१९८४-८५ रोथमन्स चार-देशीय चषक
१९८४-८५ रोथमन्स चार-देशीय चषक | |
---|---|
तारीख | २२ – २९ मार्च १९८५ |
क्रिकेट प्रकार | आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (५० षटके) |
स्पर्धा प्रकार | बाद-फेरी |
यजमान | संयुक्त अरब अमिराती |
विजेते | भारत |
सहभाग | ४ |
सामने | ४ |
मालिकावीर | सुनील गावसकर |
सर्वात जास्त धावा | जावेद मियांदाद (७१) |
सर्वात जास्त बळी | इम्रान खान (७) |
१९८४-८५ रोथमन्स चार-देशीय चषक ही एक क्रिकेट स्पर्धा २२ ते २९ मार्च १९८५ दरम्यान संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित केली गेली होती. इंग्लंडस्थित रोथमन्स कंपनीने ह्या स्पर्धेचे प्रायोजकत्व घेतल्याने ह्याला रोथमन्स चषक ह्या नावाने संबोधले गेले. सर्व सामने हे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने होते व शारजाह शहरातील शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सर्व सामने झाले. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या देशांनी भाग घेतला.
स्पर्धा बाद फेरी पद्धतीने खेळवली गेली. २९ मार्च रोजी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ३ गडी राखून पराभव करत चषक जिंकला. तर ३ऱ्या स्थानाकरता झालेल्या सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडचा पराभव करत ३रे स्थान मिळवले. भारतीय फलंदाज सुनील गावसकर याला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. पाकिस्तानच्या जावेद मियांदाद याने सर्वाधिक ७१ धावा केल्या, तर पाकिस्तानच्याच इम्रान खान याने स्पर्धेतील सर्वाधिक ७ बळी मिळवले. विजेत्या भारतीय संघाला रोख ४५,००० अमेरिकन डॉलरचे बक्षीस पुरस्कार स्वरूप देण्यात आले.
बाद फेरी
[संपादन]१ला उपांत्य सामना
[संपादन]२रा उपांत्य सामना
[संपादन] २४ मार्च १९८५
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
- नॉर्मन गिफर्ड आणि कोलिन वेल्स (इं) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन्ही देशांनी संयुक्त अरब अमिरातीमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
३ऱ्या स्थानाकरता सामना
[संपादन] २६ मार्च १९८५
धावफलक |
वि
|
||
अंतिम सामना
[संपादन]