपथ: विपी:चहा
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

साचा:Essay

’चहा पिणे’ म्हणजे लाक्षणिक अर्थाने एखादे पेय पिणे आणि विचारपूस करणे. एकत्र बसून चहा पिऊ या असे आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा चहाच पितो असे नाही, तर तिथे चहाच्या ऐवजी कॉफी किंवा सरबतपण असू शकते. उष्ण प्रदेशात असाल तर लिंबूसरबत, लस्सी किंवा तसलेच एखादे सुंदरपैकी शीतपेय घ्यायला काहीच हरकत नाही.

सुंदर चहाचा एक कप
बैठक

एकदा सुंदर चहाचा एक कप व बैठक जमली की एका सुसंवादाला सुरुवात होते. अशा बैठकीत बसलेल्या इतर सदस्यांशी चांगला परिचय होतो आणि प्रत्येकाचे समाजातील स्थान आणि त्याने समाजाला केलेले योगदान याची कल्पना येते. चांगल्या विषयांवरील गप्पांमधून सुजाणभाव निर्माण होतो. " जर तुम्ही काही चांगले बोलू शकत नसाल तर बोलूच नका ", असा आदर्शवाद मनात बाळगणारी माणसे, बैठकीत विवाद होऊच देत नाहीत.

चहापानावरचा हा लेख ज्यांना आवडेल त्यांनी लेखाच्या चर्चापानावर केवळ शुभेच्छा देऊन थांबू नये. त्याहीपलीकडे जाऊन जेव्हा अत्युच्च चांगुलपणाची गरज भासेल तेव्हा कुठलीही औपचारिकता न दाखवता आपला अभिप्राय नोंदवावा.

"मला वाटते की, अमक्या व तमक्याने विकिपीडियावर फारच मेहनत घेतली, पण........." असे सांगण्याची आपणास ऊर्मी आलीच तर आपण ’पण’पूर्वीच थांबा. चांगला अभिप्राय देण्यासाठी पण/किंतु/परंतु/तरीही असल्या शब्दापूर्वीच लेखणी आवरती घ्यावी असा अलिखित संकेत आहे. फक्त चांगल्या अभिप्रायाचाच भाग तेवढा आपल्या हातातून कागदावर किंवा संगणकाच्या पडद्यावर उतरू द्यावा.

अभिप्रायाचे आपले ओतणे/टाकणे झाले की, आपणास {{पर्याय:विकिचहा}} हा साचा चर्चा पानावर लावणे आवश्यक वाटेल. आणि मग सर्वांना बोलावून सांगू या की ’चहा तयार आहे.चला घेऊ या.’

साचा:Barnstarpages

बैठक व सुंदर चहाचा कप कशासाठी आहे

[संपादन]
  • ज्या योगदात्यांचे काय करावे असा आपल्याला सध्या प्रश्न पडला आहे, अशा आणि इतरही योगदात्यांबद्द्ल चांगल्या गोष्टी बोलण्यासाठी.
  • एखाद्या व्यक्तीविषयी वा तिच्या योगदानविषयी आपली पसंती जाहीररीत्या प्रगट करण्यासाठी.
  • इतर पानांवरील गरमागरम वादविवादांना इकडे वळविण्यासाठी.
  • रागावलेल्या लोकांच्या रागाला वाट करून देऊन त्यांना शांत करण्यासाठी.

बैठक व सुंदर चहाचा कप कशासाठी नाही

[संपादन]
  • विवाद सोडविणे.
  • मध्यस्थी व लवाद.
  • मुजोरी.
  • संकेतस्थळावर नव्यानेच आलेल्यास चावण्यासाठी.(नवोदिताची कातडी नवजात बालकाप्रमाणे फारच कोवळी व मऊ असते, चावावयास त्रास होत नाही).
  • टवाळखोरीसाठी.
  • पैजेसाठी
  • १००% सकारात्मक नाही अशा इतर कोणत्याही गोष्टीसाठी..

चला तर ! पाणी उकळले आहे. दूध किती? साखर किती?

[संपादन]

सप्टेंबर २००९

[संपादन]
नरसीकरांनी दिलेल्या चहाच्या आमंत्रणाकरिता धन्यवाद. मागील महिन्याभरात नरसीकरांनी अनेक ठिकाणी पानांवर येऊन खूपच उत्साहाने त्यांचा सहभाग नोंदवला. अहो नरसीकर, आपल्यासोबत बसून घ्यावयच्या चहाची लज्जत वाढावी म्हणून मी मारी बिस्किटे आणली आहेत. Mahitgar १५:४२, २९ सप्टेंबर २००९ (UTC)
चविष्ट मारी बिस्किटे

चहा चकली

[संपादन]

कोणा निनावी सदस्याने मला चहाचे निमंत्रण पाठवले म्हणून येथे चक्कर टाकली. मस्त चहासाठी धन्यवाद. आता रिकाम्या हाताने कसे यायचे? मग ही घ्या थोडी चकली!

अभय नातू १७:०९, १४ मार्च २०१० (UTC)

चहा चकली मारी बिस्किटे

[संपादन]
  • मलाही कोणा निनावी सदस्याने चहाचे निमंत्रण पाठवले म्हणून येथे आलो. धन्यवाद. चहा, चकली, मारी बिस्किटे यांचा आस्वाद घेताना मजा आली.

विनोद रकटे २३:३८, १४ मार्च २०१० (UTC)

  • चहा विदर्भातही लोकप्रिय आहेच. मलाही आवडला, त्यातील आपलेपणाचा स्वाद जास्त आवडला. सोबत एखादे गाणे जमले तर बहार. Gypsypkd ०५:२०, १५ मार्च २०१० (UTC)

बटाटेपोहे/कांदेपोहे

[संपादन]

४-५ दिवस कामात अतिशय गर्क होतो. आलो, तर चहाचे निमंत्रण मिळाले. काही वादावादी/वैचारिक मतभेद वगैरे झाले की काय? म्हणून चहाचे निमंत्रण आले? बाटाटेपोहे/कांदेपोहे, त्यावर थोडा चिवडा, वर मस्तपैकी झननन(तिखट)(हा खास वर्‍हाडी शब्द आहे) चण्याची तर्री , बारीक चिरलेली कोथिंबीर व किसलेले खोबरे हे चहाआधी माझेकडे लागले. किमानपक्षी मिसळ तर आहेच. या तर सर्वजण. अहो ! खरेच या. येणारच असाल तर मग नुसते पोहे कशाला? पुरणपोळीचा पण बेत करू शकतो. वाटलेच तर, डाळवडे, पंचामृत, कैरीचे पन्हे, कांदाभजी, मसालेभात, साजूक तुप, भटईची(एकप्रकारचे लहान वांगे) मसाला भाजी, कांदे-कैरीचे लोणचे, जवसाची चटणी, काकडीची दही घालून केलेली कोशिंबीर इत्यादींपैकी काहीही. शिवाय घोळीची भाजी जरूर करतो म्हणजे घोळ संपेल. कळवा मग तसे. एकदा वैदर्भीय पाहुणचार तर घेऊन बघा. आग्रहाचे निमंत्रण आहे बरे.

वि. नरसीकर (चर्चा) ०६:४३, १५ मार्च २०१० (UTC)


चहाबद्दल धन्यवाद.मनोज ०८:१०, २५ मार्च २०१० (UTC)

चहाचा अजून एक round! अर्थात चहा पिण्यास आपण कधीही तयार ! यावरून आठवले की चहाला नाही म्हणू नये असे आमची आजी म्हणायची. यातील चहा शब्दाचा अर्थ तिला पेय तसेच विचारपूस (त्यांची चहा केली) असाही अभिप्रेत होता हे बरेच उशीरा कळले.
अभय नातू ०८:१६, २५ मार्च २०१० (UTC)
टी साठी चहा हा त्यावरूनच तर आला नसावा? -मनोज ०८:२६, २५ मार्च २०१० (UTC)
आलुपोहे घ्या आलु पोहे
आलुपोहे घ्या आलु पोहे
  • आलुपोहे?? हा कोणता पदार्थ?? आळूची भाजी?? पोह्यांसोबत??असे काही आहे का?? आपण खुलासा केलात तर बरे होईल. काय आहे मी एक खादाड माणूस आहे (खवैय्या वगैरे तत्सम शब्दप्रयोग मला अगदीच मिळमिळीत वाटतात म्हणून ) आणि निरनिराळे पदार्थ करून खायला आवडतात आता विषय निघालाच आहे तेव्हा हे असे पदार्थ कसे करतात ते कृपया सांगावे.क.लो.अ.செ.प्रसन्नकुमार १२:३६, २२ जुलै २०१० (UTC)
हे तर छानच, तर मग, चहा सोबत हे आलुपोहे घ्या, आलु पोहे !
माहितगार १४:१६, २२ जुलै २०१० (UTC)

सप्टेंबर २०११

[संपादन]
फरसाण, तुमच्यासाठी

सर्वप्रथम, चहाबरोबर थोडेसे फरसाण आणले आहे.

या चहाबैठकीतील अनेक उद्देशांपैकी एक आहे --

  • एखाद्या व्यक्तीविषयी वा तिच्या योगदानविषयी आपली पसंती जाहीररीत्या प्रगट करण्यासाठी.

तर मग मला म्हणायचे आहे की सागर मार्कळांचे लेखन, त्यांचे उपग्रहांबद्दलचे ज्ञान व त्याबद्दलचे योगदान याबद्दल मला कौतुक आहे.

तसेच संकल्पचे गेल्या अनेक वर्षांचे योगदान, मराठी विकिपीडियाच्या विकासाबद्दलची तळमळ आणि त्यासाठी त्याच्या (प्रसंगी स्वतःकडे वाईटपणा घेउनही केलेल्या) स्पष्टोक्ती यांबद्दल मला कौतुक वाटते.

आणि हे सांगणे नलगे की आपले कितीही मतभेद, वादावाद्या झाल्या तरीही आपण सगळे येथे एकाच ध्येयासाठी आलेलो आहोत आणि त्यासाठी पडेल ते काम करण्याची आपली तयारी आहे.

अभय नातू ०३:०८, ३० सप्टेंबर २०११ (UTC)

दिवाळीचा विकिफराळ २०१३

[संपादन]
  • {{साद|}} एका साद साचात पाचच सदस्य नावे मावत असल्यामुळे प्रत्येकी पाच संख्येनंतर वेगळा साचा लावावा.
  • दिपावलीच्या सर्वांना मन:पुर्वक शुभेच्छा.

@V.narsikar, अभय नातू, J, Abhijitsathe, आणि Katyare: @संतोष दहिवळ, Bodkhe, Salveramprasad, Dr.sachin23, आणि Prabodh1987: @Sankalpdravid आणि Heramb:

  • मराठी विकिपीडियावर अशात संपादन करू लागलेल्या पुढील नवीन संपादकांनाही मन:पुर्वक शुभेच्छा

@Mahendra pagar, Minalshamgule, दामले श्रीपाद शंकर, मुकुंद जोगळेकर, आणि Ek motivator: @Prakashredgaonkar, Rajsewak, शरद वागळे, दामले श्रीपाद शंकर, आणि Sarkar: @दिपाली परिचारक, PRAMODTHAKARE555, अशोक बनसोडे, आणि समस्त मराठी विकिपीडिया परिवारास आमंत्रण चालू:

फरसाण, तुमच्यासाठी
लाडू, तुमच्यासाठी
खीर, तुमच्यासाठी

काय लोकं आहेत हो या विकिवर. येवढी दिवाळी उलटून गेली पण कोणीही(माझ्यासह) कोणास विकिफराळास बोलविले नाही.येणे न येणे हा भाग सोडा ! निदान निमंत्रण तर द्यायचे ! भावनिक बंध लोपून रुक्षता वाढत चालली आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. असो. सहज गंमत म्हणून हा प्रपंच.

--वि. नरसीकर (चर्चा • योगदान) १०:१६, १३ नोव्हेंबर २०१३ (IST)[reply]

उपवासा करीता चमचमीत साबुदाणावडा, तुमच्यासाठी
उपवासा करीता केळीसुद्धा, तुमच्यासाठी


नरसिकरजी मला वाटते मिळाली सुट्टी तर संपादनाची आणि लिहिण्याची भूक भागवून घेण्यात प्रत्येकजण तन्मयतेने रंगले होते म्हणून दिवाळी फराळाचेही भान राहीले नाही.पण खरतर नव्या {{साद|}} साचामुळे चहा-फराळाकरता साद देणे आता अंमळ सोपे झाले आहे.सध्या अशात कार्यरत दिसलेल्या काही सदस्यांची नावे साद साचात वर जोडतो आहे. विकिपीडिया मुक्त आहे तेव्हा हेच सर्वांनी दिवाळी २०१३ च्या फराळाचे निमंत्रण समजणे आणि अजून कुणाची आठवण आली आणि साद द्यावी वाटली तर साद साचात सदस्य नाव जोडा संबंधीत सदस्य विकिपीडियावर येतील त्यांना साद आपोआपच जाईल.
आपल्या आवडीचे वाचन आणि लेखन घडत राहो, आणि दिपावलीच्या सर्वांना मन:पुर्वक शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:१३, १३ नोव्हेंबर २०१३ (IST)[reply]

२१ मार्च, २०१७

[संपादन]
साजूक तूपाचा आहे!

नरसीकरजी,

चहा पिण्यास बोलाविल्याबद्दल धन्यवाद. येथील शिरस्त्याप्रमाणे मला एक-दोन गोष्टी सगळ्यांच्या ध्यानात आणून द्यायच्या आहेत.

१. मराठी विकिपीडियाने गेल्या दोन-तीन महिन्यांत संपादने आणि लेखसंख्येच्या दृष्टीने मोठी धडक मारलेली आहे. यात सुबोध कुलकर्णी, राहुल देशमुख आणि इतरांनी घेतलेली शिबिरे आणि कार्यशाळा यांचा मोठा हातभार आहे हे उघडच आहे. या कार्यशाळांतून नवीन लेखकांनी खूप मजकूर घातला. त्यातील काही मजकूर नीटनेटका करायला पाहिजे. आपण सगळे हे ध्यानात ठेवूयात. आपण आता ४६,६०० लेखांचा टप्पा पार करून पुढे आलेलो आहोत. वर्षाअखेर ५०,००० लेख होतील असे लक्ष्य आपल्या समोर ठेवूयात.

२. सदस्य Yogeshs यांनी भारतीय रेल्वेवरील, विशेषतः मुंबई भागातील रेल्वे स्थानकांवर लेख लिहिण्यास सुरू केलेले आहे. रेल्वे हा माझा आवडीचा विषय आहे आणि त्यावर कोणीतरी काम करते आहे हे पाहून आनंद वाटला. भारतीय रेल्वे ही जगातील क्लिष्ट वाहतूकप्रणालींपैकी एक आहे. त्यावर येथे अक्षरशः हजारो लेख लिहिता येतील. यात सुसंगतता आणि समानता असणे गरजेचे आहे तरी यावर लक्ष देउन Yogeshs यांना मदत करूयात.

वरील मजकूरास काट मारीत आहे. ज्यानेत्याने या सदस्यांशी स्वतःच्या जोखमीवर बोलावे. मदत करायला जावे अन उलटी आपल्याच नावाने बोंब ठोकली जावी हे होण्याची शक्यता नाकारता येणार नाही हे मी माझ्या अनुभवावरून सांगत आहे. यात वरील सदस्याचा द्वेष नसून इतर सदस्यांना चेतावणी आहे.

असो. तर आजच्या चहाच्या गप्पात वरील दोन-तीन गोष्टी. बाकी सगळ्यांनी गेल्या काही अवकाशात येथे काय विशेष पाहिले आहे?

अभय नातू (चर्चा) २१:१५, २१ मार्च २०१७ (IST)[reply]

ता.क. आणलेला हलवा ठेवायला विसरलो होतो. आता ठेवला आहे.

धन्यवाद! पण न-खाता! शूगर असल्यामुळे. असो.
येथील दोन उपक्रमांतर्गत संपादन झालेले लेख विकिच्या लेखसाच्यात बसवावयास हवेत व अनेक लेखांची द्विरुक्ती झाली आहे ती नीट करावयास हवी. शुद्धलेखन चिकित्सा व वर्णनात्मकता/ललित लेखन टाळून लेख नीट करावयास हवेत. सुबोध व मला वाटते, साळवेंनी ते काम चालूही केले आहे. त्यात आवश्यक साचा/चित्रे टाकावयास हवीत. अजून काय वेगळे असेल ते सांगावे. करता येईल.आपण सर्व त्यासाठी तयारच आहोत.तसेच नविन संपादकांना मार्गदर्शन करावयास हवेच.त्यायोगे लेखनाचा स्तर सुधरेल. नकल-डकव काढावयास हवे. गाळणींनी त्याची दखल घेतली असेलच.--वि. नरसीकर (चर्चा) २१:२६, २१ मार्च २०१७ (IST)[reply]

१५ सप्टेंबर २०१८

[संपादन]

@अभय नातू, Tiven2240, Sureshkhole, आणि संतोष दहिवळ:@Aditya tamhankar, आर्या जोशी, Pooja Jadhav, आणि ज्ञानदा गद्रे-फडके:@Rajendra prabhune, Pushkar Ekbote, Vikrantkorde, आणि नरेश सावे:@प्रसाद साळवे, संदेश हिवाळे, , आणि उज्ज्वला संजय पवार:@सुबोध कुलकर्णी:@सर्व इतर सदस्य:

पुण्यातील भजीही आहेत.
तसेच भाजणीचे कांदा घातलेले थालीपीटही
कृपया हवा तो व आवडेल तो चहा घ्या
अथवा हा साधा नेहमीचा
आज अभियंता दिवस (इंजिनिअर्स डे)चे निमित्त साधून सर्वांना फराळास/चहापाण्यास बोलाविले आहे.सर्वप्रथम, आपल्या देशाच्या जडणघडणीत ज्या अभियंत्यांनी महत्त्वाचे योगदान दिले त्यांना सादर प्रणाम.

चहापाण्यासाठी अट एकच आहे. हे पान वरपासून (अगदी शीर्षकापासून) या विभागापर्यंत शांतपणे वाचावे व मगच हा मजकूर वाचावा. निर्मळ मनाने, सर्व कटू विचार/हेवेदावे बाजूस ठेऊन मनात कोणताही राग अथवा अढी न-ठेवता कृपया येथे यावे व सकारात्मक भावना बाळगूनच येथून जावे अशी सर्वांना अत्यंत आदरपूर्वक व नम्रतापूर्वक विनंती आहे.

एकमेकाशी हस्तांदोलन जरूर करा

मला ही दुर्दम्य आशा आहे कि, आपण सर्व माझ्या विनंतीस मान द्याल व विकिपीडियावर वादावादी/ विवाद/ तंटे बखेडे बाजूस ठेऊन, झाले-गेले ते विसरून, मराठी विकिपीडिया उभारणीचे मूळ कार्य पुन्हा ताज्या दमाने सुरू ठेवाल.

व शक्य असेल तर गळाभेटही घ्या

आपण येथे येऊन गेल्याची सही करण्यास मात्र विसरू नका.त्याद्वारे मला कोण-कोण येऊन गेले ते कळेल. धन्यवाद.--वि. नरसीकर , (चर्चा) १०:३८, १५ सप्टेंबर २०१८ (IST)[reply]

धन्यवाद नरसीकरजी! थालीपीठ सोबत चहा चा आस्वाद घेतला. आपण सारे चांगले काम करत आहोत यात शंका नाही. अनेक संस्था, लेखक जोडले जात आहेत. एकमेकांना अवकाश देत शांत डोक्याने प्रतिसाद देत काम केले तर या ज्ञानकोशाची व विकी समुदायाची प्रतिमा उंचावत राहील. शिवाय स्वत:च्या मर्यादा जाणून घेवून इतरांची मदत घेणे, अभिनिवेश/अहंकार इ. आड आल्याने झालेल्या चुका मान्य करणे हेही साहचर्य वाढत राहण्यासाठी महत्वाचे आहे. ज्ञानकोश विकसनाची प्रक्रिया दीर्घकाळ सतत चालणारी आहे. त्यांत जेंव्हा जमेल तेंव्हा, जितके जमेल तितके आणि जसे जमेल तसे मी योगदान करत आहे ही नम्र भावना माझी आहे. ही भावना आणि समाजाचे अंतिम हित डोळ्यासमोर ठेवले तर आलेली कटुता क्षणात नाहीशी होईल यावर माझा विश्वास आहे. सर्वांना शुभेच्छा!
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ११:२३, १५ सप्टेंबर २०१८ (IST)[reply]

@V.narsikar: नमस्कार सर ! छान पदार्थ पाहून तोंडाला पाणी सुटलच आणि तुमचा हृद्य हेतू समजला. खूप आभार ! आपण सगळे एका वैश्विक व्यासपीठाला समृद्ध करणारे बिनीचे शिलेदार आहोत आणि तुम्ही आम्हाला ज्येष्ठ आहात. तुमच्या सूचना व मार्गदर्शन आम्हाला महत्वाचे आहे. या सर्व प्रक्रियेत एक संशोधक म्हणून मी समृद्ध होते आहे आणि सुरुवातीला तुम्ही मला प्रोत्साहन देत शिकविले आहे. माझया परीने चांगल्या पद्धतीने सर्वांना सोबत घेऊन सकारात्मक पद्धतीने एकत्र काम करण्याचा माझा प्रयत्न राहील. धन्यवाद ! आर्या जोशी (चर्चा) १७:५४, १६ सप्टेंबर २०१८ (IST)[reply]

धन्यवाद @V.narsikar: दादा,

आपल्यासाठी ज्याला जे पाहिजे त्याने ते घ्यावे, आणि भांडणांना आणखीन उर्जा घ्यावी, फक्त तिखट चटणी किंवा मिरची जपूनच. आपण मराठी समुदायासाठी चांगली व्यवस्था आणि धोरणे आणूया, आणखी सोपे आणि सहज संपादने करता येतील, संदर्भ शोधणे सोपे जाईल याची सोय करुया. सर्वांना विकितत्वांचे पालन आणि एकमेकांचे ऐकून घेण्यासाठी थोडा थोडा वेळ देऊयात. सुरेश खोले "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! १४:१४, १५ सप्टेंबर २०१८ (IST)[reply]
गौरी गणपतीच्या गडबडीत असताना चहा पानाचे निमंत्रण दिसले. धन्यवाद @V.narsikar:जी! गोड खाऊन कंटाळा आल्यामुळे भेळेवर ताव मारला. एकाच ध्येयाने प्रेरित होऊन, वेळेत वेळ काढून काम करणारे असे सर्वच सदस्य असल्यामुळे, एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न न करता सर्वांनी सहकार्याच्या भावनेने काम केले तर अधिक चांगले काम होईल, असे मनापासून वाटते. गणपती बाप्पा मोरया!! अभियंता दिनाच्या शुभेच्छा!

--ज्ञानदा गद्रे-फडके (चर्चा) २२:०९, १५ सप्टेंबर २०१८ (IST)[reply]

वडा-चटणी.

- अभय नातू (चर्चा) २०:२५, १७ सप्टेंबर २०१८ (IST)[reply]