Jump to content

सदस्य चर्चा:Mahitgar/जुनी चर्चा ३

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कर्वे[संपादन]

धन्यवाद.

 • डी. डी. कर्व्यांवर लेख लिहणे प्रस्तावित आहे. त्याची जुळवाजुळव चालु आहे. समाजस्वास्थ्य या लेखाचाही विस्तार प्रस्तावित आहे. समाजस्वास्थ्य वरील बातमीने त्याची सुरवात केली आहे. आपण दिलेल्या संदर्भासाठी आपले आभार. (ते तसे द्यायचे असतात हे ही कळाले.!)
 • लाल रंगातील दुवे लेखात असतील तर विकि लेखकांना त्याचा पुढे विस्तार करता येईल असे मला वाटते. हे मान्य की, कोणत्याही लेखात कमीत-कमी लाल रंगाचे दुवे असावेत, किंबहुना नसावेतच, पण एखाद्या लेखात सर्व दुवे निळया रंगाचे असल्यास, त्या लेखाला परिपुर्ण म्हणता येईल. सर्व ’लाल’ दुव्यांचे ’निळा’ दुव्यांत रुपांतर झाल्यास हे शक्य आहे. आपल्या ’आनंद दिनकर कर्व” या लेखात दुवे (कोणत्याही रंगाचे का असेनात.!) असावेत असं मला वाटतं.
 • विकिचित्रांच्या वापरासाठी 'Fair Use' या शिर्षकाखाली मला एखादा साचा तयार करुन मिळेल काय.? असा साचा मला तयार करता येऊ शकेल काय.? ’वरील प्रताधिकारित चित्रांच्या प्रताधिकारांबद्दल परवानग्या मिळवण्याचे काम चालू आहे’ असाही साचा तयार करणे शक्य आहे काय.?

अमित य़ादव ०५:५५, १७ जानेवारी २०१० (UTC)

’उसाचा गवताळवाढ रोग’ या लेखामधील चित्रे व त्यांच्या कॉपीराईट संबधी[संपादन]

 • आपण दिलेला साचा (क्रिकॉमन्स) वापरुन संबधित लेखातील सर्व् चित्रांचे लायसन्स् बदललेले आहे. तरीही एकदा आपण तपासुन पहावे.

आपण् केलेल्या मदतीबद्दल् आपले आभार.
धन्यवाद.
अमित य़ादव १४:४१, २५ डिसेंबर २००९ (UTC)

’उसाचा गवताळवाढ रोग’ या लेखामधील चित्रे व त्यांच्या कॉपीराईट संबधी[संपादन]

 • उसाचा गवताळवाढ रोग’ यालेखामधील चित्रे व त्यांच्या कॉपीराईट संबधी मला विचारणा झाली आहे. तुम्हाला जर शक्य असेल तर Please restore images under the Creative Commons Attribution ShareAlike 3.0 license. सदर् लेखात वापरलेली सर्व छायाचित्रे माझी स्वतःची आहेत. माझ्या याच विषयावरच्या (en: SCGS) English Wikipedia वरच्या लेखासंबधीही हीच विचारणा मला झाली आहे. मला स्वतःला हे करणं शक्य आहे का? चढवलेल्या संचिकेचे वरीलप्रमाणे license कसे बदलता येईल.? कृपया मर्गदर्शन करावे. English Wikipedia वरच्या लेखासंबधीही ही माहिती मला उपयोगी पडेल. धन्यवाद.
 • संकल्प द्रविड यांनाही मी माझ्या लेखातील चित्रांसंबधे कॉपीराईट संबधी लिहले आहे. त्याला काही दिवस झाले पण अजुन उत्तर नाही. म्हणून आपणास लिहित आहे.

धन्यवाद. Amit Yadav ०३:५४, २५ डिसेंबर २००९ (UTC)

धन्यवाद[संपादन]

 • बरहा वापरण्याच्या संबधी दिलेल्या दुव्यासाठी अन आपल्या सुचनेसाठी धन्यवाद. आपल्या प्रतिकियेसाठीही धन्यवाद.
 • आपले वनस्पती प्रकल्पातसहभागी होण्याचे निमंत्रण वाचले. यात सहभागी होण्याची इच्छा नक्कीच आहे. मात्र वेळेअभावी शक्य होत नाही. मराठी विकी वनस्पती प्रकल्प अजुनही मला पहायचा आहे. मात्र यासंबधी आपण ’अमुक एका’ संपादनासाठी लक्ष घालण्यास सांगितले तर मी नक्की करु शकेन.
 • अजुनही काही सुचना असल्यास जरूर कळवाव्यात.

Amit Yadav १६:३८, २३ डिसेंबर २००९ (UTC)

काढण्यास हरकत नाही.[संपादन]

नमस्कार, प्रतअधिकाराचे उल्लंघन होत असेल तर चित्र काढण्यास हरकत नाही. मी ते चित्र गुगलच्या इमेजेस मधून घेतलेले होते. आपणास वाटत असेल तर चित्र काढण्यास हरकत नाही. आपण विकिवर अनेक गोष्टी जाणता. तेव्हा माझी कृती चूकही असू शकते. फक्त मला एक म्हणायचे आहे. समजा जर विषयाच्या अनुषंगाने संशोधन करत असतांना मला जर लेखनात त्याचे विश्लेषण करण्यासाठी तेच चित्र वापरायचे असते तर संदर्भात आपणास वर जो दुवा दिला आहे. तोच दुवा दिला असता तर चालते असे वाटते. तेव्हा चित्र टाकलेलेच आहे, त्याचा दुवा बाह्यदुव्यात द्यावा का ? चालत असेल तर तसे करावे. असो,तरिही प्रतअधिकाराबद्दल अजून आपल्याकडून समजून घेईनच. तोवर प्रतअधिकाराचे उल्लंघन होत असेल तर ते चित्र काढण्यास हरकत नाही. हेही नम्रपणे नमुद करतो.प्रा.डॊ.दिलीप बिरुटे ०९:२१, २१ डिसेंबर २००९ (UTC)

मस्त दुवे आहेत.[संपादन]

धन्यु...! तुम्ही उपक्रम संकेतस्थळावर असता काय ?

उ.: माहितीचौकट साचा बनवून हवा[संपादन]

नमस्कार माहीतगार!
साचा:हवा असलेला माहितीचौकट साचा, विकिपीडिया:साचे सुसूत्रीकरण प्रकल्प/हवे असलेले माहितीचौकट साचे/preload, विकिपीडिया:साचे सुसूत्रीकरण प्रकल्प/हवे असलेले माहितीचौकट साचे/सहाय्य ही तीन पाने संपादली आहेत. एकदा तपासून बघा. त्यातील सहाय्य पानाचा दुवा कुठे दिसेल, ते मात्र मला कळले नाहीये.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ११:३९, २२ डिसेंबर २००९ (UTC)

हो हो. तुम्ही सुचवलेल्या मार्गाने प्रीलोड बदलून बघतो. धन्यवाद!
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:४७, २३ डिसेंबर २००९ (UTC)
बटन दाबल्यावर येणारी संपादनचौकट छानच आहे, पण मला वाटते की त्यातील भाषा तांत्रिक आणि क्लिष्ट आहे. ज्या सदस्याला (विशेषतः नवीन) साच्यांविषयी फारशी (तांत्रिक) माहिती नाही अशाला हे daunting वाटण्याची शक्यता आहे. पण एका टिचकीसरशी मदत मागण्याची कल्पना चांगली आहे.
अभय नातू ०७:१५, २३ डिसेंबर २००९ (UTC)

नमस्कार, खूप दिवसांनी आल्यावर काय करावे ते सुचत नाहीये. तुम्ही आहात म्हणजे काहीही जमेल. आधी राहून गेलेले काम पूर्ण करावे म्हणतो, चहापाणी होत राहील. Gypsypkd ०५:४२, २५ डिसेंबर २००९ (UTC). हो मी पांढरकवडा येथेच राहतो. येथून वणी गाव सुमारे ५५ कि. मी. दूर आहे.
माफ करा, आपल्या प्रश्नाचा रोख कळला नाही. आमच्या येथे मूळ साधनांचा अभाव, उपजिविकेची साधने जमविण्यात दिवस जातात, शिक्षणाचे प्रमाण कमी, त्यातून विजेचा लपंडाव आणि इंटरनेट हवे तसे काम करीत नाही, यातून सर्वसामान्यांनी ही आधुनिक साधने वापरायची कशी असा प्रश्न सगळ्यांना सतावत आहे. मला ही साधने वापरतांना पाहून बरेच जण मी चैन करतो असा समज करून घेतात. त्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तर देता येत नाही. हे म्हणजे कोंबडी आधी की अंडे सारखे आहे. शिक्षणाचे महत्त्व सगळ्यात जास्त असायलाच हवे पण रोजंदारीचा प्रश्नही तेवढाच मोठा आहे. Gypsypkd ०६:३६, २५ डिसेंबर २००९ (UTC)

मी टाकलेली चित्रे[संपादन]

मी बाहेरगावी जातांना कॅमेरा बरोबर असतो.चांगली व विकिपीडिया च्या दृष्टीने उपयुक्त वाटली ती चित्रे काढतो व तेथे टाकतो.मला पूर्ण कल्पना आहे कि ती चित्रे विकिपीडियाच्या मानकांप्रमाणे नाहीत.कारण माझेपाशी असलेल्या कॅमेर्‍याची क्षमता पुरेपूर नाही.तरीही, केवळ नुसता लेखांचा मथळा असेल त्यापेक्षा ओबडधोबड कां होइना,चित्र असले तर तेथे भेट देणार्‍यास काही ना काही तरी कळेल या हेतूपोटी मी चित्रे टाकत असतो.पहा-कोयताकोणासही, (विकिपीडियाच्या नीतीप्रमाणे) ती वगळण्याचा/बदलण्याचा हक्क आहेच.काही वनस्पतींची चित्रे, कोणी ती वनस्पती ओळखुन त्याचे चित्र काढुन ती येथे टाकेल, अशी शक्यता मलातरी कमीच वाटते. मी टाकलेल्या चित्रांपेक्षा चांगली चित्रे टाकणार्‍यांचे नेहमी स्वागतच आहे. सहज मनात विचार आला म्हणुन लिहीत आहे. वि. नरसीकर (चर्चा) ०४:५१, २६ डिसेंबर २००९ (UTC)


नमस्कार, आपल्या कालच्या चर्चेच्या अनुषंगाने. . . मला अजिबात राग आलेला नाही. कृपया आपण तसे काही वाटून घेऊ नये. ग्रामीण भागात सर्व माध्यमांचा उपयोग झाला पाहिजे असे मलाही वाटते. त्यासाठी वृत्तपत्रे, स्थानिक संस्था (एन. जी. ओ.) यांच्या मदतीने पुढे जाता येईल. तसा एक प्रयत्न आमच्या येथे नुकताच सुरू करण्यात आला आहे. मुक्तपणे संगणकाचा वापर करता यावा म्हणून ई-चौपालच्या धर्तीवर एक प्रयत्न येथे सुरू करण्यात आला आहे. यात मुला-मुलींना संगणकाचे कोणतेही प्रशिक्षण न देता, नियम न ठरवता आणि मुक्तपणे संगणक हाताळता यावा म्हणून सार्वजनिक ठिकाणी असे केंद्र उभारण्यात आले आहे. तुम्ही, अभय आणि समस्त मित्रमंडळी नेहमीच सोबत असल्याने खूप बरे वाटले. यापुढेही या विषयावर देवाण-घेवाण होत राहावी आणि त्यातून सगळ्यांना उपयोगी पडेल असे काहीतरी निघावे. तुम्ही सगळे नेहमी चांगल्यासाठीच प्रयत्नशील आहात त्यात मला जमेल तसे योगदान देण्यास मी तयार आहेच. Gypsypkd ०५:२१, २६ डिसेंबर २००९ (UTC)

मार्गदर्शन[संपादन]

नमस्कार, मी नवीन धूळपाटी बनवली आहे, त्यात बॅकग्राऊण्ड कलर कसे देतात याबद्दल माहिती हवी. तसेच तयार केलेल्या दोन टेबलपैकी कोणता चांगला (लेखात फोटो असल्याने जागा जास्त लागते असे मला वाटते) आणि याप्रमाणे लेख तयार झाल्यावर नाव काय ठेवावे, मार्गदर्शन व्हावे. Gypsypkd ०७:१३, २८ डिसेंबर २००९ (UTC)

नि:संदिग्धीकरण व 'साचा:पाहा'[संपादन]

नमस्कार! तुम्ही शब्दकोश (निःसंदिग्धीकरण) या लेखामध्ये 'शब्दकोश' या लेखाशी संबंधित काही नोंदी केल्या असल्याचे दिसले. या नोंदी खरे पाहता नि:संदिग्धीकरणापेक्षा संबंधित/पूरक लेखांच्या दिसताहेत. एखाद्या लेखाशी सबंधित इतर पूरक लेखांची यादी नोंदवण्यासाठी त्या लेखात खालील उपविभागांत 'हेही पाहा' असा स्वतंत्र उपविभाग बनवून त्यात ही यादी द्यावी किंवा साचा:पाहा हा साचा ('साचा:हा लेख' या साच्याऐवजी) वापरावा.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०६:४३, २९ डिसेंबर २००९ (UTC)

लॉ कॉलेज नमुना पत्रात काही किरकोळ दुरुस्त्या केल्या आहेत.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०९:१२, ३० डिसेंबर २००९ (UTC)

प्रचालकपद[संपादन]

माहितगार,

आज (जानेवारी १, २०१०) पासून तुम्ही मराठी विकिपीडियावर प्रचालक आहात. अभिनंदन आणि वाढीव जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळण्यासाठी शुभेच्छा.

अभय नातू २०:३६, १ जानेवारी २०१० (UTC)

कृपया माझेपण अभिनंदनाचा स्विकार करावा.मनःपुर्वक अभिनंदन.उत्तरोत्तर अशीच प्रगती राहो. वि. नरसीकर (चर्चा) ०३:०२, २ जानेवारी २०१० (UTC)

हे चित्र जमले काय कृपया बघा.

वि. नरसीकर (चर्चा) ०७:१९, २ जानेवारी २०१० (UTC)

प्रकल्पःबावन्नकशी २०१०[संपादन]

मराठी विकिपीडिया मध्ये २०१० या वर्षात सामुहिक प्रयत्नांनी भर घालण्यासाठी एक प्रयोग म्हणून प्रकल्पःबावन्नकशी २०१० हा प्रकल्प कसा राहील. आपले मत, सुचना व दुरुस्त्या हव्या आहेत. गणेश धामोडकर ०४:४९, ५ जानेवारी २०१० (UTC)

प्र: इमेल कँपेनच्या दृष्टीने तांत्रीक सहाय्य हवे[संपादन]

माहितगारजी, जर जावास्क्रीप्ट विरोपातील html मध्येच असेल आणि ईमेल-प्रणाली जावास्क्रीप्ट चालवण्यास निर्बंध घालत नसेल तर तुम्हाला ते पान जसेच्या तसे वापरता येइल. - कोल्हापुरी ०६:१८, ५ जानेवारी २०१० (UTC)

नमस्कार. प्रताधिकारीत चित्रांच्या अनुमतीसाठी पाठवावयाच्या ई-मेलचा मसुदा कोठे मिळेल?कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती. सध्या व्यस्त आहात काय? दिसले नाही. वि. नरसीकर (चर्चा) ०७:१७, ६ जानेवारी २०१० (UTC)

global sysops proposal[संपादन]

याचे भाषांतर करावयाचे आहे काय? कृपया कळविणे. वि. नरसीकर (चर्चा) ११:०४, ८ जानेवारी २०१० (UTC)

विकिरजा[संपादन]

प्रकृत्ती अस्वास्थ्यामुळे येते काही दिवस उपलब्ध नाही क्षमस्व माहितगार ०६:०१, ९ जानेवारी २०१० (UTC)

प्रकृतीची काळजी घ्या हे सांगणे नलगे. वि. नरसीकर (चर्चा) ०६:२४, ९ जानेवारी २०१० (UTC)

विकिपीडिया:धूळपाटी हे पान आपल्या सावकाशीने(तब्येत ठिक झाल्यावर) बघा.कोणीतरी याचे मुळ पान अनेकवेळा copy and paste केले आहे. ते मुळ स्थितीत आणावे असे वाटते.त्याने यानंतर पुन्हा येणारे सदस्य confuse होणार नाहीत. नविन सदस्य या पानास भेट देत आहेत हे ही नसे थोडके.

वि. नरसीकर (चर्चा) ०३:३५, १२ जानेवारी २०१० (UTC)


कृपया मला गुलाब मध्ये gallery करुन देण्यास मदत करा. वि. नरसीकर (चर्चा) १६:४८, १२ जानेवारी २०१० (UTC) kam jhale वि. नरसीकर (चर्चा) १७:१६, १२ जानेवारी २०१० (UTC)

प्रताधिकारमुक्त करत असल्याचे नोंदवा[संपादन]

कसे नोंदवावे.काही साचा आहे का त्यासाठी? विनोद रकटे ०७:३३, १३ जानेवारी २०१० (UTC)


कृपया साचा:प्रताधिकारसूचना बघा. यात मी आवश्यक ते बदल केले आहेत.विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे/चित्र प्रताधिकार/सदस्यचर्चा या लेखातही तोच साचा लावल्यास ते योग्य होईल असे मला वाटते. त्यात अर्थ अधिक सुस्पष्ट केला आहे.

वि. नरसीकर (चर्चा) १२:०५, १३ जानेवारी २०१० (UTC)


प्रताधिकार सूचना आणि विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे यात सहभागी होण्याचे निमंत्रण[संपादन]

नमस्कार, Mahitgar/जुनी चर्चा ३ आपण विकिपीडियावरील लेखात चित्रे- छायाचित्रे-किंवा संचिका विषयक जे योगदानाचे प्रयत्न केले आहे किंवा त्याविषयी रस दाखवला आहे त्याबद्दल धन्यवाद.

आम्ही, आपण चढवलेल्या अथवा चढवू इच्छित असलेल्या संचिका संदर्भात प्रताधिकार (Copyright) या अत्यंत महत्वपूर्ण आणि गंभीर विषयाकडे आपले लक्ष वेधू इच्छितो.

 • जर चढविलेले छायाचित्र स्वतः काढलेले असेल तर ते प्रताधिकारमुक्त करीत असल्याचे नोंदवा.


 • चित्र किंवा छायाचित्रावरील प्रताधिकार ज्या व्यक्तिचे किंवा विषयाचे आहे किंवा प्रकाशकाचे आहे त्यापलिकडे जाऊन चित्रकार किंवा छायाचित्रकाराचा त्यावर प्रताधिकार असण्याची शक्यता ध्यानात घ्या.
 • प्रताधिकार स्थिती नमुद केली नसेल तर मजकुर/ छायाचित्र प्रताधिकारीत समजावे. संबधीत व्यक्तिकडून/अधिकृत वारसदारांकडून लेखी प्रताधिकारमुक्तता पत्र मिळवल्याशिवाय येथे चित्र किंवा संचिका मूळीच चढवू नये.(हे चित्र आंतरजालावर इतरत्रही कुठेही उपलब्ध असेल तरीही हाच नियम लागू होतो)विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे प्रकल्पात सहभाग घेऊन आपण सहकार्य करू इच्छित असाल तर, कृपया [[दालन:]] आणि संबधीत प्रकल्प पानास भेट देऊन अधिक माहिती घ्यावी हि नम्र विनंती. पुन्हा एकदा धन्यवाद!माहितगार १३:११, १३ जानेवारी २०१० (UTC)

वेद विभागात वर्ग:ब्राह्मणे[संपादन]

वेद विभागात वर्ग:ब्राह्मणे असा आहे.खरं म्हणजे ब्राह्मणके वा ब्राम्हणके असा वर्ग असावा.

कळावे.

विनोद रकटे १०:१०, १५ जानेवारी २०१० (UTC)

श्रीधर व मनोरमा रानडे[संपादन]

ओके. मी आज उद्याला लेखांत भर टाकतो.

--दीप देवेंद्र नरसे १६:१५, १६ जानेवारी २०१० (UTC)

संचिका संबंधी[संपादन]

इतर विकिवरून चित्रे घेतल्यावर ती दिसत नाहीत.त्यामूळे ती मराठी विकिवर download करून परत चढवावी लागतात. का?

लेणी व खा-या पाण्याची सरोवरे वर्ग[संपादन]

लेणी संबधी वर्ग व खा-या पाण्यासंबधी सरोवरे असा नवीन आपण तयार करू शकता का?

कराड का क-हाड ?[संपादन]

वृत्तपत्र वाल्यांनीही हा घोळ घातलाय.मराठी नाट्य संम्मेलन भरविले म्हणून त्याना हा नामांतर अधिकार कोणी दिला ?आपले काय मत.

आंतरजालावरहि तिच माहीती आहे.

विनोद रकटे ०६:५७, २३ जानेवारी २०१० (UTC)

या लेखाबद्दल अतिउत्साह दाखविला याबद्दल माफि मागू इच्छितो,कारण माझ्यामुळे आपणही संभ्रमात पडलात.कृपया हा लेख वगळावा/काढून टाकावा.कराड मध्ये तो मी खुलासा केला आहे.

विनोद रकटे १६:०६, २६ जानेवारी २०१० (UTC)

मला याबद्द्ल अंबरनाथ तालुकाअंबरनाथ हे दोन वेगळे लेख निर्माण करायचे आहेत.एक लेख तालुका तर दुसरा हा रेल्वे स्थानक .हे लेख एकमेकांत स्थानंतरीत केले आहेत्.त्यामुळे काही करता येत नाही .आपण मदत करा.

विनोद रकटे १६:१३, २६ जानेवारी २०१० (UTC)

अनुवादण्याजोगे लेख[संपादन]

नमस्कार! गेल्या काही आठवड्यांत तुम्ही इंग्लिश विकिपीडियावरून काही लेख अनुवादण्यासाठी मराठी विकिपीडियावर हलवत आहात. याबाबत एक विनंतीपर सूचना मांडावीशी वाटते - शक्य असेल तितक्या मजकुराचा अनुवाद लिहून तेवढाच मजकूर विकिपीडियावर चढवावा. अन्य मजकूर कॉमेंट करून अदृश्य ठेवावा. याचे कारण असे, की असे बरेच लेख अनुवादाविना तसेच काही आठवडे/ काही महिने पडून राहण्याचा अनुभव येतो. दरम्यान, मराठी विकिपीडियावर जे वाचक येत असतील, ते मराठीतून माहिती वाचायला येत असणार; त्यांना इंग्लिश/ चिनी/ थाई भाषांमध्ये लिहिलेला मजकूर वाचायला मिळू लागला, तर मराठी विकिपीडियाच्या दर्जाबद्दल त्यांच्या मनांत गैरप्रतिमा बनण्याची शक्यता आहे. या गोष्टींचा विचार करून एतत्संदर्भात आपले धोरण राबवावे.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०१:५४, २९ जानेवारी २०१० (UTC)

नमस्कार[संपादन]

मराठी विकित अमिताव घोष नावाचा लेख चुकून कोणीतरी तयार केला असेल नंतर तो अमिताभ घोष (इंग्रजी लेखक) कडे पुनःनिर्देशितही केला. आता अमिताव घोष नावाचा (आर. बी. आय. माजी गव्हर्नर साठी) लेख तयार करावयाचा आहे, काय करावे? Gypsypkd १०:४५, १ फेब्रुवारी २०१० (UTC)

मुखपृष्ठ सदर : उदयोन्मुख लेख[संपादन]

नमस्कार! विकिपीडिया:चावडी#मुखपृष्ठ सदर : उदयोन्मुख लेख येथे 'उदयोन्मुख लेख' या नव्या संकल्पित मुखपृष्ठ सदराबद्दल सर्व विकिकर सदस्यांना जाहीर आवाहन लिहिले आहे. त्या आवाहनाला आपणही सकारात्मक व उत्साही प्रतिसाद द्यावा, अशी विनंती.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०१:३२, २ फेब्रुवारी २०१० (UTC)

उत्खनक (यंत्र)‎[संपादन]

कृपया उत्खनक (यंत्र)‎ बघा. आपणास प्रयुक्त संज्ञा मध्ये हेच अपेक्षित होते काय? मी केले ते बरोबर काय? वि. नरसीकर (चर्चा) १०:२०, २ फेब्रुवारी २०१० (UTC) धन्यवाद वि. नरसीकर (चर्चा) १३:३०, २ फेब्रुवारी २०१० (UTC)

रोडरोलर ला काय नाव द्यावे- रस्ता(रोड) ढकलदंड(रोलर) कि सरळच खडी दाबण्याचे यंत्र? वि. नरसीकर (चर्चा) १३:३३, २ फेब्रुवारी २०१० (UTC) धन्यवाद. बरेच दिवसांनी संपर्क झाला.बरे वाटले. लेखन वाचुन हसु पण नाही आवरले.लोभ का. ठे. वि. नरसीकर (चर्चा) १५:२८, २ फेब्रुवारी २०१० (UTC)

भाषांतर सुरु केले आहे. लवकरच संपवितो. वि. नरसीकर (चर्चा) ०८:४५, १७ फेब्रुवारी २०१० (UTC)

>म्हणजे मला स्वत:ची माझी माहिती भरणे अधिक सुकर होईल< मला आपला हा मुद्दा कळला नाही. वि. नरसीकर (चर्चा) ११:३३, १७ फेब्रुवारी २०१० (UTC)


येथे मी आतापर्यंत चढविलेल्या संचिकांसमोर Tags या रकान्यात untagged असा शेरा आहे.याबद्दल खुलासा करु शकाल काय? हा शेरा काढण्यासा ठी काय करावे. वि. नरसीकर (चर्चा) १५:५०, १७ फेब्रुवारी २०१० (UTC)

छोटी सूचना[संपादन]

नमस्कार! तुम्ही लिहिलेल्या काही लेखांमध्ये 'हे सुद्धा पहा' असे चुकीचे विभागशीर्षक लिहिल्याचे दिसले. कृपया हे शीर्षक 'हेही पाहा' असे दुरुस्त करावे. 'सुद्धा' हा स्वतंत्र शब्द नसून शब्दयोगी अव्यय आहे (आधीच्या शब्दाला जोडून लिहिले जाणारे अव्यय). त्यामुळे 'हेसुद्धा पाहा' ('पाहणे' - 'पाहा' हे अधिक पुरस्करणीय; 'पहाणे' - 'पहा' हे लेखन तितकेसे प्रमाण मानले जात नाही) हे लेखन योग्य ठरेल. परंतु याआधी विकिपीडियावरील बर्‍याच लेखांमध्ये 'हेही पाहा' असे शीर्षक असल्यामुळे, एकसंधपणासाठी तसेच लेखन अनुसरणे इष्ट ठरेल.

अन्य एक छोटी सूचना : अनुवादण्याजोग्या लेखांचे वर्गीकरण केलेल्या वर्गांतील लेखांचा संख्या सुमारे पावणेदोनशेंच्यावर पोचला आहे. त्याकडे लक्ष ठेवून संख्येपेक्षा शिल्लक अनुवादाच्या कामांना अधिक प्राधान्य देऊन त्यासाठीही प्रयत्न सुरू करावेत.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:०७, १८ फेब्रुवारी २०१० (UTC)


अभियंत्यास कोणतेही फिल्ड दुर्गम नसते असा सार्वत्रिक समज आहे.परंतु माझे तसे नाही.'डंगरा(म्हातारा) बैल न शेतीच्या न बैलगाडीच्या कामाचा.खायला कहार अन् भुईला भार' अशी इकडे विदर्भात एक म्हण आहे.समजा काय ते.

सांई ईतनाही दिजीए, जामे कुटुम समाय । मै भी भूखा न रहुं, और भी न भुखे रह पाय ॥ अशी माझी देवास प्रार्थना आहे. वि. नरसीकर (चर्चा) १७:००, २३ फेब्रुवारी २०१० (UTC)

कर्‍हाड[संपादन]

कृपया हा लेख वगळावा जेणेकरून कराड चे कर्‍हाड कडे स्थानांतरण करता येईल.विनोद रकटे

मदत हवी[संपादन]

सध्या "काम चालू " ह्या सदराखाली चालू असलेला लेख ":दाक्षिणात्य शब्द देवनागरीत लिहिताना नेहमी होणार्‍या चुका" ह्या लेखाबाबत आपण अशी सूचना केली होती "धूळपाटीवर स्थानांतरीत करण्याचाही विचार करा" ,ते नक्की कसे करतात व तसे केल्याने अधिक वाचकांपर्यंत ते पोहोचेल का? ह्या विषयी माहिती हवी होती.मी जरी बर्याच दिवसांपासून लिखाण (फक्त लिहिणे जतन करणे इतकेच.) करीत असलो तरी ह्या सर्व शब्दांशी अजूनही (इतर बाबींविषयी)अपरिचित आहे.तेव्हा मार्गदर्शन करावे.


कुठे आहात?[संपादन]

एवढ्यात दिसला नाहित. काय सुरु आहे? वि. नरसीकर (चर्चा) ०९:३६, ९ मार्च २०१० (UTC)


सूचना:

तुमच्याकरिता कुणी वाफाळलेला चहाचा कप भरला आहे .


बदल केला आहे.विचार कळवा.चर्चा हि पाहणे. विनोद रकटे.


काही विशेष नाही. बरेच दिवसांनी दिसलात म्हणुन फक्त सादर नमस्कार.लोभ कायम आहेच. वि. नरसीकर (चर्चा) १०:३४, २५ मार्च २०१० (UTC)


विकिपीडिया:धूळपाटी२४ येथे लिहिलेल्या लेखास धुळपाटी न वर शेवटी नेउन तेथे दुवे टाकलेले आहेत .तो बघुन हवा असल्यास कॉपी पेस्ट करावा.आपण व्यस्त दिसता म्हणुन हे काम केले.

वि. नरसीकर (चर्चा) १६:२०, २५ मार्च २०१० (UTC)

कोकीळ[संपादन]

मी कोकिळेचा आवाज मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आहे.तो (.wav) या sound file च्या format मध्ये आहे. मला तो कोकीळ या लेखात आवाजाची फाईल टाकायची आहे. कृपया याबाबत मार्गदर्शन करावे ही विनंती. मी एक प्रयत्न केला होता पण तो फसला. वि. नरसीकर (चर्चा) १०:५५, २ एप्रिल २०१० (UTC)

काम झाले. वि. नरसीकर (चर्चा) १४:५७, २ एप्रिल २०१० (UTC)

विकिपीडिया:धूळपाटी२४ आणि मराठी पारिभाषिक संज्ञा आणि संज्ञावली कोश[संपादन]

शुद्धलेखन तपासले आहे. अगदी किरकोळ सुधारणा कराव्या लागल्या.

अभय नातू ०२:४५, ३ एप्रिल २०१० (UTC)

सादर नमस्कार[संपादन]

अहो महाराज ! आजकाल दिसत नाहीत. आमच्यासारख्यांचे कसे होणार?

वि. नरसीकर (चर्चा) १४:२९, २० एप्रिल २०१० (UTC)

महाराष्ट्रच्या जिल्हा[संपादन]

There is a very good collection of articles related to the districts of Maharashtra in Marathi at DES website. The files in pdf can be converted using webdunia conversion tool to convert CDAC (DVB TT Surekh) to unicode. I think these are very good reference materials to elaborate articles about the districts of Maharashta. --Eukesh १३:३३, ५ मे २०१० (UTC)

नमस्कार जरा या भागाकडे पण पहा.विनोद रकटे ०१:०७, ११ मे २०१० (UTC)

येथे मला मदत हवी .विनोद रकटे ०१:४८, ११ मे २०१० (UTC)

संपादनांची मोजणी[संपादन]

विकिपीडिया:जाणते या पानावरील कृपया count_edits येथे बघा. ही त्रुटी दुरुस्त करण्यास मदत करा ही विनंती.

वि. नरसीकर (चर्चा) १०:५७, ११ मे २०१० (UTC)

एक बदल[संपादन]

नमस्कार, बर्‍याच दिवसांनी दिसले, एवढ्यात खूप व्यस्त आहात का? असो. आर. के. नारायण यांच्या मृत्यूची नोंद दि. १४ मे या दिवसाच्या मृत्यू नोंद मध्ये झालेली दिसते, त्यांच्या मृत्यूची तारीख १३ मे अशी आहे. मराठीसह इंग्रजी विकितही तशीच नोंद आहे.
या वर्षीचे विदर्भ स्तरीय पक्षीमित्र संमेलन पांढरकवडा येथे डिसेंबर मध्ये आयोजीत केले जाणार आहे. यासाठी विकिमित्रांनाही आमंत्रण द्यायचे आहे. विकि चावडीवर तसे लिहिले तर चालेल का? संमेलनात विकिसाठी सहभाग असा विषय मांडता येईल का? Gypsypkd ०५:१३, १४ मे २०१० (UTC)

काही नाही. फक्त नमस्कार. वि. नरसीकर (चर्चा) १०:०२, १८ मे २०१० (UTC)

मार्गदर्शन[संपादन]

सदस्य:Sarang Ratnalikar यांना मार्गदर्शन हवे आहे.त्यांना आपल्या सवडीने जमेल तशी मदत करा ही विनंती.

वि. नरसीकर (चर्चा) ०३:१४, २० मे २०१० (UTC)

जोडाक्षरे[संपादन]

अचानक जोडाक्षरे हलन्त दिसणे सुरु झाले आहे. हा माझ्या ब्राउजर चा दोष आहे वा विकिपिडियावरील दोष आहे हे कृपया कोणी तज्ञ तपासुन सांगेल काय? मी आभारी राहील.

वि. नरसीकर (चर्चा) ०६:१६, २३ मे २०१० (UTC)

धन्यवाद[संपादन]

मला जे यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे केले व ऍन्टी व्हायरस रन केल्यावर ते जमले. बहुदा माझ्या बाउजरमध्ये प्रोब्लेम होता असे वाटते.मला वाटले विकिपीडिया मध्ये प्रोब्लेम् आला काय? वि. नरसीकर (चर्चा) ०७:५५, २३ मे २०१० (UTC)

नमस्कार, लेखन/संपादन/भाषांतराचे प्रयत्न करतो. प्रा.डॊ.दिलीप बिरुटे १३:४४, २५ मे २०१० (UTC)

मी येथे सुमारे ५०० लोकांची यादी बघितली. दुर्दैवाने तसे कोणी मराठी सापडले नाहीत.

वि. नरसीकर (चर्चा) ०८:३०, ३ जून २०१० (UTC)

एक हलंत शब्द दर्श्विणारी संचिका चढविली आहे.(ma1.JPG) जमत असल्यास कृपया साच्यात वापरा. वि. नरसीकर (चर्चा) ०७:२९, ४ जून २०१० (UTC) कृपया धुळपाटी नही बघा. वि. नरसीकर (चर्चा) ११:०९, ४ जून २०१० (UTC)

हिंदी --> मराठी भाषांतर[संपादन]

हिंदी भाषेतुन मराठी भाषेत भाषांतर हवे असा {{भाषांतरहिंम}} या सारखा साचा करुन हवा आहे.मी प्रयत्न करतो आहे.कृपया मदत करा ही विनंती.

वि. नरसीकर (चर्चा) ०२:४६, ५ जून २०१० (UTC)


तसा साचा पूर्वीच उपलब्ध आहे. तो सापडला.तसदीबद्दल क्षमस्व. वि. नरसीकर (चर्चा) ०२:५७, ५ जून २०१० (UTC)

साचा:भारतातील विमानतळ[संपादन]

आपणास थोडी तसदी देत आहे.कृपया साचा:भारतातील विमानतळ हा बघावा. अद्याप तो अपूर्ण आहे.तो ठिक बनत आहे काय ते कृपया कळवावे ही विनंती.हा माझा प्रथमच प्रयत्न आहे म्हणुन विचारत आहे.पूर्वीच धन्यवाद देतो. वि. नरसीकर (चर्चा) १३:३१, ७ जून २०१० (UTC)

काम सुरु आहे. वि. नरसीकर (चर्चा) १३:५१, ७ जून २०१० (UTC)

माझ्या मते काम पूर्ण झाले आहे. कृपया साचा बघावा.बिलासपूर विमानतळ या लेखात लावला आहे. वि. नरसीकर (चर्चा) १०:५६, ८ जून २०१० (UTC) धन्यवाद . उद्या विकिवर माझे एक वर्ष पूर्ण होईल.सात हजार संपादनांचा टप्पा गाठत आहे. आज तो पूर्ण होईल. दररोज सुमारे १९.०१९ संपादनांच्या सरासरीने या ३६५ दिवसात संपादने पूर्ण केली आहेत.आपले, अभय व संकल्पचे वारंवार मार्गदर्शन लाभले त्यानेच हे शक्य झाले. साचा प्रकारात पारंगतता नव्हती. ते काम नुकतेच सुरु केले आहे. जमेल काही दिवसांनी. आपणा सर्व विकिकरांना मनःपूर्वक धन्यवाद.

वि. नरसीकर (चर्चा) ११:३६, ८ जून २०१० (UTC)

विकिकोट[संपादन]

नमस्कार, विकिकोट मध्ये थेट मराठीत टाईप करणे शक्य नसल्याने मराठी विकिवर उपलब्ध असलेल्या धुळपाटी वर लिखाण करून नंतर ते विकिकोट किंवा अन्यत्र हलविले तर चालेल का? सध्या मराठीवर लिखाण करण्याचा कंटाळा आला आहे (माझ्या हिशोबाने भरपूर लिखाण झाले काही मर्यादा असू शकत नाही हे मान्यच). कामात काहीतरी बदल करावा वटल्याने विकिकोटचा विचार करीत होतो. तुम्ही वेळोवेळी मदत करत आलात उपचार म्हणून नव्हे तर मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो, तुम्ही विकिवर अन्यत्रही असल्याने अशीच मदत तेथेही कराल अशी खात्री आहे. Gypsypkd १०:४७, ८ जून २०१० (UTC)

सदस्य:Apurva यांना विकिमार्गदर्शक हवा आहे. कृपया हेच पान बघा.

वि. नरसीकर (चर्चा) ०७:३६, १८ जून २०१० (UTC)

विकिक्वोट[संपादन]

नमस्कार, मी काही लेख संपादनास सुरू केले आहेत. सध्या फक्त लेख, वर्गीकरण, चित्रे या प्राथमिक अवस्थेतूनच मी जात आहे. तुम्ही एकदा पाहून काही उणे-अधिक असल्यास सांगावे, मग त्याप्रमाणे पुढे जाता येईल. Gypsypkd १२:१३, १८ जून २०१० (UTC)

मार्गक्रमण साचे महत्वाचे बदल[संपादन]

नरसीकर यांनी तयार केलेला साचा {{भारतातील विमानतळ}} मध्ये काही errors येत होते. थोडी माहिती घेतल्यास असे दिसले कि

ह्या साच्यात केलेले बदल (संदर्भ : इंग्लिश विकि) मराठी विकि वर झाले नव्हते. मी ते सध्या केले आहेत.

काहि formating errors आहेत, माझ्या मते Common.js मध्ये काहि बदल, update जरूरी आहेत.

जर मी केलेले बदल अपेक्षित नसतील तर उलटवावे लागतील.

Maihudon ०९:२६, २१ जून २०१० (UTC)

साचा-अविशिष्ट उपपान[संपादन]

साचा:अविशिष्ट उपपान/doc हे पान तयार केल्यावर, साचा:अविशिष्ट उपपान यातील त्रुटी दुर होईल असे वाटते.

वि. नरसीकर (चर्चा) ०७:३५, २३ जून २०१० (UTC)

प्रचालक होण्यासाठी अर्ज / कौल[संपादन]

नमस्कार, Gypsypkd यांचेसाठी कौल देण्यास त्यांनी चावडीवर विनंती केल्याप्रमाणे, Wikiquote:कौल हे पान नीट उघडत नाही.माझा कौल q:Wikiquote चर्चा:Administrators येथे नोंदविला आहे. चालेल नं. कृपया मदत करा ही विनंती. थोडा त्रास देत आहे.

वि. नरसीकर (चर्चा) ०७:२०, २४ जून २०१० (UTC)


जमेल तेवढे भाषांतर केले आहे. 117.198.73.72 १०:३९, २४ जून २०१० (UTC)

योग्य लेखनाव[संपादन]

'भारतातील समुद्री बंदरांची यादी' 'भारतातील बंदरांची यादी' 'भारतातील समुद्री तळांची यादी' यापैकी कोणते नांव लेखास योग्य राहील कृपया कळवावे.संकल्प व अभयलापण हीच पृच्छा करीत आहे.

वि. नरसीकर (चर्चा) ०९:४७, २८ जून २०१० (UTC)


== मला माझ्या स्वतः च्या ब्लॉग वरील मचकुर येथे वापरता येईल का? ==असे सदस्य ppg11 यांनी विकिपीडिया मदतकेंद्र येथे विचारणा केलेली आहे. त्यांना मदत करावी ही विनंती.

वि. नरसीकर (चर्चा) ११:०९, १ जुलै २०१० (UTC)

विकिमेनिया २०१०[संपादन]

विकिमेनिया २०१० हा लेख अद्याप बनवायचा राहिला आहे.तो दुवा लाल दिसत आहे.यात कृपया मदत करा ही विनंती. हवे असेल तर मी भाषांतर करतो.

वि. नरसीकर (चर्चा) ०७:४५, २ जुलै २०१० (UTC)

Count_edits[संपादन]

 • सवड मिळाल्यास येथे आवश्यक तो बदल करावा ही विनंती.
 • आपण ३०,००० लेखांच्या टप्प्याला पोचण्यास फक्त १५ लेख बाकी आहेत.

वि. नरसीकर (चर्चा) ११:३३, २ जुलै २०१० (UTC)

३० हजारी अभिनंदन[संपादन]

नमस्कार माहितगार, हार्दिक अभिनंदन ३०००० चा आकडा ओलांडला.मराठी विकिपीडिया अशीच उत्तरोत्तर अनेक हजारी टप्पे पार करो आणि पहिल्या दहात आपले स्थान निर्माण करो अशी अपेक्षा आणि शुभेच्छा! अर्थात माझ्यासारख्या खारी आहेतच :)ते साध्य करायला. क.लो.अ.चे.प्रसन्नकुमार १३:४१, २ जुलै २०१० (UTC)

मुखपृष्ठाधिकार[संपादन]

मुखपृष्ठाधिकाराचे काय झाले? माझ्या चर्चा पानावर मी प्रतिसाद दिला आहे. किंवा चावडीवरही हा विषय चर्चेला घेता येईल. इतर सदस्यांची मतेही कळतील. काम उगाच खोळंबले आहे. सौरभदा ०७:१८, ६ जुलै २०१० (UTC)

विकिपीडिया:जाणते[संपादन]

 • माझ्या माहितीप्रमाणे व आठवणीप्रमाणे आपणच येथे count_edits हा दुवा टाकला आहे.मी याबद्दल अनभिज्ञ आहे.ते कसे सुरळीत करावे हे मलापण माहित नाही.
 • आपण दिलेल्या कवितेचा उतारा मलापण आवडतो.
 • सध्या व्यस्त आहे. परत आल्यावर मग माझेपासुन सुरुवात करणार आहे. मी केलेल्या सर्व संपादनांचे पुनर्निरिक्षण करुन त्यातील त्रुटी आधी दुर करुनच मग पुढे लेख टाकण्यास सुरुवात करीन असा विचार आहे.एव्हाना थोडाफार अनुभव जमेस आहे त्याचा वापर करील. पूर्वी अनुभव नव्हता तेंव्हा अनेक चुका झाल्या असाव्या असा अंदाज आहे.

वि. नरसीकर (चर्चा) १०:२४, ६ जुलै २०१० (UTC)

कौतुक[संपादन]

एंजल हार्ट

नमस्कार, तुम्ही वेळातवेळ काढून नेहमीच सगळ्यांना मदत करीत आला आहात. आभार व्यक्त करण्यासाठी सगळ्यांच्या वतीने हा एंजल हार्ट बार्नस्टार देत आहे. तसेच तुम्ही पूर्वीच ११,००० संपादने पार केली आहेत. पण मला आज कळले, उशीर झाला आहे, गोड मानून कृपया स्वीकार व्हावा. (लहान तोंडी - तर होत नाही ना) Gypsypkd ०५:३७, ७ जुलै २०१० (UTC)

 • नमस्कार, autographs प्रताधिकार मुक्त असतात का? माझ्या मते असायला पाहिजे. असतील तर माझ्या जवळ असलेले, मी स्वतः गोळा केलेले autographs विकि कॉमन्सवर चढवू का? यात डॉ. नारळीकर (अत्यंत दुर्मिळ), पं. हृदयनाथ मंगेशकर, कै. मोहन गोखले, प्रभाकर पणशीकर आदी प्रमुख मंडळी आहेत. इंग्रजी विकित अशा प्रकारे सह्या असलेले लेख आढळतात. (उदा. Stephen Hawking). जर autographs ना हरकत नसेल तर कॉमन्स वर वेगळे वर्गीकरण केले तर इतरांनाही त्यांच्याजवळील autographs तेथेच चढवायला सोयीचे होईल.
 • विकिक्वोट वर मराठी भाषा वापरण्यासाठीची सोय आपणच करू शकतो का? इतर कोणाची मदत लागेल का? Gypsypkd ०४:५८, ८ जुलै २०१० (UTC)

आपण सुचविलेली सूचना प्रार्थनिय आहे[संपादन]

नमस्कार, ११ जानेवारी २०१० रोजी आपण चित्र हवे या मथळ्याखाली दिलेली सूचना प्रार्थनिय आहे.मी आपणास सांगु इच्छितो की, मी तिच चित्रे इथे देतो ज्यांचे सर्व हक्क माझ्यापाशी असतात. प्रताधिकार विषयाबद्दल मी जागरुक आहे. मी आपला आभारी आहेच, परंतु आपण मला वेळोवेळी सहकार्य कराल अशी आशा आहे.सदस्य:अधांतर ०२:१०, ८ जुलै २०१०

दालनाविषयी[संपादन]

धन्यवाद माहितगार,आपण दिलेली माहिती खूप उपयुक्त आहे आणि आपण जे दालनाविषयी विचारले आहे तर माझेही मत "अभय नातू" ह्यांच्यामताशी सहमत आहे "दालन " हेच शिर्षक योग्य वाटते कारण नुसतेच प्रवेशद्वार म्हणजे एखाद्या दूव्याप्रमाणे(किंवा लेखसंग्रहाचे "मुखपृष्ठ" इतकाच अर्थबोध होतो) भासते त्याउलट दालन म्हणजे अनेक विभाग असलेले लेखसंग्रह किंवा विविध विषयांवर सर्वंकष माहिती लेखांची मालिका असू शकते तेव्हा अधिक काही न बोलता दालन हा भारदस्त आणि काहीसा राजेशाही शब्दप्रयोगच आपण वापरूयात असे मला वाटते.क.लो.अ.चे.प्रसन्नकुमार १७:०९, ९ जुलै २०१० (UTC)

 • नमस्कार, मी चावडीवर आणि कौल विभागात प्रचालकपदासाठी विनंती केली आहे कृपया आपली प्रतीक्रिया कळवावी.धन्यवाद.செ.प्रसन्नकुमार ०४:४४, १२ जुलै २०१० (UTC)

अंकपत्ता[संपादन]

आधी मी तसे करीत होतो.अनामिक सदस्यांचेही स्वागत करीत होतो.(बराच वेळ उलटल्यावरही-कालचेही). सध्या मी ते बंद केले आहे. अनामिक सदस्याने केलेले बदल, 'फरक' मध्ये बघुन, त्याचे लिखाणाचे स्वरूप बघुन,तो सदस्य झाल्यास विकिचा फायदाच होईल या भावनेने त्याचे स्वागत करीत असतो. ते एखादेवेळेस वाया जाईलही. परंतु त्यामागे ती भावना असते. तथापी,आपल्या म्हणण्याची मी नोंद घेतली आहे.स्थितप्रज्ञस्य....मध्येही ते वाचले.

वि. नरसीकर (चर्चा) ०९:०२, १५ जुलै २०१० (UTC)

आभार[संपादन]

आभारी आहे. कृपया तो साचा एकदा बघावा. वि. नरसीकर (चर्चा) १०:५६, १५ जुलै २०१० (UTC)

संपादनसंख्येनुसार साचे[संपादन]

नमस्कार!

आपण सुचवलेला उपक्रम अगदी योग्य आहे. त्या साच्यांवर काम करून सुधारणा नोंदवेन.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १३:११, १५ जुलै २०१० (UTC)

सदस्य संपादनसंख्या बार्नस्टार[संपादन]

हे पहा

बार्नस्टार-संपादने-एकहजार

विकिपीडिया गौरव संचिका

अभय नातू १६:४१, १५ जुलै २०१० (UTC)

विकिक्वोट[संपादन]

नमस्कार, तुम्ही, कोल्हापुरी यांनी सुचविल्याप्रमाणे मी तिन्ही पाने विकिक्वोट येथे कॉपी पेस्ट केली, अजुन तरी तेथे मराठीची सोय झालेली नाही. काही चुकले, राहिले का? Gypsypkd ०५:३६, १७ जुलै २०१० (UTC)

सर्वांनी शक्यतो एकाच प्रकारचे ब्राऊझर वापरल्यास[संपादन]

नमस्कार,मी गेले काही दिवस ब्राऊझर बदलून पाहिले आणि अस लक्षात आल कि बर्याचदा ब्राऊझर मुळे त्यांच्यातील क्लिष्ट सेटिंग्समुळे आपले घोळ होतात व मराठी भाषाटंकलेखनात चुका होतात हे सर्व टाळण्यासाठी माझी सर्वांना अशी विनंती आहे कि त्यांनी जर एकाच प्रकारचे ब्राऊझर वापरले तर निर्माण होणार्या तांत्रिक अडचणी चर्चाकरून ताबडतोब मार्गी लागतील आणि त्यावरील टूल्स इतरांना समजून सांगता येतील.बघा आपला काय विचार आहे ,मी आत्ता फक्त तुम्हालाच हा संदेश पाठवित आहे आपण तो सर्वांपर्यंत चर्चेदरम्यान पोहोचवाल अशी आशा करतो.शक्यतो सर्वच प्रचालकांनी एकाच प्रकारचे ब्राऊझर वापरून काम करण्यास काहीच हरकत नसावी असे मला वाटते.

 • माझा सल्ला असा असेल : मी सध्या गूगल चे क्रोम हे ब्राऊझर वापरतो त्यातील प्रमुख वैशिष्ट्य त्यांच्या संकेतस्थळावर दिली आहेतच ती अवश्य पहावी.मला जाणवलेले फायदे
 1. इंस्टॉल करण्यास अत्यंत सोपे,कमीत कमी रिसोर्स वापरून काम होते,अगदीच हलके.
 2. इंटरफेस सोपा आणि सुटसुटीत वापरण्यास सुलभ.
 3. गूगल सारख्या अत्यंत जलद आणि प्रगत शोधयंत्राशी संबंधीत प्रणाली.
 4. आवश्यक लिंक्स ताबडतोब हायलाईट होतात.
 5. कोणतेही अनावश्यक व माहित नसलेले टूल्स आपल्या माहिती शिवाय इंस्टॉल होत नाहीत.
 6. मराठी भाषेत संपूर्ण इंटरफेस उपलब्ध.
 7. नंतर कधीही गूगल मराठी टायपिंग सपोर्ट टूल्स,इंग्लिश-देवनागरी कनव्हर्जन टूल्स इ.भाषेविषयक टूल्स मोफत इंस्टॉल करता येतात.
 8. विकिशी संबंधीत अनेक टूल्स मोफत उपलब्ध आहेत.
 9. सर्वात जलद/वेगवान ब्राऊझर असावे.(Google Chrome in English/Marathi)

ह्यावर आता आपण आपले मत कळवावे..செ.प्रसन्नकुमार ०७:००, १७ जुलै २०१० (UTC)

क्षमा असावी माझे मत याच्या अगदीच विरूद्ध टोकाचे आहे.मराठी विकिपीडियाच्या किमान प्रचालकांनी जास्तीत जास्त ब्राऊजर प्रकार, वेगवेगळ्या Operrating Systems, आणि स्क्रिन रिझोल्यूशन्स शी संपर्कात असणे आणि विवीध .js, .css त्वचा, सुविधा या सर्व ब्राऊजर प्रकार, वेगवेगळ्या Operrating Systems, आणि स्क्रिन रिझोल्यूशन्स सुगमपणे उपलब्ध होतील हे पहाणे गरजेचे आहे.
विकिपीडीयास कधीही संपादन न करणा असा सुद्धा मोठा वाचक वर्ग आहे जो वेगवेगळे ब्राऊजर प्रकार, वेगवेगळ्या Operrating Systems, आणि स्क्रिन रिझोल्यूशन्स वापरत असतो आणि प्रचालकांनी केवळ संपादकांचाच नव्हे तर वाचंकाचाही विचार करणे गरजेचे असते.या अनोळखी वाचक वर्गावर आपण इथले नियम लादू शकत नाही.किमान आज घडीलातरी जगातील कोणत्याही संकेतस्थळाचा वेबमास्टर आपण म्हणता तसा एकच ब्राऊजर वापरण्याचा विचार सुद्धा मनात आणू शकत नाही.
शिवाय आजही साठ टक्केच्यावरून मराठी लोक मराठी टंक प्रस्थापित करण्यास अक्षम किंवा नकार देणारे आहेत त्यांना संकेतस्थळांक्डून टंकन सुविधा प्राप्त करून हवी असते. आपण येथे सध्या उपलब्ध केलेली टंकन व्यवस्था मराठी विकिपीडिया सदस्यांनी अभय नातूंचे तांत्रीक दृष्ट्या तज्ञ महत्वपूर्ण विरोधीमत बाजूस ठेवत हि सुविधा practicality करिता उपलब्ध करून घेतली आहे या बद्दल मागे अत्यंत सविस्तर चर्चा झाल्या आहेत आणि सध्यातरी उपलब्ध केलेली टंकन सुविधा मागे घेणे शक्य होईल असे वाटत नाही.
याचा अर्थ आपण गूगल क्रोम वापरू नये असे नाही.तर गूगल क्रोमवर वापरताना आपल्याला कोणत्या अडचणी येतात आणि आपण न वापरत असलेल्या पण विकिपीडियाचे इतर वाचक/सदस्य यांना एखादी सुविधा वापरताना गूगल क्रोम वर काय अडचणी येत आहेत येण्याची शक्यता आहे आणि त्यावर उतारा काय (सगळ्यांनी एकाच मापाचा यूनिफॉर्म घालण्याचा उपाय सोडून); उदाहरणार्थ आपण गूगल क्रोम वापरतच आहात तर त्यावर मराठी विकिपीडियाची टंकन सुविधा वापरता येत आहे का हे माहित करून हवे होते .
पुढे सवडी नुसार अजून लिहिणार आहे.माहितगार ०८:३२, १७ जुलै २०१० (UTC)

नविन ब्राऊझर वापरून पहा[संपादन]

विकिक्वोट[संपादन]

नमस्कार, आजचा दिवस बहुदा विविध ब्राऊजरशी संबंधितच असावा. विश्वास ठेवा (१) तुमचा संदेश आल्याचे (नवा संदेश) मला पिवळ्या पट्टीने सुचीत झाले नाही. (२) इंटरनेट एक्सप्लोरर, गुगल क्रोम, फायरफॉक्स असे तिन्ही ब्राऊजर आळीपाळीने वापरून पाहिले, रिफ्रेश केले, सिस्टम बंद करून पाहिली, काहीच फरक पडला नाही. आणि अचानकच आता तिन्ही ब्राऊजर मध्ये देवनागरी ऑप्शन दिसले. मराठीत काम करण्यासाठी तुम्ही आणि कोल्हापुरी यांनी मदत केली म्हणूनच ते शक्य झाले. Gypsypkd १०:४९, १७ जुलै २०१० (UTC)

विकिमार्गदर्शक[संपादन]

सदस्य:Abhishikt यांना विकिमार्गदर्शक हवा आहे. तशी त्यांनी त्यांचे सदस्यपानावर विनंती केली आहे.

वि. नरसीकर (चर्चा) ०३:३९, २१ जुलै २०१० (UTC)

वर्ग:Speedy deletion requests[संपादन]

Hello,

It seem there is some work for sysops at वर्ग:Speedy deletion requests ;o)

Regards

--Hercule २३:१८, २२ जुलै २०१० (UTC)