शीव पनवेल महामार्ग
शीव पनवेल महामार्ग | |
---|---|
शीव पनवेल मार्गाचा नकाशा | |
खारघर रेल्वे स्थानकाजवळील १०-पदरी महामार्ग | |
मार्ग वर्णन | |
देश | भारत |
लांबी | २५ किलोमीटर (१६ मैल) |
सुरुवात | शीव |
प्रमुख जोडरस्ते | पूर्व द्रुतगती महामार्ग, ठाणे-बेलापूर रस्ता, पाम बीच रस्ता, मुंबई–पुणे द्रुतगतीमार्ग, राष्ट्रीय महामार्ग ४ |
शेवट | कळंबोली |
स्थान | |
शहरे | मुंबई, नवी मुंबई, पनवेल |
जिल्हे | मुंबई उपनगर जिल्हा, ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा |
राज्ये | महाराष्ट्र |
शीव पनवेल महामार्ग (Sion Panvel Highway) हा मुंबई महानगर क्षेत्रामधील एक महत्त्वाचा रस्ता आहे. २५ किमी लांबीचा हा दृतगतीमार्ग पूर्व-पश्चिम धावतो व मुंबई शहराला नवी मुंबई व पनवेल शहरांसोबत जोडतो. कळंबोली येथे हा महामार्ग मुंबई–पुणे द्रुतगतीमार्गासोबत जोडला गेला असल्यामुळे पुणे व दक्षिणेकडील सर्व शहरांना मुंबईसोबत जोडणारा तो एक महत्त्वाचा दुवा आहे. त्याचसोबत पनवेलमार्गे कोकण व गोवा देखील ह्याच मार्गाने मुंबईसोबत जोडले गेले आहे. हा महामार्ग मुंबईच्या शीव, चेंबूर, अणुशक्ती नगर, मानखुर्द तर नवी मुंबईच्या वाशी, सानपाडा, तुर्भे, नेरूळ, सी.बी.डी. बेलापूर, खारघर, कामोठे व कळंबोली ह्या उपनगरांना जोडतो.
महाराष्ट्रामधील सर्वात वर्दळीच्या महामार्गांपैकी एक असलेल्या शीव पनवेल महामार्गावरील वाहतूकीची कोंडी हटवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ह्या मार्गाचे रूंदीकरण व काँक्रीटीकरण केले ज्यासाठी ₹ १७०० कोटी इतका प्रचंड खर्च आला. हा खर्च वसूल करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने येथे पथकर (टोल) आकारण्याचा निर्णय घेतला व ६ जानेवारी २०१५ पासून ह्या महामार्गावर मोटार गाड्यांना एकेरी प्रवासासाठी ₹३० इतका टोल भरावा लागतो.