Jump to content

स्वरूप संपत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्वरूप संपत रावळ
स्वरूप संपत (२०१४)
जन्म स्वरूप परेश रावळ
३ नोव्हेंबर, १९५८ (1958-11-03) (वय: ६७)
गुजरात
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय , मॉडेलिंग , चित्रपट निर्माता
कारकीर्दीचा काळ १९८० ते आजतागायत
भाषा गुजराती
प्रमुख दूरचित्रवाणी कार्यक्रम ये जो है जिंदगी
पुरस्कार फेमिना मिस इंडिया - १९७९
पती []
अपत्ये आदित्य, अनिरुद्ध

डॉ स्वरूप रावल (पूर्वाश्रमीच्या स्वरूप संपत), (३ नोव्हेंबर, १९५८ - हयात) ह्या एक भारतीय अभिनेत्री आहेत. त्या ८० च्या दशकातील 'नरम गरम' आणि 'नाखुदा' सारख्या हिंदी चित्रपटांमधील भूमिका तसेच 'ये जो है जिंदगी' सारख्या दूरचित्रवाणी मालिकांमधील भूमिकांसाठी ओळखल्या जातात.[] त्यांनी इस १९७९ मधील 'भारत सुंदरी' (मिस इंडिया)चा पुरस्कार जिंकला होता. तसेच त्याच साली विश्व सुंदरी (मिस युनिव्हर्स) स्पर्धेत मध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व देखील केले होते.[][]

वैयक्तिक आयुष्य

[संपादन]

स्वरूप संपत ने अभिनेता परेश रावळसोबत इ.स. १९८७ साली लग्न केले.[] ती तिच्या पती अभिनीत नाटकांचे दिग्दर्शन आणि अभिनय करते. त्यांना अनिरुद्ध आणि आदित्य अशी दोन मुले आहेत

परेश रावल आणि स्वरूप संपत 'ओये लकी! लकी ओये!' चित्रपटाच्या वेळी

स्वरूप संपत यांनी वूस्टर विद्यापीठ येथून पीएचडी मिळवली आहे.[][] नाटकाचा वापर करून अपंगत्व असलेल्या मुलांचे जीवन कौशल्य कसे वाढवता येईल यावर प्रबंध सादर केला (डॉक्टरेट).[]

अभिनयाची कारकीर्द

[संपादन]

स्वरूप संपत यांनी ८० च्या दशकातील दूरदर्शन वरील प्रचंड लोकप्रिय मालिका 'ये जो है जिंदगी' मध्ये मुख्य भूमिका साकारली. यात त्यांनी शफी इनामदारच्या रेणू नावाच्या पत्नीची भूमिका साकारली होती. त्यांना ये जो है जिंदगीची स्क्रिप्ट खूपच हृदयस्पर्शी वाटली होती आणि त्यांची अशी खात्री होती की ही भूमिका सामान्य लोकांशी चांगली जोडलेली आहे आणि त्यांच्या दैनंदिन क्रियाकलाप आणि साधेपणाने जीवन जगते. आणि केवळ यासाठी त्यांनी दूरदर्शन वरील दुसरी एक महत्त्वाची मालिका नाकारली होती. आज त्यांना हा निर्णय घेतल्याचे सार्थक वाटते. त्यावेळी कमल हासन - रीना रॉय यांच्या भूमिका असलेला चित्रपट 'करिश्मा' मध्ये देखील दिसल्या होत्या.

संपत यांनी 'शिंगार' या कुमकुम कंपनीसाठी मॉडेलिंग केले होते.

त्या आजच्या काळात अपंग मुलांना अभिनय शिकवतात. तसेच आपल्या प्रबंध शोधाचा सदुपयोग करून घेण्यासाठी त्या भारतभर प्रवास करतात आणि शिक्षकांसाठी कार्यशाळा आयोजित करतात.[]

गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुलांसाठी शैक्षणिक कार्यक्रमाचे नेतृत्व करण्यासाठी संपत यांची निवड केली होती.[]

जगभरातील १७९ देशांतील १०,००० नामांकनांमध्ये, वार्की फाउंडेशनने आयोजित केलेल्या ग्लोबल टीचर बक्षीससाठी तिला टॉप-१० ग्लोबल फायनलिस्टमध्ये निवडण्यात आले होते.[]

कारकीर्द

[संपादन]

दूरचित्रवाहिनी

[संपादन]
वर्षमालिकाभूमिकासहकलाकारपुरस्कार
१९८४–१९८५ये जो है जिंदगीरेणूशफी इनामदार, स्वाति चितळे, राकेश बेदी
१९९०ये दुनियां गजब कीराकेश बेदी, सत्येन कप्पू
१९९०ऑल द बेस्टफरिदा जलाल, देवेन बोस
१९९०बीवी तो बिवी साला रे सालालक्ष्मीराकेश बेदी, रीमा लागू
१९९४–१९९८शांतीमंधिरा बेदी, अमित बहल, आरिफ झकारिया
१९९८–१९९९गृहस्थीराकेश बेदी, रीना कपूर
२०००–२००१रिश्तेविविध भूमिकाओम पुरी, सुहासिनी मुले, किरण कुमार
२००२–२००४कुसुमअतिथी भूमिकानरेश सोनी, राकेश बेदी
२००५–२००६घर की बात हैअली असगर, सुमीती अरोरा
२००८–२०१०वो रहने वाली महलों कीअमन वर्मा, नीलू कोहली

चित्रपट

[संपादन]
वर्षचित्रपटभूमिकासहकलाकारपुरस्कार
२०२१द व्हाईट टायगरसमाजसेविकाआदर्श गौरव, प्रियंका चोप्रा, राजकुमार राव
२०१९उरी: सर्जिकल स्ट्राइकसुहाशिनी शेरगिलविकी कौशल, यामी गौतम, परेश रावल
२०१६की अँड काकि आची आईअर्जुन कपूर, करीना कपूर
२०१३सप्तपदीस्वाती संघवीस्वप्नील जोशी, मुक्ता बर्वे
२००२साथियाशांतीराणी मुखर्जी, विवेक ओबेरॉय, शाहरुख खान (विशेष भूमिका)
१९८६कर्मदातानीताशत्रुघ्न सिन्हा, राजकिरण, पद्मिनी कोल्हापुरे
१९८५जान की बाज़ीराजीव कपूर, रीना रॉय
१९८५बहु की आवाजकवितारोहन कपूर, फरीदा जलाल
१९८४करिश्मासपनाकुणाल कपूर, रेणुका शहाणे
१९८४लोरीसुमनशबाना आजमी, फारूक शेख
१९८३हिम्मतवालापद्माजीतेन्द्र, श्रीदेवी
१९८२तुम्हारे बिनासीमा दत्तनवीन निश्चल, श्रीदेवी
१९८२सवालरेशमी सिंगशशि कपूर, मिथुन चक्रवर्ती
१९८१नाखुदासोनिया गुप्ताराज बब्बर, स्वरूप संपत
१९८१नरम गरमकुसुमअमोल पालेकर, उत्पल दत्त, स्वरूप संपत

संदर्भ

[संपादन]
  1. 1 2 "Members : Loksabha" (इंग्रजी भाषेत). २९ सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
  2. "Swaroop Sampat". IMDb.
  3. "1980-1971 - Beauty Pageants - Indiatimes". Femina Miss India. 2023-05-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-09-28 रोजी पाहिले.
  4. "The right recipe". द हिंदू. 14 April 2007. 29 May 2018 रोजी पाहिले.
  5. "Archived copy". 2007-10-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-11-03 रोजी पाहिले.CS1 maint: archived copy as title (link)
  6. "Swaroop Sampat-Profile". indiatimes.com. 2015-04-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 7 April 2015 रोजी पाहिले.
  7. 1 2 "Teaching life skills is now her role | Ahmedabad News - टाइम्स ऑफ इंडिया". द टाइम्स ऑफ इंडिया.
  8. "Archived copy". 2009-11-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-11-03 रोजी पाहिले.CS1 maint: archived copy as title (link)
  9. "મુકેશ અંબાણીથી ઓછી સંપતિ નથી પરેશ રાવલની પત્ની હિરોઈને પણ ટક્કર આપે છે… | Rahasya" (इंग्रजी भाषेत). 2021-05-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-03-25 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]