Jump to content

झीनत अमान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जीनत अमान या पानावरून पुनर्निर्देशित)
झीनत अमान
ईशा देओलच्या विवाहभोजप्रसंगी झीनत अमान
जन्म नोव्हेंबर १९, इ.स. १९५१
मुंबई, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट
कारकीर्दीचा काळ १९७१-१९८९
भाषा हिंदी (चित्रपट)
प्रमुख चित्रपट यादों की बारात, रोटी कपडा और मकान, डॉन, सत्यम शिवम सुंदरम, क़ुर्बानी , पानिपत
पती मजहर खान

झीनत अमान (हिंदी : ज़ीनत अमान, उर्दू : زینت امان) (जन्म १९ नोव्हेंबर १९५१) ही हिंदी चित्रपटांमधील भारतीय अभिनेत्री आहे. १९७० मध्ये मिस एशिया पॅसिफिक ही स्पर्धा तिने जिंकली होती. १९७० च्या व १९८० च्या दशकात हिंदी चित्रपटांमधून अभिनय करताना हिंदी सिनेमांमध्ये पाश्चात्त्य दृष्टिकोन आणून तत्कालीन आघाडीच्या नायिकांना प्रभावित करण्याचे श्रेय झीनतला दिले जाते. संपूर्ण कारकिर्दीदरम्यान झीनत अमानला "प्रणय प्रतीक" मानले गेले. [१][२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Gulzar; Nihalani, Govind; Chatterji, Saibal (2003). Encyclopaedia of Hindi Cinema. Popular Prakashan. p. 108.
  2. ^ Raheja, Dinesh (12 November 2002). "The A to Z of Zeenat Aman". Rediff.com.