Jump to content

"अमोल पालेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो copy edit
(चर्चा | योगदान)
ओळ ४४: ओळ ४४:


==वैयक्तिक जीवन==
==वैयक्तिक जीवन==
अमोल पालेकर हे मुंबईतील कमलाकर आणि सुहासिनी पालेकर यांच्या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मले. त्यांचे वडिल पोस्टात काम करत असत आणि आई खाजगी कंपनी काम करत होती. त्यांच्या निलू, रेखा आणि उन्नती या तीन बहिणी आहेत<ref name=toi/>. ते [[जे.जे. स्कूल ऑफ आर्ट]]चे विद्यार्थी होते. त्यांच्या रेखाटनांचे आणि चित्रांचे मुंबईत प्रदर्शन करण्यात आले आहे. त्यांच्या पहिल्या पत्नी चित्रा यांपासून विभक्त झाल्यावर त्यांनी संध्या गोखले यांच्याशी दुसरे लग्न केले आहे<ref>[http://www.harmonyindia.org/hportal/VirtualPageView.jsp?page_id=15195&index1=5 Silvers of the year].</ref><ref>{{cite news|दुवा=http://www.indianexpress.com/news/Next-Turn/655383|शीर्षक=Amol Palekar is back in action, this time with an English language ...|date=2 August 2010|work=[[Indian Express]]|accessdate=13 August 2010}}</ref><ref name=toi/> पालेकर स्वतःला देवाच्या बाबतीत अनभिज्ञ मानतात.<ref>[http://www.ibnlive.com/news/being-amol-palekar-the-storyteller/19856-8.html Amol Palekar at ibnlive]</ref>.
अमोल पालेकर हे मुंबईतील कमलाकर आणि सुहासिनी पालेकर यांच्या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मले. त्यांचे वडील पोस्टात काम करत असत आणि आई खाजगी कंपनी काम करत होती. त्यांच्या निलू, रेखा आणि उन्नती या तीन बहिणी आहेत<ref name=toi/>. अमोल पालेकर हे [[जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्‌स]]चे विद्यार्थी होते. त्यांच्या रेखाटनांचे आणि चित्रांचे मुंबईत प्रदर्शन करण्यात आले होते. त्यांच्या पहिल्या पत्नी चित्रा यांच्यापासून विभक्त झाल्यावर त्यांनी संध्या गोखले यांच्याशी दुसरे लग्न केले आहे<ref>[http://www.harmonyindia.org/hportal/VirtualPageView.jsp?page_id=15195&index1=5 Silvers of the year].</ref><ref>{{cite news|दुवा=http://www.indianexpress.com/news/Next-Turn/655383|शीर्षक=Amol Palekar is back in action, this time with an English language ...|date=2 August 2010|work=[[Indian Express]]|accessdate=13 August 2010}}</ref><ref name=toi/> पालेकर स्वतःला देवाच्या बाबतीत अनभिज्ञ मानतात.<ref>[http://www.ibnlive.com/news/being-amol-palekar-the-storyteller/19856-8.html Amol Palekar at ibnlive]</ref>.

==अमोल पालेकरांनी भूमिका केलेली नाटके==

'''मराठी:'''
* अवध्य
* आपलं बुवा असं आहे
* काळा वजीर पांढरा घोडा
* गार्बो
* गोची
* पार्टी
* पुनश्च हरि ॐ
* मुखवटे
* राशोमान
* वासनाकांड

'''हिंदी''' :
* आधे अधुरे
* चूप कोर्ट चालू है
* पगला घोडा
* सुनो जनमेजय
* हयवदन


==मानसन्मान==
==मानसन्मान==

१४:०५, २५ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती

अमोल पालेकर
टीच एड्ससाठी ध्वनिमुद्रण करताना अमोल पालेकर (इ.स. २००९)
जन्म अमोल कमलाकर पालेकर
२४ नोव्हेंबर[], इ.स. १९४४
मुंबई, ब्रिटिश भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय, दिग्दर्शन
कारकीर्दीचा काळ इ.स. १९७१ -आजपर्यंत
भाषा मातृभाषा: मराठी
अभिनय: मराठी, हिंदी
प्रमुख चित्रपट गोलमाल (हिंदी चित्रपट), रजनीगंधा
पुरस्कार फिल्मफेर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार(१९७९)
वडील कमलाकर पालेकर []
आई सुहासिनी पालेकर []
पत्नी संध्या गोखले
अधिकृत संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ

अमोल कमलाकर पालेकर (२४ नोव्हेंबर, इ.स. १९४४; - हयात ) हे मराठी चित्रपटसृष्टीतीलहिंदी चित्रपटसृष्टीतील एक अभिनेते, दिग्दर्शक, चित्रकार आहेत.[]

कारकीर्द

पालेकर यांनी सत्यदेव दुबे यांच्याबरोबर मराठी प्रयोगात्मक नाटकात पदार्पण केले आणि नंतर "अनिकेत" हे स्वतःचे नाट्यमंडळ १९७२ मध्ये सुरू केले.

त्यांनी चित्रपटातील अभिनयाची सुरुवात इ.स. १९७१ सालच्या शांतता! कोर्ट चालू आहे या सत्यदेव दुबे दिग्दर्शित मराठी चित्रपटातून केली. या चित्रपटासून नवीन मराठी चित्रपट चळवळ सुरू झाली असे समजले जाते. [].

इ.स. १९७४ मध्ये त्यांनी बासू चॅटर्जी यांच्या रजनीगंधा आणि छोटीसी बात या कमी खर्चात केलेल्या पण गाजलेल्या चित्रपटात काम केले. यातूनच आणखी विनोदी चित्रपटांतून त्यांना "मध्यमवर्गीय" माणसाच्या भूमिका मिळत गेल्या. नरम गरम, गोलमाल हे असे चित्रपट आहेत. गोलमाल चित्रपटासाठी त्यांना इ.स. १९७९ मध्ये फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार मिळाला. इ.स. १९८२ मध्ये त्यांनी ओलंगल या मल्याळम चित्रपटात रवीची भूमिका केली, नंतर हा चित्रपट हिंदीत मासूम नावाने करण्यात आला.

मराठी चित्रपट आक्रीत पासून त्यांनी दिग्दर्शनाची सुरुवात केली. त्यांनी दिग्दर्शित केलेला पहेली हा चित्रपट इ.स. २००६ मध्ये सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटासाठीच्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारतातर्फे अधिकृतरीत्या पाठविण्यात आला. पण तो अखेरच्या नामांकनांपर्यंत पोचला नाही.

त्यांनी आपला आवाज टीचएड्स या समाजसेवी संस्थेने तयार केलेल्या एड्ससाठीच्या शैक्षणिक संगणकप्रणालीत वापरला आहे. []

वैयक्तिक जीवन

अमोल पालेकर हे मुंबईतील कमलाकर आणि सुहासिनी पालेकर यांच्या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मले. त्यांचे वडील पोस्टात काम करत असत आणि आई खाजगी कंपनी काम करत होती. त्यांच्या निलू, रेखा आणि उन्नती या तीन बहिणी आहेत[]. अमोल पालेकर हे जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्‌सचे विद्यार्थी होते. त्यांच्या रेखाटनांचे आणि चित्रांचे मुंबईत प्रदर्शन करण्यात आले होते. त्यांच्या पहिल्या पत्नी चित्रा यांच्यापासून विभक्त झाल्यावर त्यांनी संध्या गोखले यांच्याशी दुसरे लग्न केले आहे[][][] पालेकर स्वतःला देवाच्या बाबतीत अनभिज्ञ मानतात.[].

अमोल पालेकरांनी भूमिका केलेली नाटके

मराठी:

  • अवध्य
  • आपलं बुवा असं आहे
  • काळा वजीर पांढरा घोडा
  • गार्बो
  • गोची
  • पार्टी
  • पुनश्च हरि ॐ
  • मुखवटे
  • राशोमान
  • वासनाकांड

हिंदी :

  • आधे अधुरे
  • चूप कोर्ट चालू है
  • पगला घोडा
  • सुनो जनमेजय
  • हयवदन

मानसन्मान

चित्र:Amol palekar 1.jpg
गोव्यात आंतराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल,२०१० प्रसंगी

पुरस्कार

रंगभूमीसाठी योगदान

अमोल पालेकर प्रायोगिक रंगभूमीसाठीच आपले बरेचसे योगदान दिले. व्यावसायिक रंगभूमीवर ते फारसे रमले नाहीत. अमोल पालेकरांनी व्यावसायिक रंगभूमीवर फार कमी नाटके केली. आपलं बुवा असं आहे, मुखवटे, मी राव जगदेव मार्तंड ही नाटके त्यांनी केली. दामू केंकरेंबरोबर काम करण्यासाठी आणि अनिकेत या त्यांच्या नाट्यसंस्थेला झालेले कर्ज फेडण्यासाठी पालेकरांनी आपलं बुवा असं आहे हे नाटक केले. मराठी रंगभूमीसाठी त्यांनी बादल सरकार महोत्सव, विजय तेंडुलकर महोत्सव यासारखे महोत्सवही भरवले.

चित्रपटसृष्टीतील योगदान

अभिनेता म्हणून

वर्ष/साल चित्रपट भूमिका सह-कलाकार
इ.स. १९७४ रजनीगंधा संजय विद्या सिन्हा
इ.स. १९७५ छोटी सी बात अरुण विद्या सिन्हा , असराणी , अशोक कुमार
इ.स. १९७६ चितचोर विनोद झरीना वहाब
इ.स. १९७६ घरोंदा सुदीप झरीना वहाब
इ.स. १९७७ भूमिका केशव दळवी स्मिता पाटील , नसीरुद्दीन शाह , अनंत नाग
इ.स. १९७७ टॅक्सी टॅक्सी देव जाहीरा , रीना रॉय , अरुणा इराणी
इ.स. १९७८ दामाद रंजीता
इ.स. १९७९ बातों बातों मे टोनी ब्रगांजा टीना मुनीम , डेविड , असरणी
इ.स. १९७९ गोल माल राम प्रसाद शर्मा /
लक्ष्मण प्रसाद शर्मा
बिंदीय गोस्वामी , उत्पल दत्त
इ.स. १९७९ दो लडके डोनो कडके हरी नवीन निश्चल
इ.स. १९७९ मेरी बिवी की शादी भगवंत कुमार बरतेनदू "भागू " रंजीता , अशोक सराफ
इ.स. १९८० आंचल किशन लाल राखी , राजेश खन्ना
इ.स. १९८० अपने पराये चंद्रनाथ शबाना आझमी , गिरीश कर्नाड , उत्पल दत्त
इ.स. १९८१ नरम गरम राम ईश्वर प्रसाद स्वरूप संपत , उत्पल दत्त , ए . के . हनगल
इ.स. १९८२ ओळंगळ रवी चाततान पूर्णिमा जयाराम , अदूर भासी
इ.स. १९८३ श्रीमान श्रीमती मधु गुप्ता संजीव कुमार , राखी , राकेश रोशन
इ.स. १९८३ रंग बिरंगी अजय शर्मा परवीन बाबी , फारूक शेख , दीप्ति नवल
इ.स. १९८४ तरंग राहुल स्मिता पाटील , श्रीराम लागू , गिरीश कर्नाड
इ.स. १९८४ आदमी और औरत माहुया रॉय चौदूरी , कल्याण चॅटर्जी
इ.स. १९८५ खामोश हिमसेल्फ नसीरुद्दीन शाह , शबाना आझमी
इ.स. १९८५ झुठी इंस्पेक्टर कमाल नाथ रेखा , राज बब्बर
इ.स. १९८६ बात बन जये येशवंत राव भोसले जीनत अमान , उत्पल दत्त
इ.स. १९९४ तीसरा कौन ? सी . के . कदम चंकी पांडे , सतीश शाह , राकेश बेदी
इ.स. २००१ अक्स द डिफेंस मिनिस्टर अमिताभ बच्चन , रवीना टंडन , मनोज वाजपेयी
इ.स. २००९ समांतर (मराठी चित्रपट) केशव वझे शर्मिला टागोर , मकरंद देशपांडे

अन्य भाषेतील चित्रपट

  • मदर (बंगाली ) (सहकलाकार - शर्मिला टागोर आणि दिपांकर डे )
  • कलंकिनी (बंगाली ) (सहकलाकार - ममता शंकर – दिग्दर्शक - धिरेन गांगुली )
  • चेना अचेना (बंगाली ) (सहकलाकार - तनुजा आणि सौमित्र चतेर्जी )
  • कन्नेश्वर राम (कन्नड ) (सहकलाकार - अनंत नाग आणि शबाना आझमी – दिग्दर्शक - एम .एस .साठयू )
  • पेपर बोट्स (कान्नड आणि इंग्लिश ) (दीपा - दिग्दर्शक - पट्टभिरमा रेड्डी )
  • ओलंगल (मल्याळम ) (सहकलाकार - जयराम आणि आंबिका दिग्दर्शक - बलू महेंद्र )

चित्रपटातील गाजलेली गाणी

  • गोरी तेरा गांव बडा प्यारा
  • शाम रंग रंगा रे, हर पल मेरा रे
  • जब दीप जले आना
  • तू जो मेरे सूर मे
  • आनेवाला पल जानेवाला है
  • रजनीगंधा फूल तुम्हारे

  • सुनिये, कहिये
  • सपने मे देखा सपना
  • दो दिवाने शहर मे
  • जानेमन, जानेमन
  • तुम्हे हो ना हो
  • आजसे पहले आजसे ज्यादा

संदर्भ

  1. ^ a b http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=116385:2010-11-21-19-42-16&catid=45:2009-07-15-04-01-33&Itemid=56. २४ नोव्हेंबर हा अमोल पालेकर यांचा वाढदिवस. त्यानिमित्त त्यांचा याच कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ a b c d अमोल पालेकर: बातों बातोंमें
  3. ^ Chronology of Indian Cinema at upperstall
  4. ^ The New Indian Express. 27 November 2010 http://expressbuzz.com/cities/hyderabad/star-touch-to-animated-film-on-hivaids/226342.html. 16 December 2010 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ Silvers of the year.
  6. ^ Indian Express. 2 August 2010 http://www.indianexpress.com/news/Next-Turn/655383. 13 August 2010 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  7. ^ Amol Palekar at ibnlive

बाह्य दुवे