वेंब्ली स्टेडियम (१९२३)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वेंब्ली मैदानावरील एक फुटबॉल सामना

वेंब्ली स्टेडियम हे युनायटेड किंग्डमच्या लंडन शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम होते. ग्रेटर लंडनच्या ब्रेंट बरोमध्ये १९२३ साली बांधले गेलेले हे स्टेडियम २००३ साली पाडून टाकण्यात आले. ह्याच जागेवर आजचे नवीन वेंब्ली स्टेडियम उभे आहे.

वेंब्ली स्टेडियममध्ये १९४८ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा खेळवल्या गेल्या होत्या. तसेच २००० सालापर्यंत ते इंग्लंड फुटबॉल संघाचे यजमान स्टेडियम होते. येथे अनेक संगीत महोत्सवांचे देखील आयोजन केले गेले.