Jump to content

सदस्य चर्चा:सौरभदा

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


मराठी विकिपीडिया विकिपत्रिका प्रथम खंड अंक दुसरा - (फेब्रुवारी २०१२ )

[संपादन]
चांदणे शिंपित जा ...!
मराठी विकिपीडिया गौरव समितीची
मराठी विकिपीडियावर अनेक मंडळी अहोरात्र काम करत आहेत. काही नवीन आहेत तर काही जुनी झाली, काम करणार्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच कामाची कदर करण्यासाठी गौरवासारखे दुसरे साधन नाही. कामाच्या वाढत्या व्यापाबरोबरच त्याची योग्य रीतीने कदर पण करण्याच्या उद्देशाने एक आधारभूत संरचना मराठी विकिपीडियावर असावी ह्या उद्देशाने "मराठी विकिपीडिया गौरव समिती" ची स्थापना करण्यात येत आहे.

सदर समिती तर्फे दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपादन योगदानाचे गौरव जसे - १००० संपादने, २००० , ५००० संपादने आणि काही इतर गौरव (सदस्यांचे काम तपासून) प्रदान करण्यात येतील तसेच इतरांनी शिफारस केलेले अथवा समितीस योग्य वाटलेले/सुचलेले विशेष गौरवही प्रदान करण्यात येतील. अर्थात व्यक्तिगत बार्नस्टार देण्याच्या जुन्या पद्धतीला पूरक म्हणून ही समिती कार्य करेल.

"मराठी विकिपीडिया गौरव समितीची " सुरुवात होत असतांना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आम्ही आशा करतो की भविष्यात सदर समिती ही मराठी विकिपीडियाच्या उज्ज्वल भविष्यात मोलाचा वाट उचलण्यात उपयोगी ठरेल. आपणही ह्या उपक्रमात भरीव सहभाग द्यालच ही अपेक्षा.


जानेवारी २०१२ मधील सक्रिय सदस्यांचा आलेख
२०१२ जानेवारी महिन्यात जवळ जवळ एक हजार नवीन सदस्य नोंदणीकृत झाले त्याचा आलेख
जानेवारी २०१२ मध्ये मराठी विकिपीडियाने एक लाख पानांचा टप्पा गाठला त्याचा आलेख
पाने सांख्यिकी
लेख ३४,५४४
पाने

(चर्चा पाने, पुनर्निर्देशने, साचे, इ. सह एकूण पाने)

१,०९,५३४
चढवलेल्या संचिका ३,१९२
संपादन सांख्यिकी
एकूण संपादने ९,६८,६९३
प्रतिपान संपादने ८.८४
सदस्य सांख्यिकी
नोंदणीकृत सदस्य २२,०८४
कार्यरत सदस्य

(गेल्या ३० दिवसांत एक तरी कृती केलेले सदस्य)

१९०
सांगकामे ६०
प्रचालक १२
स्वीकृती अधिकारी
१८:३८ १ फेब्रुवारी २०१२ ची आकडेवारी


कार्यक्षेत्रातील प्रत्यक्ष कार्यक्रम
  • टेक फेस्ट आय. आय. टी बॉम्बे, मुंबई येथे ६ ते ८ जानेवारी दरम्यान मराठी विकिपीडियाचे स्टॉल लावण्यात आले होते, त्यास उत्तम प्रतिसाद लाभला. 'टेक फेस्ट २०१२' ला एक लाखाहून जास्त लोकांनी भेट दिली.
  • १५ जानेवारी २०१२ ला W - 11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि टेक्याथॉन, मुंबई आय. आय. टी बॉम्बे येथे आयोजित करण्यात आली होती.
मराठी अभ्यास केंद्राच्या विद्यार्थी आणि शिक्षक महामेळावा, मुंबई
मराठी अभ्यास केंद्राच्या विद्यार्थी आणि शिक्षक महामेळावा, मुंबई

त्या दरम्यान मराठी विकिपीडिया मोबाइल तसेच टॅबलेट वरून वापरण्यासाठी 'अँड्रॉईड अ‍ॅप' निर्माण करण्यात आल्या.

  • * ८ जानेवारी २०१२ - मराठी विकिपीडिया (एडिट ट्रेनिंग/ प्रशिक्षण/ मार्गदर्शन) शिबिर टेक मराठी महामेळावा, पुणे. १०० प्रशिक्षणार्थीनी ह्यात भाग घेतला.
  • * १५ जानेवारी २०१२ - W11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि विकी शिकवणी, ज्ञान प्रबोधिनी, पुणे येथे आयोजित करण्यात आली.
  • * १३ जानेवारी २०१२ - आबासाहेब अत्रे शाळा, रास्ता पेठ, पुणे येथे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विकी शिकवणी आयोजित करण्यात आली होती. ५० शाळकरी विद्यार्थ्यांनी ह्यात हिरीरीने भाग घेतला.
  • * २९ जानेवारी २०१२ - शाहीर अमर शेख सभागृह, चर्चगेट मुंबई, मराठी अभ्यास केंद्राच्या विद्यार्थी आणि शिक्षक महामेळाव्यात "मराठी विकिपीडिया आणि मराठी भाषेकरिता उपलब्ध होत असलेल्या तंत्रज्ञानाचा परिचय" यावर व्याख्यान तसेच विकिपीडियावर संपादन कसे केले जाते याचे सोदाहरण प्रात्यक्षिक दिले गेले. कार्यक्रमास १२५ मराठीप्रेमींची उपस्थिती होती.

२०१२ फेब्रुवारी महिन्यातील आयोजित कार्यक्रम

  • ३ फेब्रुवारी - "माहिती तंत्रज्ञान, विकिपीडिया आणि मराठी भाषा" चर्चासत्र, मराठी विभाग पुणे विद्दापीठ.
  • १० फेब्रुवारी २०१२ - विकी शिकवणी, L&T इनस्टीट्युट ऑफ टेक्नोलॉजी, साकीनाका मुंबई.
  • १० ते १२ फेब्रुवारी - हॅक्याथॉन, (Gnunify) SICSR पुणे आणि मराठी विकिपीडिया - परिचय,
  • १७ फेब्रुवारी - मराठी विकिपीडिया - परिचय, COE, Pune
  • १८ फेब्रुवारी - विकी कार्यशाळा, आय आय टी मुंबई.
  • २० ते २७ फेब्रुवारी - फोटोथॉन, मुंबई.
  • २५ फेब्रुवारी - मराठी भाषा दिवस कार्यक्रम, रानडे इन्स्टिट्यूट, पुणे.
.
ठळक घडामोडी आणि आढावा
  • मराठी विकिस्रोतला प्रशासकीय मान्यता

मराठी विकिस्रोत हा बंधू प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव विकी मीडियाकडे बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित होता. विकी संमेलन २०११, मुंबईच्या जाहीरनाम्यात ह्या प्रकल्पास सुरुउ करण्याच्या घोषणेनंतर प्रस्तावाचा पाठपुरावा आणि इतर अनिवार्य गोष्टींची पूर्तता मराठी विकिपीडिया समाजाने केल्याने,. लॅंग्वेज कमिटीने मराठी विकिस्रोत ह्या बंधू प्रकल्पास प्रशासकीय मान्यता दिली आहे. लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित होईल.

विकिस्रोत म्हणजे विकी समुदायाने उभारलेले व देखभाल केले जाणारे, प्रताधिकारमुक्त दस्तऐवजांचे इंटरनेटवरील खुले ग्रंथालय आहे. ऐतिहासिक काळापासूनचे ललितेतर व ललित साहित्य, चित्रे/कलाकॄती यांच्या अस्सल प्रकाशनाबरहुकूम विश्वासार्ह विकिआवॄत्त्या सर्वांसाठी गोळा करून देणे हे विकिस्रोताचे उद्दिष्ट आहे. नवीन पिढीस जुने प्रताधिकारमुक्त मराठी ग्रंथ वाचण्यास इंटरनेटवर युनिकोड फॉर्ममध्ये सहज उपलब्ध करून देणे तसेच संदर्भ देणे आणि पडताळणे सोपे करण्यासाठी सदर प्रकल्प उपयोगात येईल.

मराठी विकिस्रोत' हे एक आंतरजालावर असलेले मुक्त पुस्तकालय आहे. यामध्ये वाचकांसाठी मोफत वाचनाची सोय आहे. आपल्याला या प्रकल्पात भर घालण्यासाठी निमंत्रण आहे. येथे प्राचीन तसेच प्रताधिकार नसलेले लेख आपण आणू शकता. मराठी विकिपेडियावर त्या लेखांची चर्चा होऊ शकते.

परंतु ते लेख मूळ स्वरूपात मराठी विकिस्रोत येथे साठवले जातात. उदा० ऐतिहासिक ललितेतर दस्तऐवज - तह/करारनामे, जाहीरनामे, आज्ञापत्रे, फतवे, वैयक्तिक दप्तरे/पत्रे, बखरी, न्यायनिवाड्याची निकालपत्रे, सैनिकी मोहिमांचे अहवाल/जमाखर्च इत्यादी. तसेच ऐतिहासिक ललित साहित्य - संतसाहित्य, अन्य भक्तिपर साहित्य, स्तुतिपर कवने येथे संग्रहित करता येतील.


  • नवीन नियुक्ती
माहितगार - विकिसंमेलन भारत २०११, मुंबई

मराठी विकिपीडिया वरील दैनंदिन कामे, नवीन प्रस्ताव, तांत्रिक जबाबदाऱ्या, सुरक्षा, ध्येय धोरणे, प्रगती आदी अनेक आघाड्या अभय नातू हे एकटेच प्रशासक म्हणून कार्यभार सांभाळत होते. वाढत्या व्यापाबरोबरच खांदे वाढवावे जेणे करून कामाचा वैयक्तिक दबाव कमी होईल आणि सेवाही सुरळीत मिळतील या उद्देशाने प्रशासक (ज्याला आता स्वीकृती अधिकारी असे संबोधण्यात येते) या पदासाठी मराठी विकिपीडिया समाजाने एकमताने 'माहितगार' यांना ही जबाबदारी दिली आहे.

माहितगार हे कुशल संघटक आहेत, मराठी विकिपीडियावर ‎प्रचालक म्हणून ७ जून २००६ पासून ते कार्यरत आहेत. तांत्रिक तसेच धोरणात्मक विषयांवर त्यांनी नेहमीच त्याच्या व्यक्तिमत्त्वातील परिपक्वतेचा परिचय दिलेला आहे. प्रेमळ व्यक्तिमत्त्व, प्रत्यक्ष क्षेत्रातील त्यांचे काम आणि कार्यकर्त्यांशी त्यांचा थेट संपर्क हे वाखाणण्याजोगे आहे. तेंव्हा माहितगारांना 'स्वीकृती अधिकारी' (प्रशासक) पदाची जबाबदारी दिल्याने प्रशासकीय पातळीला अधिक बळकटी येईल.

'माहितगार' यांच्या पुढील कार्यास 'विकीपत्रिका' वाचकांतर्फे हार्दिक शुभेच्छा ...!!!

* विकिप्रकल्पांकरीता प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते हवे आहेत..!

वाचकांच्या प्रतिक्रिया

  • राहुल जी, सादर नमस्कार, मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचा आपल्या उत्कृष्ट संपादनाकरीता आपणांस व संपादक टीमचे हार्दिक अभिनंदन. या पत्रिकेमुळे मराठी विकिपीडिया विकास कार्याकरीता अनेक स्वयंसेवक जोडता येतील.--विजय नगरकर
  • नमस्कार राहुल, विकीचा अंक मस्त झाला आहे. आवडला. त्यात सांख्यिकी देण्याची कल्पना फार आवडली. हा अंक इतर संकेतस्थळांवर सादर केला तर चालेल का? निनाद
  • Superb effort ... Is there any away I can read in English -- Naveenpf
  • मला विकिपत्रिका नको आहे, त्यासंबंधीच्या लिंक किंवा मजकूर माझ्या सदस्य किंवा चर्चापानावर कृपया टाकू नये. धन्यवाद. मनोज
  • नमस्कार राहुल ! विकिपत्रिकेचा पहिला अंक प्रकाशित झाल्याबद्दल आपल्या सर्वांचे, आणि अधिककरून तुमचे, अभिनंदन ! अंक नेटका आणि देखणा (याबद्दल विशेष शाबासकी :) ) झाला आहे. संकल्प द्रविड
विकिपत्रिका प्रकाशक...
मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा...! * विकिपत्रिका संपादन मंडळात सहभागी व्हा !



मराठी विकिपीडिया विकिपत्रिका प्रथम खंड अंक पहिला - (जानेवारी २०१२ )

[संपादन]
२०१२ नववर्ष अभिष्टचिंतन ...!
सर्व मराठी विकिपिडीयंसना नवीन वर्षाच्या अनेक अनेक शुभेच्छा. आम्ही आपल्यासाठी नवीन वर्षाची आगळी वेगळी भेट घेऊन आलो आहोत. हो विकीपात्रिका ...! मराठी विकिपीडियाचा वाढत असलेला व्याप, म्हणजे कामाच्या आघाड्या आणि विपी परिवार यामध्ये उत्तम समन्वय राहावा, वेगवेगळ्या दिशांनी होणार्‍या कामांची सर्वाना माहिती व्हावी ह्या प्रमुख उद्देशाने हा नवीन उपक्रम सुरु करीत आहोत. जेणेकरून, सदस्यांना आपल्या आवडीच्या कामात भाग घेऊन योगदान करता येईल, तसेच कार्यरत सदस्याचे योगदान पण समोर आणता येईल. सांख्यिकी, लक्ष, ध्येय आणि ऑफ लाईन कामे त्यासाठी लागणारा जनाधार आणि नेटवर्क ह्यात सुसंवाद साधण्यात ह्याचा उपयोग होईल.

नववर्षाच्या मुहूर्तावर विकीपात्रिका ह्या मासिकाच्या प्रकाशनाची सुरुवात होत असतांना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आम्ही आशा करतो कि भविष्यात सदर मासिक हे मराठी विकिपीडियाच्या उज्वल भविष्यात मोलाचा वाट उचलण्यात उपयोगी ठरेल. आपणही ह्या उपक्रमात भरीव सहभाग द्यालच ही अपेक्षा.

विकिपत्रिका मराठी विकिपीडिया
२०११ मधील गुगल वरील मराठी विकिपीडियाबाबतचा लोकांनी घेतलेल्या शोधाचा लेखाजोखा (ट्रेंड)
पाने सांख्यिकी
लेख ३४,७९७
पाने

(चर्चा पाने, पुनर्निर्देशने, साचे, इ. सह एकूण पाने)

९६,२४०
चढवलेल्या संचिका ३,१६८
संपादन सांख्यिकी
एकूण संपादने ९,३२,७५०
प्रतिपान संपादने ९.६९
सदस्य सांख्यिकी
नोंदणीकृत सदस्य २१,१५१
कार्यरत सदस्य

(गेल्या ३० दिवसांत एक तरी कृती केलेले सदस्य)

१९०
सांगकामे ६०
प्रचालक १२
स्विकृती अधिकारी


प्रत्यक्ष क्षेत्रातील कार्यक्रम
  • विकिपीडिया व त्याचे बंधू-प्रकल्प- विकिस्रोत, विक्शनरी इत्यादी यात वापरल्या जाणार्‍या मिडियाविकी सॉफ्टवेअरच्या मिडियाविकी आणि मिडियाविकि विस्ताराच्या संदेशांचे स्थानिकीकरण, अनुवाद, अनुवादांचे प्रमाणिकरण
    CMDA IT expo. १५ ते १८ डिसेंबर २०११, पुणे. मराठी विकिपीडिया स्टॉल.

व सर्वसामान्य मराठी माणसास समजण्यास सुलभ भाषेचा उपयोग करण्याच्या उद्देशाने 'ट्रान्सलेशन स्प्रिंट (अनुवाद दौड/भाषांतर कार्यशाळा)' 'शनिवार,दिनांक २६ नोव्हेंबर २०११ रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. ह्या उपक्रमाद्वारे ३२० संदेशांचे स्थानिकीकरण (लोकलायझेशन) पूर्ण करण्यात आले.

  • "CMDA IT Expo 2011, पुणे येथे १५ ते १८ डिसेंबर दरम्यान मराठी विकिपीडियाचे स्टॉल लावण्यात आले होते, त्यास पुणेकरांचा उत्तम प्रतिसाद लाभला. स्टॉलला सुमारे ३००० लोकांनी भेट दिली तर २५० पेक्षा जास्त लोकांनी सक्रीय सहभागासाठी नावे नोंदविली.
  • शनिवार दिनांक २४ डिसेंबरला 'मामासाहेब मोहोळ महाविद्यालय पुणे' येथे विद्यार्थांसाठी विकी शिकवणीचे आयोजन करण्यात आहे होते. शिकवणीत ५० विद्यार्थांनी भाग घेतला ज्यात ४०% विद्यार्थिनी होत्या.

२०१२ जानेवारी महिन्यातील आयोजित कार्यक्रम

  • ६ ते ८ जानेवारी - टेक फेस्ट आय. आय. टी बॉम्बे, मुंबई
  • ७ - ८ जानेवारी - विकी शिकवणी टेक मराठी मेळावा, पुणे
  • १५ जानेवारी - W -11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि विकी शिकवणी, पुणे
  • १५ जानेवारी - W - 11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि टेक्याथॉन, मुंबई
  • २९ जानेवारी - विद्यार्थी मेळावा विकीशिकवणी , मराठी अभ्यास केंद्र, दादर मुंबई
विकिसंमेलन भारत २०११, मुंबई आढावा
मराठी ट्रॅक - विकिसंमेलन भारत २०११, मुंबई

मुंबईमध्ये भरलेल्या विकीसंमेलन २०११ च्या निमित्याने अनेक मराठी भाषाप्रेमी मंडळीना चर्चा करण्यासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले. उपस्थितांमध्ये मराठी विकिपीडिया संपादक, मराठी साहित्यिक, राज्य मराठी विकास संथेचे अधिकारी, उच्य माध्यमिक शिक्षण मंडळाचे प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य विश्वकोश मंडळाचे प्रतिनिधी, महाराष्ट्र शासनाचे माहिती अधिकारी, आय आय टी मुंबईचे संशोधक, पत्रकार, आणि मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी-माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या परिषदेत, इंग्रजी भाषेचे ‘विकिपीडिया’तील वाढते महत्त्व जितके अभ्यासू वृत्तीने मांडण्यात आले तितकेच मराठी भाषा या नव्या ज्ञानकोशात कशा पद्धतीने समाविष्ट होऊ शकते याचाही तज्ज्ञांनी चांगलाच ऊहापोह केला. मराठी माणसाचा तंत्रज्ञानाविषयीचा न्यूनगंड, त्याच्यामध्ये माहिती आणि आत्मविश्वासाचा असलेला आभाव, मराठी युनिकोडची माहिती नसणे किंवा टायपिंग न येणे, मजकूर संपादनाचे कौशल्य नसणे, इंटरनेटच्या सोयींचा आभाव, अगदी मराठी विकिपीडिया अस्तित्वात आहे याची माहिती नसणे, अशा अनेक अडचणींमुळे मराठी समाजाने या तंत्रज्ञानाकडे पाठ फिरवली आहे, असे प्रमुख तज्ज्ञांचे मत होते. मराठी भाषेला ज्ञानभाषेच्या पातळीवर आणून ठेवायचे असेल तर हाताशी असलेल्या तंत्रज्ञानाचा जोरकस वापर करण्याची गरज आली आहे, असेही काहींचे मत होते. सध्याच्या जमान्यात सोशल नेटवर्किंग साइटचा प्रभाव वाढत असताना लोकांमध्ये संवाद वाढत आहे. पण यामध्ये ज्ञानाची देवाणघेवाण कितपत होते हा महत्त्वाचा प्रश्न आहे. या दृष्टीने सोशल नेटवर्किंग साइटवर जास्त वेळ बसणाऱ्या मंडळींनी आपला १० टक्के वेळ वाचवून ‘विकिपीडिया’त योगदान दिले तर त्याने भाषाव्यवहारात भर पडेल, शिवाय ज्ञानशाखेची ओळखही अनेकांना होईल असा विचार मांडण्यात आला, तर काही उपस्थितांनी भाषाशास्त्र, भाषासंवर्धन, मराठीतील नव्या शब्दांचा उपयोग, जुन्या शब्दांना पुनर्जन्म, इंग्रजी शब्दांसाठी नेमका प्रतिशब्द, भाषांतर, मजकुराचे उत्तमरीत्या संपादन अशा विविध पैलूंनाही स्पर्श केला. मराठी फाँट हा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. त्यावर अनेक पर्याय सुचवण्यात आले. संमेलनादरम्यान आय आय टी मुंबईच्या संशोधकांनी 'ह्याक्याथॉन' ह्या तांत्रिक मार्गीकेतून 'नारायम' या फाँटचे मराठीकरण आणि सुलभीकरण पूर्ण केले.

या समस्यांच्या खोलाशी जाताना महाराष्ट्रातील प्रमुख ७ शहरांतील निवडक शाळांमध्ये मराठी ‘विकिअकादमी’ स्थापन करण्याचीही घोषणा मराठी विकिपीडियाने केली आहे. जेणेकरून, शिक्षक आणि विद्यार्थी या चळवळीशी जोडून घेतला तर दोघांच्याही ज्ञानकक्षा अधिक रुंदावत जातील. ‘विकिस्रोत’ ह्या बंधुप्रकल्पाची घोषणा, संस्कृत विकिपीडियाशी सहयोग, इतर माहिती आणि संपर्क माध्यमांचा वापर इत्यादी गोष्टींद्वारे मराठी विकिपीडिया चळवळ अधिक व्यापक करण्याचा उदेश जाहीर करण्यात आला. प्रसिद्धी माध्यमांनी मराठी विकिपीडियास मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिल्याचे संमेलनादरम्यान जाणवले.

* विकिप्रकल्पांकरीता प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते हवे आहेत..!

मराठी विकिपीडिया विकिसंमेलन भारत २०११ जाहीरनामा

  • महाराष्ट्रातील ७ प्रमुख शहरामधील निवडक शाळांमध्ये मराठी विकी अकादमीची आखणी करणे आणि तेथील शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या पर्यंत मराठी विकिपीडियाचे रीतसर प्रशिक्षण पोहोचवणे आणि मराठी विकिपीडियामध्ये भर घालणे.
  • संस्कृत विकिपीडियाशी सहयोग करून त्यांना प्रशिक्षण/ विकी शिकवणी आणि तांत्रिक गोष्टी या मध्ये मदत करणे.
  • मराठी विकिपिडीयावर "विकी स्रोत" ह्या बंधू प्रकल्पास सुरवात करणे.
  • मराठी विकिपीडिया इतर संपर्क माध्यमांद्वारे उपलब्ध करणे जसे मोबाईल, टॅब, सी डी आदी.
  • मराठी विकिपीडिया समविचारी मंडळींनी एकत्र येऊन माहितीचे आदान प्रदान करणे.
विकिपत्रिका प्रकाशक...
मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा...! * विकीपत्रिका संपादन मंडळात सहभागी व्हा !


   स्वागत सौरभदा, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन सौरभदा, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,९६२ लेख आहे व १५८ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

दृश्य संपादकात छायाचित्रे (मिडिया), साचे (टेंप्लेट) आणि सारणी (टेबल) या सुविधा समाविष्ट करा या ड्रॉपडाउन मेनुवरून उपलब्ध होतात.

दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)

  • दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

[[इ.स. २०००|२०००]]

[संपादन]

आपण इ.स. च्या लेखांमध्ये करीत असलेले बदल पाहिले. कृपया [[इ.स. २०००|२०००]] चा दुवा देताना दोन्ही आकड्यांच्या मध्ये इंग्रजीतील pipe character (|) द्यावे. आपण मराठीतील pipe character (।) देत आहात. हा जरी छोटा फरक असला तरी दुवा येत नाही. आपण जर बरहा सारखी प्रणाली वापरत असाल तर कृपया इंग्रजी भाषा निवडून pipe character द्यावे. कौस्तुभ समुद्र ०४:४८, १४ जानेवारी २००८ (UTC)

काय करावे? उत्तर

[संपादन]

आपण लिहिल्याप्रमाणे कुसुमांग्रजांवरील लेखात प्रताधिकार कायद्याचे उल्लंघन झाल्याचे काही सदस्यांना वाटते आहे. त्याप्रमाणे प्रताधिकाराची माहिती देण्यासाठी चर्चापानावर संदेश सुद्धा देण्यात आला आहे. पण काही अपवाद वगळता (उदा. गीतरामायण) ज्या लेखांसाठीची प्रताधिकारमुक्तीची घोषणा केलेली असेल तर असे साहित्य पूर्णत: विकिपीडिया वर देता येऊ शकते. जर उदाहरण म्हणून काही ओळी लेखात समाविष्ट केल्या तर त्या प्रताधिकाराच्या कक्षेत येत नाहीत.

चर्चा करण्यासाठी मदतकेंद्र इथे तुम्ही दिलेल्या प्रमाणे शंका विचारता येतील. किंवा चावडी इथे सुद्धा शंका विचारता येतील. किंवा तुमच्या चर्चा पानावर तुम्ही {{helpme}} असे लिहीलेत तर इतर सदस्य तुम्हाला संपर्क करतील. एखाद्या विशिष्ट सदस्याला जर संदेश द्यायचा असेल तर त्याच्या चर्चा पानावर आपण संदेश लिहू शकता. उदा. माझे चर्चा पान पहावे.

आपला पुढचा प्रश्न म्हणजे सही. सही केल्यावर आपल्या टोपणनावाला जोडलेला सदस्यपानाचा दुवा आपोआप तयार होतो. ज्याच्यावर क्लीक करून चर्चा करणे सोपे जाते. सही करण्यासाठी ~~~~ अशी चार चिन्हे द्यावीत. आपण केलेली [[सदस्य:सौरभदा]] ही सही चुकीची आहे. कृपया ती वरीलप्रमाणे दुरूस्त करावी. सही केल्याने आपल्या ओळखीबरोबरच आपण केलेले संपादन हे किती वाजता केले गेले हे कळते. तसेच प्रत्येक सदस्याची सही ही फक्त तोच करू शकतो.

कौस्तुभ समुद्र १३:०९, १४ जानेवारी २००८ (UTC)

सौरभदा,
लेखक किंवा कवीचा लेखन प्रवास उलगडण्याच्या दृष्टीने भाषेचा अभ्यास समीक्षण तुलनात्मक समीक्षण करण्याच्या दृष्टीने उद्धरणे देणे योग्य आहे । सद्यस्थितितील कुसुमाग्रज लेख खरेच प्रताधिकार कायद्यातील नियमास धरून नाही ; दुसरे तर तशी प्रताधिकार मुक्ततेची परवानगी मिळवली तर तो विकिस्रोत या सहप्रकल्पात संपूर्ण लेखन जसेच्या तसे देता येते;विकिबूक्स या सहप्रकल्पात कौसुमाग्रजांच्या कविता शिकवता येतील तर विकिविद्यापीठ सहप्रकल्पात त्यांच्या कवितांबद्दलची प्रश्नोत्तरे अंतर्भूत करता येतील।
सुयोग्य लेखात गोविंद विनायक करंदीकर हा लेख उदाहरणा करिता पहावा ।
  • शंका कुठे विचाराव्या याबाबत देखील साहाय्य हवे आहे.इथेच त्या विचारल्या तर चालतील का?
शंका येथे मदतकेंद्रात ,चावडीवर आणि संबधीत लेखाविषयीच्या शंका लेखाच्या चर्चा पानावर तातडीच्या प्रबंधकीय मदती करिता प्रबंधकांच्या चर्चापानावर शंका विचारू शकता।
  • सदस्यांना असे संदेश कसे पाठवता येतील?
संबधीत सदस्यांच्या चर्चापानावर संपर्क करून
  • सही करण्याबद्दल देखील मला अधिक माहिती हवी आहे.त्याने कोणत्या गोष्टी साध्य होतात व ते का आवश्यक आहे याची माहिती द्यावी.
सही बद्दल अधिक माहिती Wikipedia:Signaturesयेथे वाचा .


Dear सौरभदा, Sahayya chamu {{Copyright?}} message was placed by me only for guidance purpose , I checked your edits in article Indira Sant your edits up till now would not have any copy right issue for sure. You are already taking usual care and that is ok just go ahead with your writing

Mahitgar ०५:४७, १५ जानेवारी २००८ (UTC)

Re:उद्दिष्ट

[संपादन]

सौरभदा,
आपण लिहिल्याप्रमाणे संख्यात्मक वाढ पुरेशी नाही यावर यापूर्वीच चर्चा झालेली आहे. आपण जर १-१-२०११ प्रकल्प पान पाहिलेत तर त्यामध्ये या प्रकल्पाविषयी पूर्ण माहिती दिलेली आहे. त्याबरोबरच गुणात्मक वाढ होण्यासाठी इतरही अनेक उपक्रम चालू आहेत. जसे की - लेख संपादन स्पर्धा. आपण लिहिल्याप्रमाणे महाराष्ट्राशी संबंधित लेखांबाबत जास्त मेहनत घेणे खरोखर गरजेचे आहे. यासंदर्भात प्रबंधकांशी चर्चा करून एखादा प्रकल्प सुरू करता येईल. आपल्याला जर काही सुचले तर कृपया चावडीवर संदेश देणे. विकिपीडिया हा मुक्त कोश असल्यामुळे सदस्यांनी एखाद्या विषयासंबंधीच योगदान द्यावे अशी अपेक्षा करता येत नाही. त्यामुळे प्राधान्यक्रम हा पूर्णत: वैयक्तिक विषय आहे. सध्या मराठी विकिपीडियावर दोनच गोष्टी प्राधान्यक्रमावर आहेत. एक - सदस्य संख्या वाढविणे व दोन - सध्या फक्त १५-२० सदस्य अविरत कार्यरत आहेत. इतरही सदस्यांना योगदान देण्यास प्रवृत्त करणे.

कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०५:४३, १९ जानेवारी २००८ (UTC)

प्राधान्यक्रमाबाबत असे काही धोरण :
Please do refer:करण्यासारख्या गोष्टींची यादी

Mahitgar ०६:०८, २० जानेवारी २००८ (UTC)

दिनविशेष

[संपादन]

सौरभदा,

दिनविशेष एकच असावा अशी कोणतीही अट नाही. तुम्ही दिलेली आजच्या दिनविशेषची माहिती cache clear केल्यावर दिसत आहे. साधारणपणे आ.मा.आ.का हे सदर मी चालवित असल्याने साधारण मासिक सदराच्या लांबीला येईल इतपतच माहिती मी त्याच्यात ठेवतो. तरी तुम्ही cache clear (ctrl+F5-जर आपण IE वापरत असाल तर) करून तपासून पहावे. तरीही बदल न दिसल्यास माझ्या चर्चा पानावर संदेश द्यावा.

कौस्तुभ समुद्र (चर्चा) ११:२०, २५ जानेवारी २००८ (UTC)

वि.सू. तुमच्या सदस्य पानावर मी main page purge करायची लिंक देत आहे. कुठलेही बदल न दिसल्यास यावर क्लीक करावे. (कौस्तुभ)

तुम्हाला प्रत्येक वेळी बदल दिसण्यासाठी main page purge करावे लागेल.

र्‍ह व र्‍य

[संपादन]

आपणांस र्‍ह व र्‍य लिहायला अवघड जात आहे असे दिसते. तरी कृपया र्‍ह व र्‍य लिहिताना इथून copy paste करुन अथवा संपादन खिडकीत खाली येणार्‍या बाराखडीतून लिहावे. आपण मराठी टंकलेखनासाठी कुठली प्रणाली वापरता (बरहा, गमभन, windows default, javascript, इ.) हे जर कळले तर मी आपणांस र्‍ह व र्‍य टंकित करण्यासाठी मदत करू शकतो.

कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०९:४७, २९ जानेवारी २००८ (UTC)

वि.सू. तसेच इ.स. चा दुवा देताना [[इ.स. २००७|२००७]] असा द्यावा. (इ.स. नंतर एक space द्यावी). (कौस्तुभ)

नवीन लेख

[संपादन]

सौरभदा,

आपण नुकतेच मराठी विकिपीडियावर नवीन लेख लिहिले आहेत. आपणांस विनंती आहे की नवीन लेख लिहित असताना लगेचच त्याची वर्गवारी करावी. कारण नंतर असे लेख शोधून त्यांची वर्गवारी करणे अतिशय क्लिष्ट काम आहे. तसेच आंतरविकी दुवे सुद्धा लगेचच द्यावेत. उदा. वसंत कानेटकर हा लेख मी नाटककार या वर्गात वर्गीकृत करुन इंग्रजी विकिपीडियाचा दुवा सुद्धा दिलेला आहे, तो पहावा.

आशा आहे की आपणाकडून असेच योगदान मराठी विकिपीडियाला मिळत राहो.

कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०६:३६, ३० जानेवारी २००८ (UTC)

इथल्या सर्व संपादनांवर कुणी न कुणी नजर ठेवूनच असतो (:). तरीही आपणांस वर्गवारी करण्यात काही अडचणी आल्या (उदा. नक्की कुठे वर्गवारी करायची, इ.) तर केव्हाही मला अथवा संकल्प द्रविड यांना निरोप द्यावा.

कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०६:५१, ३० जानेवारी २००८ (UTC)

सौरभ, येथील माझे उत्तर वाचा.
--संकल्प द्रविड (चर्चा) १२:४७, ३१ जानेवारी २००८ (UTC)


सौरभ,

संकल्पने आपल्या (तसेच माझ्या) प्रश्नाचे जे उत्तर दिलेले आहे, ते आपल्याला पटले असेल अशी आशा आहे. आपण सांगितल्याप्रमाणे मराठी विकीवर ’शोध’ हा पर्याय उपयुक्त ठरेलच असे नाही. तरीही आपण निरूत्साही न होता, संपादन कार्य चालू ठेवावे ही विनंती. कदाचित आपणास वर्ग वारी न जमल्यास पालक वर्गात (उदा. वर्ग:भारत, वर्ग:महाराष्ट्र) वर्गवारी करू शकता. तरीसुद्धा अशी वर्गवारी अतिशय अशक्य परिस्थितीतच करावी. जर आपणांस वर्गवारी नीट करण्याची इच्छा असेल तर आपण विकिपीडिया:प्रकल्प/वर्ग सुसूत्रीकरण या प्रकल्पात सहभागी होऊ शकता.

कौस्तुभ समुद्र (चर्चा) ११:०७, १ फेब्रुवारी २००८ (UTC)

Descriptions

[संपादन]

Hello,

First of all, thanks for your contribution to Marathi Wikipedia, especially on दिनविशेष and related pages.

When you write descriptions of people/places/events, you should avoid writing in flowerly language. For example, in इंदुताई पटवर्धन, you added --

समाजाने दूर अंध:कारात लोटलेल्या कुष्ठरोग्यांच्या जीवनात आनंद फुलवणार्‍या, डुडुळगाव...

A simple कुष्ठरोग्यांना आसरा देउन त्यांना मदत करणार्‍या... would be enough.

This is not to say she did not do what you described, but since this is an encyclopedia, to-the-point, factual and verifiable information should be added rather than point-of-view'ed material.

Thanks again.

अभय नातू १५:५९, ८ फेब्रुवारी २००८ (UTC)

स्वागत

[संपादन]

बर्‍याच दिवसांनी आल्याबद्दल पुन्हा स्वागत. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०६:१२, ८ मे २००८ (UTC)

Please try the following procedure:-
  • In firefox open 'Tools' --> 'Options'.
  • On the 'Contents' Tab, look for 'Fonts & colours' and click 'Advanced'
  • On the pop up window, select 'Fonts for' --> 'Devanagari' from the drop down list.
  • In the 'Proportional' column, select 'Serif'
  • Adjust other fonts as follows:
    • Serif - Arial Unicode MS
    • Sans-serif - Arial Unicode MS
    • Monospace - Arial Unicode MS
  • Select 'Default Character Encoding' as 'Unicode (UTF-8)'
I think the above process should solve your problem. Regards, --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०७:४१, १६ मे २००८ (UTC)
please see w:Help:Multilingual support (Indic)#Platform Independent support on Mozilla Firefox. Regards, --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०६:१४, १७ मे २००८ (UTC)

नामवंत, विख्यात, प्रख्यात, इ.

[संपादन]

सौरभदा,

येथे (विशेषतः दिवस/वर्ष पानांवर) व्यक्तींचा थोडक्यात परिचय देताना नामवंत, विख्यात, प्रख्यात, इ. विशेषणे वापरू नयेत, कारण --

१. या विशेषणांनी वाचकाच्या माहितीत काहीच भर पडत नाही.

२. या व्यक्ती नामवंत, विख्यात, प्रख्यात, इ. नसत्या तर त्यांचा उल्लेख विकिपीडियावर झालाच नसता.

अभय नातू १५:४३, १० सप्टेंबर २००८ (UTC)

शंकांना उत्तर

[संपादन]

नमस्कार, झलक पहा मधून जेव्हा झलक पाहता तेव्हा पानावरील सगळ्यात खालची बाजू पहावी, वर्गीकरण असलेले सर्व वर्ग नावे तेथे दिसतील. साच्यांची नावेही तेथेच दिसतील. केवळ कोणत्याही सदस्याने आपले खाते उघडल्यावर वरील क्रमाने सदस्य पान, चर्चा असे शब्द जेथे येतात त्याच्या बाजुलाच तुम्हाला स्थानंतरण दिसेल तेथून तुम्ही चुकीचे नाव बदलून योग्य लेखाकडे पुनर्निर्देशन असे लिहून काम पूर्ण करावे, त्याचा शॉर्टकटही वर आणि खाली आहेच. Gypsypkd ०९:२७, ३ जुलै २०१० (UTC)

सौरभदा प्रथमतः मला तुमचे शंका विचारणे मनापासून आवडले.वर्गीकरणाबाबत तुमची शंका रास्त आहे. तांत्रीक दृष्ट्या असे का हे मलाही कल्पना नाही.विकि सॉफ्टवेअर एक मुक्त सॉफ्टवेअर आहे त्यामुळे या बद्दल पुर्वी तांत्रीक चर्चा झालेल्या असणार (अर्थात मराठी आणि भारतीय लोकांचा या चर्चातून सहभाग कमी राहिलेला आहे, वाढावयास हवा हेही खरे आहे.)

बगझीला येथे तुम्हाला जुन्या चर्चा शोधता येतील.त्या शिवाय इंग्रजी विकिपीडीयावर तांत्रीक चर्चांचे पान आहे तसेच मेटा या मध्यवर्तीप्रकल्पात ,स्ट्रॅटेजी प्रस्ताव, त्या शिवाय Usability Initiative असा सुद्धा प्रकल्प आहे अशा प्रकल्प आणि चर्चातून आपल्याला अधिक माहिती मिळेल.

त्या शिवाय वर्गीकरण भरण्याची एक विशेष सुविधा आणि चर्चा पानाकरीता काही विशेष सुविधा स्ट्रॅटेजी प्रस्ताव येथे आढळून येतील या सुविधा चांगल्या आहेत आपल्या प्रश्नाचे काही अंशी निरसन तिथे होऊ शकेल पण त्याची अमंल बजावणी इतर विकिपीडीयावर होणार कि नाही आणि होणार असेल तर केव्हा या बद्दल मला कल्पना नाही. पण याबात पृच्छाकरण्यास काहीच हरकत नाही.

त्या शिवाय अशा सुचना संकलीत करण्या साठी मराठी विकिपीडियावर सुलभीकरण नावाचा एक प्रकल्प पान बनवले आहे,तेथेही अशा सुचना नोंदवून ठेवल्यास स्वागतच आहे..

माहितगार १३:०६, ३ जुलै २०१० (UTC)

गर्वगिताबद्दल मराठी व्याकरण, मराठी विकिपीडियातील शीर्षकलेखन संकेत व मुळ कवितेचे नाव या सर्वच दृष्टीने आपले म्हणणे बरोबर होते. परंतु विवा शिरवाडकरांचे लेखन प्रताधिकारीत copy right असावे .त्यामुळॅ तो लेख वगळणे अपेक्षीत होते, पण अनवधानाने राहीले होते आपण स्मरण करून दिल्या नंतर तो लेख आता वगळला आहे.

त्या काव्य लेखास इतर संदर्भ असतील तर त्या लेखाची निर्मिती आपण पून्हा करू शकता.कविता मात्र प्रताधिकार तुमच्या स्वतःकडे असतील आणि ते प्रताधिकार मुक्त करण्याची आपली इच्छा असेल तरच चढवावी.

माहितगार १३:३१, ३ जुलै २०१० (UTC)


माहितगार १३:१५, ३ जुलै २०१० (UTC)

विवा शिरवाडकरांच्या पुस्तकांची मुखपृष्ठांचे प्रताधिकार

[संपादन]

आपण विकिमीडिया कॉमन्स मध्ये पुस्तकांची मुखपृष्ठांचे चित्रे चढवताना आपण ती आपली स्वतःची निर्मिती असल्याचे म्हटले आहे.

मला माझे आणि इतर विकिपीडियनांचे या (पुस्तकांची मुखपृष्ठांचे प्रताधिकारां) बाबत थोडी माहिती दिल्यास बरे पडेल .तांत्रिकदृष्ट्या पुस्तकांच्या मुखपृष्ठावरील चित्रांचे प्रताधिकार सर्व साधारणपणे कुणाकडे असतात, चित्रकारा कडे , लेखक किंवा कवी कडे का प्रकाशकाकडे. वृत्तपत्रे पुस्तक परिक्षणे छापताना पुस्तकाचे मुखपृष्ठ छोट्या आकारात बर्‍याचदा छापतात, यातील प्रताधिकार कायदा दृष्टीने आपल्याकडे काही निश्चित माहिती असल्यास आमच्याशी जरूर शेअर करावी कारण असा प्रश्न मागे गौरी देशपांडेंच्या पुस्त्कांच्या मुखपृष्ठांबाबत आला आणि आम्ही ती चित्रे वापरण्यास विकिसदस्यास परवानगी देऊ शकलो नाही.माहितगार १३:४१, ३ जुलै २०१० (UTC)

तुम्ही मला माहिती विचारली आहे पण खरे सांगायचे तर मला याबाबत काहीच माहिती नाही. सर्वप्रथम संचिका चढवताना मी विकी कॉमन्सच्या पानावर अर्धा तास त्या पानावरची माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. काहीच कळले नाही, खूपच संदिग्ध माहिती आहे. 'संपूर्णत: माझे काम' हा पर्याय निवडायचे कारण एवढेच की तो सोडून इतर दुसर्‍या कोणत्या पर्यायातही संचिका बसण्यासारखी मला वाटली नाही. लायसन्स निवडतानाही सगळे पर्याय वाचून बघितले, काहीच कळले नाही शेवटी रेकमेंडेड हा पर्याय दिसल्यावर तोच निवडून पुढे गेलो. शिवाय पुस्तकाबाबत लेख लिहिताना आपण जी माहितीचौकट वापरतो त्यात मुखपृष्ठकाराचे नाव उपलब्ध असेल तर ते आपण देतोच. त्यामुळे असा उल्लेख केल्यावर कॉपीराईटचा मुद्दा संपला असे मी समजून चाललो होतो. त्यामुळे 'संपूर्ण माझे काम' म्हणजे त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठाची केवळ स्कॅन करुन मी काढलेली एक प्रत या अर्थानेच ते माझे काम असा पर्याय मी निवडला. तरी इंग्रजी विकीवरच्या पानाचा [१]उपयोग होऊ शकेल. इथे त्यांनी It is belived to belong to the publisher असा वाक्प्रयोग केला आहे शिवाय It makes a significant contribution to the user's understanding of the article असा मजकूर वापरला आहे. मला वाटते असे आपल्याला करता येऊ शकेल. पूर्णपणे परवानगी न देण्याऐवजी असे काही केले तर बरे होईल. कारण असे चित्र पुस्तकाच्या लेखावर असेल तर त्याने खूपच फरक पडतो याबाबत कोणाचेच दुमत होणार नाही. तरी आता लायसेन्स, प्रताधिकार यासंबंधी काही आवश्यक बदल मी आजपर्यंत चढवलेल्या संचिका पानांवर करायचे असल्यास मी तयार आहे. बाकी पानाचे निर्देशन कसे करावे आणि वर्गवारीच्या अडचणी यांचे समाधान झाले. धन्यवाद. सौरभदा १६:५५, ३ जुलै २०१० (UTC)

सहसा कमी प्रतीचे (resolution) व बदललेल्या आकारमानाचे प्रतिचित्र विकिपीडियावर वापरलेले चालते. अर्थात, त्यासाठी प्रताधिकारघोषणा व वापराचे समर्थन (चित्र वापरल्याने मजकूराच्या अर्थबोधतेत मोठी वाढ, इ) करणे आवश्यक आहे. जर प्रताधिकारधारकाने असा वापर करण्यास बंदी घातली असेल तर त्याचा मान राखावा.
हे मुखपृष्ठ, भिंतीचित्र (poster), कलाकृती, इ.ना लागू होते. छायाचित्रे ही प्रताधिकारमुक्तच असली पाहिजेत.
अभय नातू १८:३८, ८ जुलै २०१० (UTC)

.

विकीपत्रिका सभासद नोंदणी ....!
नमस्कार, सौरभदा

मराठी विकिपीडियाचा वाढत असलेला व्याप, म्हणजे कामाच्या आघाड्या आणि विपी परिवार यामध्ये उत्तम समन्वय रहावा, वेगवेगळ्या दिशांनी होणार्‍या कामांची सर्वाना माहिती व्हावी आणि सद्द घटनांबद्दल आढावा ह्या उद्देशाने मराठी विकिपीडिया विकीपत्रिका दि. १ जानेवारी २०१२ पासून सुरू करीत आहोत.

पत्रिका इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये सदस्यांना त्यांच्या चर्चापानावर पोहचविण्यात येईल.

मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.

आपल्या माहिती आणि पुढील योग्य कार्यवाहीसाठी सादर.

कळावे - खबर्या (विकीपत्रिका)


धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन

[संपादन]

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.


मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करावेत

[संपादन]

नमस्कार सौरभदा,

विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.


आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.


आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!

Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण

[संपादन]

कृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३

[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.