Jump to content

सदस्य चर्चा:Deepak13066

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
   स्वागत Deepak13066, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन Deepak13066, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,८२८ लेख आहे व १६२ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : आडव्या तीन रेषांचे चिन्हावर पुर्ननिर्देशन आणि वर्गीकरण अशा काही सुविधा उपलब्ध होतात


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

कॉपीराईट

[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

विषयः प्रताधिकार संदर्भात

आपल्या मराठी विकिपीडियावरील योगदानाच्या प्रयत्नाचे हार्दिक स्वागत आहे. आपल्या लेखनाच्या प्राथमिक अवलोकनावरून आपण विकिपीडियातील खालील लेखांचे एकदा वाचन करून घ्यावे अशी आपणास आग्रहाची विनंती आहे.




आपणास विनंती आहेकी आपण केलेले अलीकडिल योगदान(/प्रयत्न) प्रताधिकारमुक्त असल्याची खात्री करून घ्यावी. ते प्रताधिकारमुक्त नसेल किंवा तशी खात्री नसेल तर संबधीत लेखक किंवा प्रकाशकाकडुन लेखी परवानगी घेऊनच अशी माहिती मराठी विकिपीडियावर द्यावी. केवळ कायदेविषयक जोखीम म्हणून नव्हे तर विकिपीडियाच्या मुक्त सांस्कृतीक कामाच्या तत्वात आणी ध्येयात कोणत्याही स्वरूपाचे प्रताधिकार उल्लंघन बसत नाही हे लक्षात घ्यावे. आपणास प्रताधिकार कायदे व अपवाद विषयक माहिती ढोबळ आणि मर्यादित स्वरूपात मराठी विकिपीडियावर ऊपलब्ध आहे. परंतु कायदेशीर दृष्ट्या त्याबद्दल आपण स्वतः स्वतंत्रपणे खात्रीकरून घेणे उचीत ठरते.

मोफत असलेली संकेतस्थळेसुद्धा बऱ्याचदा कॉपीराईटेड असतात. मराठी विकिपीडियावरील जाणत्या सदस्यांनी वेळोवेळी केलेल्या तपासणीनुसार संबधीत , कुमार कोश, बलई.कॉम वेबसाइट/संकेतस्थळ कॉपीराईटेडच आहे. मराठी विकिपीडिया मुक्त ज्ञानाचा प्रसार करत असलेतरी कॉपीराईट कायद्दांना पूर्ण गांभीर्याने घेते. या परिच्छेदात नमुद अथवा इतरही संकेतस्थळावरील लेखन जसेच्या तसे मराठी विकिपीडियावर कॉपीपेस्टकरणे प्रतिबंधीत आहे, याची कृ. नोंद घ्यावी .

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने त्याम्च्या मराठी विश्वकोश अंशत: कॉपीराईट शिल्लक ठेवले असून व्यावसायिक स्वरुपाचा पूर्वपरवानगी नसलेला उपयोग प्रतिबंधीत. गैरव्यावसायिक स्वरुपाचा उपयोग काही विशीष्ट अटींवर करता येतो; मराठी विकिपीडियावर विकिपीडिया:मराठी विश्वकोश येथे दिलेली विशीष्ट काळजी घेऊन काही विशीश्ट पद्धतीने मर्यादीत स्वरुपात मजकुर मराठी विकिपीडियावर आणता येतो. {{कॉपीपेस्टमवि}} सुद्धा पहावे.


साहित्य क्षेत्रातील प्रकाशक व साहित्यीकांचे संपर्क पत्ते 'महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रोड, पुणे' येथे उपलब्ध होणे संभवते.

आपण प्रताधिकारमुक्तते बद्दल माहिती करून घेई पर्यंत संबधीत पानावरील माहिती शक्यतो वगळावी. लेखन कृपया स्वत:च्या शब्दात करावे. माहितीच्या प्रताधिकारमुक्तते विषयक आपली खात्री झाल्या नंतर संबधीत पानाच्या इतिहासातून माहिती आपण पुन्हा वापस मिळवू शकता. कॉपी पेस्टींग टाळून मराठी विकिपीडियास सहकार्य करावे हि नम्र विनंती.

आपले प्रताधिकार विषयासंदर्भातील सहकार्य आपल्या प्रयत्नांचे मुल्य जपण्याच्या दृष्टीने आणि मराठी विकिपीडियाच्या दर्जा विश्वासार्हतेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. आपणास काही शंका उद्भवल्यास विकिपीडिया:चावडी येथे अवश्य नमुद करावे.आपले शंका समाधान करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू.



असे प्रताधिकार उल्लंघन लक्षात आलेल्या इतर सदस्यांनी संबधीत लेख विभागात {{कॉपीपेस्ट|दुवा=संस्थळाचा दुवा अथवा संभाव्य प्रताधिकार उल्लंघन विषयक माहिती}} हा साचा तेथे लावावा. जमल्यास प्रताधिकारमुक्त स्वरुपात स्वशब्दात पुर्नलेखन करुन सहकार्य द्यावे अथवा प्रताधाकारीत मजकुर वगळून सहकार्य द्यावे.


आपल्या आवडीचे वाचन आणि (प्रताधिकारमुक्त) ज्ञानकोशीय लेखन घडत राहो ही शुभेच्छा.


आपले विनीत,

साहाय्य चमू

ता.क.:


कृ.कुमार कोश, मराठी विश्वकोश, बलई.कॉम च्या मजकुराचे कॉपी पेस्टींग करू नये

[संपादन]

नमस्कार,

मोफत असलेली संकेतस्थळेसुद्धा बऱ्याचदा कॉपीराईटेड असतात.मराठी विकिपीडियावरील जाणत्या सदस्यांनी वेळोवेळी केलेल्या तपासणीनुसार संबधीत मराठी विश्वकोश,कुमार कोश, बलई.कॉम वेबसाइट/संकेतस्थळ कॉपीराईटेडच आहे. मराठी विकिपीडिया मुक्त ज्ञानाचा प्रसार करत असलेतरी कॉपीराईट कायद्दांना पूर्ण गांभीर्याने घेते. या संकेतस्थळावरील लेखन जसेच्या तसे मराठी विकिपीडियावर कॉपीपेस्टकरणे प्रतिबंधीत आहे याची नोंद घ्यावी हि नम्र विनंती.

लेखन कृपया स्वत:च्या शब्दात करावे. कॉपी पेस्टींग टाळून मराठी विकिपीडियास सहकार्य करावे हि नम्र विनंती.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १७:३५, १ सप्टेंबर २०१४ (IST)[reply]

संवाद आणि प्रतिसादा बद्दल धन्यवाद

[संपादन]

सर्वप्रथम आपल्या मनमोकळ्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद, संवादामुळे समजून घेणे आणि साहाय्य करणे सुलभ होते. आपल्या प्रमाणे मराठी विकिपीडियावरील इतर लोकही चूकत माकतच शिकत आलो आहोत, केवळ मराठी विकिपीडियावर आपल्यापुर्वी पोहोचलो एवढेच. मराठी भाषेच्या बद्दलच्या आपल्या आत्मियते बद्दल आम्हाला आत्यंतिक आदरच आहे आणि आपल्या लेखन योगदान करण्याच्या इच्छेचे स्वागतच आहे.

विकिपीडिया ज्ञानकोश असल्यामुळे विशेषणे यूक्त ललित अथवा वर्णनात्मक आलंकारीक लेखन सहसा ज्ञानकोशांना मानवतच नाही, आणि काळाच्या ओघात त्यात कुणीना कुणी दुरुस्ती केली म्हणजे लेखी मजकुराच्या बाबतीतले प्रताधिकार/कॉपीराईटच्या बाबतीतले बहुतांश प्रश्न हलके होण्याची संभावना असते. पण शासनाचा मराठी विश्वकोशही एक ज्ञानकोश असल्यामुळे तेथील लेखनात वगळण्या जोगे विशेषणे यूक्त ललित अथवा वर्णनात्मक आलंकारीक लेखन कमी असे म्हणून प्रश्न एकी कडे जरासा औघड होतो त्याच वेळी कॉपीराईट सहसा लेखनशैलीवर लागत असतो माहितीतील तथ्यांवर नव्हे हे लक्षात घ्यावे. "एव्हरेस्ट हे हिमालयातील सर्वात उंच शीखर असून त्याची उंची अबकड मीटर आहे." यातील एव्हरेस्टची उंची त्याचे सर्वात उंच असणे आणि हिमालयात असणे हि माहितीतील तथ्ये आहेत. कॉपीराईट माझ्या "एव्हरेस्ट हे हिमालयातील सर्वात उंच शीखर असून त्याची उंची अबकड मीटर आहे." या वाक्य लिहिण्याच्या लेखन शैलीवर येतो हेच वाक्य बदलून तुम्ही तुमच्या शब्दात वेगळ्या पद्धतीने लिहिले की कॉपीराईटचा प्रश्न हलका होतो. "एव्हरेस्ट ह्या हिमालयातील शीखराची उंची अबकड मीटर आहे. एव्हरेस्ट हे सर्वात उंच शीखर आहे" अशा प्रकारे जरासा बदल करून लिहिला की काम फत्ते. अर्थात असे करतानाही मूळ माहिती ज्या ग्रंथातून घेतली त्याचा संदर्भ नमुद करावयास विसरायचे नाही म्हणजे झाले.

काही टिप्स

[संपादन]

काही सोप्या टिप्स देतो आवडल्यातर पहा शंका असल्यास कळवा:

१) इतर स्रोतातील लेखनातील महत्वाचे मुद्दे आधी नोंदवावेत,थोडक्यात सारांश लेखन करावे, आणि मग त्या मुद्यांचा/सारांशाचा पुन्हा आपल्या स्वत:च्या शब्दात वाक्य बनवावे विस्तार करावा.आणि मग मुळ स्रोताचा संदर्भ द्यावा.एकदा सवय झाल्या नंतर मुद्दे/सारांश मनातल्या मनात नोंदवून स्वत:च्या शब्दात लेखन जमते.

  • हि पहिली पद्धत अधिकृत वस्तुत: सर्वात उत्तम; बाकी खाली दिलेले शॉर्टकट आहेत.

२) लेखन चालू करण्यापुर्वी शक्यतो, एका पेक्षा अधिक लेखकांचे/स्रोतांचे लेखन वाचावे आणि मग लेखन करावे; लेखन सर्वसमावेशक होण्या सारखे याचे बरेच फायदे होतात पण एकाच लेखकाची भाषा न राहता त्या दोघांची+ आपली मिळून तिसरी भाषा झाल्याने अंशत:तरी कॉपीराईटच्या प्रश्नातून सूटका होते.

सोबतच अबकड यांचे मत असे आहे आणि हळक्षज्ञ यांचे मत असे आहे,अशी वाक्य रचना अंशत: समीक्षणात मोडते आणि कॉपीराईटच्या प्रश्नातून सुटकेचा हा अजून एक मार्ग आहे.

३) "सुर्य पुर्वेला उगवतो" वाक्याचे "पुर्वेला सुर्य उगवतो" असा फेरफार सोबत जमले तर क्रियापदे बदलावीत.

४) विशेषणे/क्रियाविशेषणे आणि अलंकारीक/वर्णनात्मक भाषेला आवर्जून कात्री लावावी कारण या गोष्टी ज्ञानकोश लेखनशैलीस मानवतही नाहीत शिवाय अजून मोठा फायदा म्हणजे कॉपीराईट प्रश्नातून सुटका होण्यास अल्पसा हातभारच लागतो.कारण "एव्हरेस्ट हे सर्वात उंच शिखर आहे"ही फॅक्ट आहे. फॅक्टवरही मांडणीचा कॉपीराईट असू शकतो नाही असे नाही पण फॅक्ट्स बद्दलचा कॉपीराईट सिद्धकरणे कटकटीचे ठरणारे असते मुळ वाक्यात "हे" हा शब्द नसेल तर जोडा असेल तर काढा,जसे "एव्हरेस्ट सर्वात उंच शिखर आहे"

गाजर गवत लेखाच्या सद्य स्थितीचे उदाहरण घ्यावयाचे झाले तर;
  • "सर्वत्र उगवणारे गाजर गवत सर्वांच्याच परिचयाचे आहे.";
  • गाजर गवत किती उपद्रवी आहे हे कोणाला कितपत माहित असेल हे सांगता येत नाही.
  • या गाजर गवताचे मानवी आरोग्यावर आणि पिक उत्पादनावर मात्र अनिष्ट परिणाम होतात हे तितकेच खरे आहे. यागाजर गवताच्या संपर्कात आल्यास त्वचा रोग, ॲलर्जी, श्वसनाचे आजार उद्भवतात. गाई, म्हशींनी गाजर गवत खाल्ले तर दूधात कडसरपणा येतो. असे अनेक अवगुण या गाजर गवतात आहेत.( बाकी वाक्य बरोबर आहे पण कॉपीराईटचा प्रश्न अंशत: शिल्लक राहतोच;" श्वसनाचे आजार,ॲलर्जी, त्वचेचे रोग इत्यादी उद्भवण्याची शक्यता असते." असा वाक्य रचनेत फेरफार करता येऊ शकतो पण त्या पेक्षा अबकड या तज्ञांच्या मतानुसार " श्वसनाचे आजार,ॲलर्जी, त्वचेचे रोग इत्यादी उद्भवण्याची शक्यता असते."(सोबत संदर्भ) हे सर्वात सेफ.

मार्गदर्शनाबद्दल खुप खुप धन्यवाद!

  1. ^ संदर्भाचा संदर्भhttp://indiacode.nic.in/fullact1.asp?tfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले