Jump to content

मनोज जोशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


मनोज जोशी
जन्म मनोज नवनीत जोशी
१ जून, १९५५ (1955-06-01) (वय: ६९)
गोरेगांव, रायगड जिल्हा, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, मराठी नाटके, इंग्रजी नाटके
भाषा मराठी, हिंदी, इंग्रजी
शिक्षण सर ज.जी. कलामहाविद्यालय
प्रमुख चित्रपट दशक्रिया, नारबाची वाडी
पुरस्कार
वडील नवनीत जोशी (कीर्तनकार)
नातेवाईक राजेश जोशी

ओंकार जोशी ऊर्फ मनोज नवनीत जोशी (जन्म : गोरेगांव, रायगड जिल्हा, महाराष्ट्र, १ जून, १९५५) हे एक भारतीय चित्रपट अभिनेता व मराठी नाट्यकलाकार आहेत. मूळ गुजराती असलेल्या मनोज जोशी यांचे शिक्षण मराठीत झाले. त्यांचे वडील नारदीय कीर्तनकार होते. मनोज जोशी मुंबीतील भारती विद्या भवनमध्ये संस्कृत शिकले. त्यांनि प्रतिमा मुद्रण शास्त्रातला एक व्यावसायिक अभ्यासक्रम पुरा केला आहे. चित्रकला शिकून त्यांनी काही नियतकालिकांसाठी पृष्ठ मांडणीचे काम केले आहे. हे सर्व करीत असतानाच मनोज जोशी यांनी सत्यदेव दुबे, विजया मेहता, आणि शफी इनामदार यांच्यासारख्ह्या नाट्यकर्मींकडून नाट्यकलेचे मर्म आत्मसात केले.

त्याने मराठी, गुजराती, हिंदी, भोजपुरी चित्रपटांमधून अभिनय केला आहे. कांति मढियाच्या ताक धिना धिन या गुजराती नाटकात मनोजने १९८६ साली पहिली भूमिका केली. विवेक लागू यांचे सर्वस्वी तुझीच (१९९५) हे मनोज जोशी यांचे मराठीतले त्यांचे पहिले व्यावसायिक नाटक. त्यानंतर मनोज जोषींनी अनेक मराठी, गुजराती, हिंदी, भोजपुरी आणि इंग्रजी नाटकांमधून भूमिका केल्या.

मनोज जोशी यांनी विजय तेंडुलकर यांचे ’घाशीराम कोतवाल’ हे नाटक गुजरातीत अनुवादित केले आहे.

मनोज जोशी हे तो दिवंगत अभिनेता राजेश जोशी याचा भाऊ आहे. १७ नोव्हेंबर २०१७ रोजी प्रसिद्ध झालेल्या दशक्रिया या चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका केली आहे. १९९८पासून २०१७ पर्यंत त्यांनी ६०हून अधिक चित्रपटांत भूमिका केल्या आहेत, त्यांतल्या बऱ्याचशा भूमिका विनोदी आहेत.

मनोज जोशी यांनी चाणक्य हे नाटक लिहायला १९८६पासून केली. चार वर्षे संशोधन, लेखन, भूमिकांची निवड वगैरे करून हे नाटक रंगभूमीवर आले. चाणक्याची मुख्य भूमिका मनोज जोशींनी केली होती.

चरित्र भूमिका ही मनोज जोशी यांची खास पसंती आहे.

गाजलेला डायलॉग : असतील असल्या बाया तर रात्र गेलीच वाया (नारबाची वाडी)

अभिनयाची कारकिर्द

[संपादन]

नाटके

[संपादन]
  • कलापी (गुजराती)
  • गांधी विरुद्ध गांधी (मराठी आणि गुजराती)
  • डॉक्टर तुम्ही पण (मराठी आणि गुजराती)
  • मन मिले त्या मेलो
  • मनू ने मास्सी (गुजराती)
  • रंगीलो (गुजराती)
  • सगपणना सौदागर (गुजराती)
  • सूर्यवंशी (गुजराती)
भोपाळच्या आदि विद्रोही नाट्य समारोहात रवींद्र भवन येथे चाणक्याची भूमिका करताना जोशी - डिसेंबर २०१५

चित्रपट

[संपादन]
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


वर्ष शीर्षक भूमिका भाषा
१९९९ Sarfarosh Sub-Inspector Bajju हिंदी
२००० Aaghaaz as assistant of Danny Mendoza, Johnny's younger brother हिंदी
२००१ Jaaneman Jaaneman

Chandni Bar

Belji Bhai

Chandrakant Bhau

हिंदी
२००२ Devdas Dwijdas Mukherjee हिंदी
२००३ Hungama Sub-Inspector Waghmare हिंदी
२००३ Jogger's Park Tariq Ahmed हिंदी/इंग्रजी
२००४ Aan : Men at Work Manik Rao हिंदी
२००४ Dhoom ACP Shekhar Kamal हिंदी
२००४ Jaago Advocate Satya Prakash Satwani हिंदी
२००४ Hulchul Lawyer हिंदी
२००५ Page 3 Bosco हिंदी
२००५ Shikhar Amrit Patil हिंदी
२००५ Kyon Ki P.K. Narayan (A Security Guard) हिंदी
२००६ Phir Hera Pheri Kachara Seth हिंदी
२००६ Chup Chup Ke Pooja's father हिंदी
२००६ Garam Masala Nageshwar हिंदी
२००६ Golmaal: Fun Unlimited Harichandra Ramchandra Mirchindani "Harami" हिंदी
२००६ Vivah Bhagat Ji (Match maker of prem and poonam) हिंदी
२००६ Bhagam Bhag MG Gandhi हिंदी
२००६ Humko Deewana Kar Gaye Rasikbhai Galgalia हिंदी
२००७ Guru Ghanshyam Bhai हिंदी
२००७ Bhool Bhulaiyaa Badrinath Chaturvedi हिंदी
२००८ Mere Baap Pehle Aap Chirag Rane हिंदी
२००८ Maan Gaye Mughal-e-Azam Police Inspector Patil हिंदी
२००८ Billu Damodar Dubey हिंदी
२००८ Khallballi KK हिंदी
२००९ De Dana Dan Brij Mohan Oberoi हिंदी
२०१० Maniben.com Bhadresh Bhai हिंदी
२०१० Khatta Meetha Trigun Fatak हिंदी
२०११ Bin Bulaye Baraati Loha Singh हिंदी
२०११ Ready Bharat Kapoor हिंदी
२०११ फक्त लढ म्हणा Marathi
२०११ The Opportunist The Opportunist हिंदी
२०१२ Khiladi 786 Champaklal हिंदी
२०१२ Dabangg 2 Shopkeeper हिंदी
२०१२ गोळाबेरीज Story teller Marathi
२०१२ भारतीय Prime Minister Marathi
२०१३ Chaloo Chief Minister हिंदी
२०१३ Policegiri Javeed Shiekh हिंदी
२०१३ Wake Up India हिंदी
२०१३ नारबाची वाडी Double Role Marathi
२०१४ Mr Joe B. Carvalho Commissioner Pandey हिंदी
२०१४ Hasee Toh Phasee Devesh Solanki हिंदी
२०१४ Bey Yaar Y B Gandhi Gujarati
२०१५ Dolly Ki Doli Duby Ji हिंदी
२०१५ I Love New Year Randhir's friend हिंदी
२०१५ Kis Kisko Pyaar Karoon Deepika's father हिंदी
२०१५ Prem Ratan Dhan Payo Mr. Bhandari/Advocate of Pritampur Estate हिंदी
२०१६ Sanam Re Akash's Boss हिंदी
२०१६ Thai Jashe! Chandrakantbhai Joshi Gujarati
२०१६ Ghayal Once Again Minister हिंदी
२०१७ Pappa Tamne Nahi Samjaay Hasmukhlal Mehta Gujarati
२०१७ Tamburo (film) Kirit Bhai Gujarati
२०१७ दशक्रिया (चित्रपट) मराठी

दूरचित्रवाणी मालिका

[संपादन]
वर्ष शीर्षक भूमिका भाषा
१९९० चाणक्य श्रीयक, शक्तारचा मुलगा हिंदी
१९९८ वह अमित हिंदी
१९९९ आभाळमाया शरद जोशी मराठी
१९९९–२००२ एक महल हो सपनों का Abhay Purshottam Nanavati हिंदी
२००० Your Honour
२००२ खिचडी हिंदी
२००२ कहेता है दिल मेयर साहेब हिंदी
२००४–२००५ ये मेरी लाइफ है रसिक मेहता हिंदी
२००६ कसम से निशिकांत दीक्षित हिंदी
२०१५ चक्रवर्ती सम्राट अशोक चाणक्य हिंदी
२०१५–२०१६ होणार सून मी ह्या घरची रमाकांत गोखले मराठी

शिवाय, एक महल हो सपनो का, राऊ (मराठी), संगदिल, कभी सौतन कभी सहेली वगैरे.

पुरस्कार

[संपादन]
  • ITA Award for Best Actor in a Supporting Role (२०१६) चित्रपट - चक्रवर्ती अशोक सम्राट
  • कहता है दिल या चित्रपटातील नेगेटिव्ह भूमिकेसाठी Indian Telly Best Actor Award (२००३)
  • गुजरात सरकारकडून साबरकांठारत्‍न पुरस्कार (२०१४)
  • दशक्रियातील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार (२०१७)
  • पद्मश्री (२०१८)
  • महाराष्ट्र राज्य व्यावसायिक गुजराती नाट्यस्पर्धेकडून सन्मान (१९९७)
  • संगीत नाटक अकादमी पुरस्कार (२०१६)

संदर्भ

[संपादन]