१९९० ऑस्ट्रेलेशिया चषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
१९९० ऑस्ट्रेलेशिया चषक
तारीख २५ एप्रिल – ५ मे १९९०
व्यवस्थापक आशिया क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने
स्पर्धा प्रकार बाद फेरी
यजमान संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती
विजेते पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान (२ वेळा)
सहभाग
सामने
मालिकावीर पाकिस्तान वकार युनुस
सर्वात जास्त धावा भारत मोहम्मद अझहरुद्दीन (१८६)
सर्वात जास्त बळी पाकिस्तान वकार युनुस (१७)
१९८६ (आधी) (नंतर) १९९४

१९९० ऑस्ट्रेलेशिया चषक ही २५ एप्रिल ते ५ मे १९९० या कालावधीमध्ये संयुक्त अरब अमिरातीत झालेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा होती. ऑस्ट्रेलेशिया चषक मालिकेतील ही द्वितीय आवृत्ती होती. ही स्पर्धा आशिया आणि ऑस्ट्रेलेशिया या खंडातील क्रिकेट खेळाणाऱ्या प्रमुख देशांसाठी भरवली गेली होती. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या सहा देशांच्या राष्ट्रीय क्रिकेट संघांनी सदर स्पर्धेत भाग घेतला. सर्व सामने शारजाह मधील शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळविण्यात आले.

सहभागी देशांना तीन संघांच्या दोन गटात विभागले. दोन्ही गटामधून अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले. अंतिम सामन्यात पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला हरवत सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलेशिया चषक जिंकला. विजेत्या पाकिस्तान संघाला ३० हजार अमेरिकन डॉलर पारितोषिक म्हणून मिळाले. पाकिस्तानच्या वकार युनुसला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. भारताचा मोहम्मद अझहरुद्दीन हा स्पर्धेत सर्वाधीक १८६ धावा करत आघाडी फलंदाज ठरला. तर सर्वाधीक १७ गडी मिळवत पाकिस्तानचा वकार युनुस आघाडीचा गोलंदाज ठरला.