Jump to content

१९८५-८६ शारजा चषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(१९८५-८६ शारजाह चषक या पानावरून पुनर्निर्देशित)
१९८५-८६ शारजाह चषक
तारीख १५ – २२ नोव्हेंबर १९८५
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (५० षटके)
स्पर्धा प्रकार गट फेरी
यजमान संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती
विजेते वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
सहभाग
सामने
मालिकावीर वेस्ट इंडीज रिची रिचर्डसन
सर्वात जास्त धावा वेस्ट इंडीज रिची रिचर्डसन (१७१)
सर्वात जास्त बळी पाकिस्तान मुदस्सर नझर (३)
पाकिस्तान तौसीफ अहमद (३)
वेस्ट इंडीज जोएल गार्नर (३)

१९८५-८६ शारजाह चषक ही एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने असलेली क्रिकेट स्पर्धा १५-२२ नोव्हेंबर १९८५ दरम्यान संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित केली गेली होती. सर्व सामने हे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने होते व शारजाह शहरातील शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सर्व सामने झाले. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, वेस्ट इंडीज या देशांनी भाग घेतला.

स्पर्धा गट फेरी पद्धतीने खेळवली गेली. तिन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध एक एक सामने खेळले. वेस्ट इंडीजने दोन्ही सामने जिंकत चषक जिंकला. पाकिस्तान दुसरे स्थान पटकावत उपविजेते ठरले. भारताला दोन्ही सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला. विजेत्या वेस्ट इंडीज संघाला ५० हजार अमेरिकन डॉलर बक्षीस मिळाले तर वेस्ट इंडीजच्या रिची रिचर्डसन याला मालिकावीराचा पुरस्कार प्रदान करण्यात आला तर बक्षीस स्वरूप त्याला ३ हजार अमेरिकन डॉलर आणि एक चारचाकी वाहन दिली गेली.

गुणफलक

[संपादन]
संघ
सा वि गुण धावगती
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ४.४९४
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ४.४३३
भारतचा ध्वज भारत ३.९११

गट फेरी

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
१५ नोव्हेंबर १९८५
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१९६/४ (४५ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१९९/३ (४४.१ षटके)
मोहसीन खान ८६* (१२६)
मायकल होल्डिंग १/१७ (५ षटके)
रिची रिचर्डसन ९९* (१४१)
मुदस्सर नझर १/३२ (९ षटके)
वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: रिची रिचर्डसन (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
  • ४५ षटकांचा सामना.
  • संयुक्त अरब अमिरातीमध्ये वेस्ट इंडीजने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
  • टोनी ग्रे (वे.इं.) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

२रा सामना

[संपादन]
१७ नोव्हेंबर १९८५
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२०३/४ (४५ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१५५ (४०.४ षटके)
मुदस्सर नझर ६७ (११७)
रॉजर बिन्नी १/३६ (९ षटके)
सुनील गावसकर ६३ (१०५)
तौसीफ अहमद ३/३० (९ षटके)
पाकिस्तान ४८ धावांनी विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: मुदस्सर नझर (पाकिस्तान)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
  • ४५ षटकांचा सामना.

३रा सामना

[संपादन]
२२ नोव्हेंबर १९८५
धावफलक
भारत Flag of भारत
१८०/४ (४५ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१८६/२ (४१.३ षटके)
सुनील गावसकर ७६* (१२८)
जोएल गार्नर २/११ (९ षटके)
डेसमंड हेन्स ७२* (१०५)
कपिल देव १/२९ (८ षटके)
वेस्ट इंडीज ८ गडी राखून विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: जोएल गार्नर (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.
  • ४५ षटकांचा सामना.