१९९३-९४ शारजा चॅम्पियन्स चषक
१९९३-९४ शारजाह चॅम्पियन्स ट्रॉफी | |
---|---|
क्रिकेट प्रकार | आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने |
स्पर्धा प्रकार | गट फेरी आणि अंतिम सामना |
यजमान | संयुक्त अरब अमिराती |
विजेते | वेस्ट इंडीज |
सहभाग | ३ |
सामने | ७ |
सर्वात जास्त धावा | सईद अन्वर (३८७) |
सर्वात जास्त बळी |
वसिम अक्रम (९) केनी बेंजामिन (९) |
१९९३-९४ शारजाह चॅम्पियन्स ट्रॉफी (किंवा प्रायोजक नावाने १९९३-९४ पेप्सी चॅम्पियन्स ट्रॉफी) ही एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने असलेली क्रिकेट स्पर्धा २८ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर १९९३ दरम्यान संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित केली गेली होती. सर्व सामने हे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने होते. शारजाह शहरातील शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सर्व सामने झाले. या स्पर्धेत पाकिस्तान, श्रीलंका आणि वेस्ट इंडीज या तीन देशांनी भाग घेतला.
स्पर्धा गट फेरी पद्धतीने खेळवली गेली. प्रत्येक संघाने प्रतिस्पर्धी संघाशी दोन सामने खेळले. पाकिस्तान आणि वेस्ट इंडीजने प्रत्येकी तीन सामने जिंकत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. अंतिम सामन्यात वेस्ट इंडीजने पाकिस्तानला ६ गडी राखून पराभूत करत चषक जिंकला. वेस्ट इंडीजचा फिल सिमन्स याला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. पाकिस्तानच्या सईद अन्वरने सर्वाधिक ३८७ धावा केल्या. तर पाकिस्तानचा वसिम अक्रम आणि केनी बेंजामिन या दोघांनी प्रत्येकी ९ गडी बाद करत स्पर्धेत आघाडीचे गोलंदाज ठरले.
गुणफलक
[संपादन]संघ
|
सा | वि | प | ब | अ | गुण | धावगती | नोट्स |
---|---|---|---|---|---|---|---|---|
पाकिस्तान | ४ | ३ | १ | ० | ० | ६ | ५.४०१ | अंतिम फेरीत बढती |
वेस्ट इंडीज | ४ | ३ | १ | ० | ० | ६ | ४.७८२ | |
श्रीलंका | ४ | ० | ४ | ० | ० | ० | ४.१३९ |
साखळी सामने
[संपादन]१ला सामना
[संपादन]२रा सामना
[संपादन]३रा सामना
[संपादन]४था सामना
[संपादन]५वा सामना
[संपादन] २ नोव्हेंबर १९९३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
- आमिर हनीफ (पाक) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
६वा सामना
[संपादन] ३ नोव्हेंबर १९९३
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
- दुलीप समरवीरा (श्री) आणि रोलँड होल्डर (वे.इं.) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.