Jump to content

"नाथ संप्रदाय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
खूणपताका: हिंदी अथवा मराठी लेखन त्रुटी
ओळ ५६: ओळ ५६:
|-
|-
|}
|}

<br />
<br />

==नाथपंथावरील मराठी पुस्तके==
* अमनस्क योग
* गर्भगिरीतील नाथपंथ (टी.एन. परदेशी)
* गोरक्ष संहिता (गोरखनाथ)
* नवनाथचरित्र
* नवनाथ भक्तिसार
* नाथ संप्रदायाचा इतिहास (डॉ. [[रा.चिं. ढेरे]])
* योग चिंतामणी (गोरखनाथ)
* योग बीज (गोरखनाथ)
* योग मार्तंड (गोरखनाथ)
* योग सिद्धान्त पद्धती (गोरखनाथ)
* सिद्ध सिद्धान्त पद्धती (गोरखनाथ)
* सिद्धान्तरहस्य (सत्यामलनाथ)
* ज्ञानदीपबोध

==ग्रंथालय==
जळगावला प्राचार्य शंकर कृष्णा जोगी यांनी नाथ संप्रदायांवरील सर्व जुन्या-नव्या-दुर्मीळ ग्रंथांचे, हस्तलिखितांचे एक संदर्भ वाचनालय स्थापन केले आहे.


{{नवनाथ}}
{{नवनाथ}}

२२:३३, २६ मार्च २०१९ ची आवृत्ती

इतर नावे : योग संप्रदाय, सिद्ध संप्रदाय, अवधूत संप्रदाय, दर्शनी पंथ, गोरख पंथ, गोरखनाथी संप्रदाय, कानफाटा संप्रदाय, गुरू संप्रदाय

नाथ संप्रदाय हा भारतातील एक शैव संप्रदाय आहे. "नाथ" या संज्ञेचा अर्थ रक्षणकर्ता अथवा स्वामी असा होतो. आदिनाथ म्हणजेच शिव वा महादेव यांच्यापासून या संप्रदायाचा उगम झाला म्हणून त्याला "नाथ संप्रदाय" असे नाव मिळाले, असे सांगण्यात येते. या संप्रदायाची दीक्षा घेतल्यानंतर व्यक्ती आपल्या नावानंतर "नाथ" हा शब्द जोडता येतो.

नाथ संप्रदायाची स्थापना मत्स्येंद्रनाथ ऊर्फ मच्छिंद्रनाथ यांनी केली, आणि गोरक्षनाथ ऊर्फ गोरखनाथ यांनी त्याचा पुढे विकास केला.

नाथपंथ या लेखातून विलीनीकरणासाठी स्थानांतरित

नाथपंथ वा नाथ संप्रदाय हा शैव संप्रदायातील एक योगप्रधान संप्रदाय असून ह्याचा उगम (सुमारे ८व्या ते १२वे शतकात) आदिनाथ परमेश्वर शिव ह्याच्यापासून झाला, अशी ह्यांच्या अनुयायांची समजूत आहे. योगमार्गाने सिद्घावस्था प्राप्त करणे, हे ह्या पंथाचे ध्येय होय. नवव्या शतकातील मच्छिंद्रनाथ हे ह्या संप्रदायाचे पहिले मानवी गुरु. गोरखनाथांनी ह्या संप्रदायाला नावारूपाला आणले.

नाथ संप्रदायाचा उगम कोठे झाला, ह्याबद्दल मतभेद आहेत. ह्या संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाचा पाया म्हणजे शिव हेच अंतिम सत्य असून तोच पिंड बह्मांडाचा आधार होय, ही भूमिका.. नाथांचे नवनाथ कोण ह्याविषयी अभ्यासकांत एकमत नाही. नाथपंथीयांना सिद्घी प्राप्त असून ते अनेक प्रकारचे चमत्कार घडवून आणू शकतात, अशी समजूत आहे. भारतात आणि महाराष्ट्रात ह्या पंथाला महत्त्वाचे स्थान आहे ज्ञानेश्वर हे नाथपंथाशी संबद्घ होते. ज्ञानेश्वरांना नाथ संप्रदायाची शिकवण त्यांचे वडील बंधू निवृत्तिनाथ ह्यांच्याकडून मिळाली होती. त्यामुळे वारकरी संप्रदायाशी नाथपंथाचा संबंध आला. नाथ संप्रदाय वर्णव्यवस्थेला मानत नाही. भारतातील वेगवेगळ्या धर्मपंथांशी नाथपंथाचा कोणत्या तरी स्वरूपात संबंध आलेला दिसतो. बौद्ध धर्माच्या भारतातील शेवटच्या काळात महायान पंथात तांत्रिक कर्मकांड रूढ झाले होते. त्याचाच वारसा नाथ संप्रदायाने पुढे चालवला असे म्हणता येईल. या संप्रदायाच्या रूपनाथ येथील मंदिराशेजारी सम्राट अशोकाचा शिलालेख सापडला आहे.

उगमस्थान

त्र्यंबकेश्‍वर हे नाथसंप्रदायाचे पहिले मानले जाते. याच ठिकाणी गुरू गोरक्षनाथांनी नऊ नाथांना व ८४ सिद्धांना उपदेश केला आहे. ते उपदेश केलेले ठिकाण म्हणजे अनुपम शिळा होय. या अनुपम शिळेला बोलीभाषेत अनुपान शिळा असेही संबोधन आहे.

अनुपम शिळा महत्त्व

ब्रह्मगिरीवरील कौलगिरीच्या पोटाला अनुपम शिळा आहे. या अनुपम शिळेविषयीची नाथांची धारणा अशी एकदा सिंहस्थ कुंभमेळ्यात साठ हजार ऋषी सध्या जिला अहिल्या नदी म्हणतात तेथे स्नान करीत होते. गुरू गोरक्षनाथ बालस्वरूपात तेथे आले व तेही स्नान करू लागले. त्या वेळी त्यांनी "हर हर गंगे‘ अशी हाक दिली. बाकीचे ऋषी म्हणू लागले की ही गंगा नाही, गोदावरी आहे. तू तिला गंगा कसे काय म्हणतोस? त्या वेळी गोरक्षनाथांनी गंगेची आराधना केली. प्रत्यक्ष गंगा तेथे प्रकट झाली. त्या वेळी ऋषींनी विचारले, महाराज तुम्ही कोण आहात. तेव्हा गोरक्षनाथ मूळ रूपात प्रकट झाले. तेव्हापासून नाथसंप्रदाय तिला गंगा मानतात. त्यामुळे ज्याला सामान्य व्यक्ती अहल्या-गौतमी संगम म्हणतात, त्यालाच नाथसंप्रदायाचे साधू गंगा-गौतमीचा संगम मानतात.

नागपंचमी महत्त्व

दर बारा वर्षांनी नागपंचमीच्या दिवशी देशभरातील नाथ याच संगमावर स्नान करतात. साठ हजार ऋषींच्या विनंतीवरून गुरू गोरक्षनाथांनी त्यांना उपदेश देण्याचे मान्य केले. त्या सर्व ऋषींना घेऊन गोरक्षनाथ कौलगिरीकडे गेले. तेथे त्यांनी एका शिळेवर सर्व ऋषींना बसवून उपदेश दिला. त्यातील गुरू गोरक्षनाथांची सांगितलेला प्रत्येक शब्द जसाच्या तसा नऊ जणांनी ग्रहण केला. त्यांना नवनाथ असे म्हणतात. तो उपदेश ऐकून ८४ जण उभे राहिले व त्यांना त्यातील भावार्थ समजला. म्हणून त्यांना सिद्ध म्हणतात. नवनाथ व ८४ सिद्धांना या शिळेवर गुरू गोरक्षनाथांची उपदेश केल्याने या शिळेला अनुपम शिळा म्हणतात. अनुपम म्हणजे उपमा नसलेली शिळा.

संदर्भ

नाथ

नवनारायण नवनाथ

नवनाथ नवनारायण गुरू
मच्छिंद्रनाथ कवि दत्तात्रेय
गोरक्षनाथ हरि मच्छिंद्रनाथ
गहिनीनाथ करभाजन गोरक्षनाथ
जालिंदरनाथ अंतरिक्ष दत्तात्रेय
कानिफनाथ प्रबुद्ध जालिंदरनाथ
भर्तरीनाथ द्रुमिल दत्तात्रेय
रेवणनाथ चमस दत्तात्रेय
नागनाथ आविर्होत्र दत्तात्रेय
चरपटीनाथ पिप्पलायन दत्तात्रेय


नाथपंथावरील मराठी पुस्तके

  • अमनस्क योग
  • गर्भगिरीतील नाथपंथ (टी.एन. परदेशी)
  • गोरक्ष संहिता (गोरखनाथ)
  • नवनाथचरित्र
  • नवनाथ भक्तिसार
  • नाथ संप्रदायाचा इतिहास (डॉ. रा.चिं. ढेरे)
  • योग चिंतामणी (गोरखनाथ)
  • योग बीज (गोरखनाथ)
  • योग मार्तंड (गोरखनाथ)
  • योग सिद्धान्त पद्धती (गोरखनाथ)
  • सिद्ध सिद्धान्त पद्धती (गोरखनाथ)
  • सिद्धान्तरहस्य (सत्यामलनाथ)
  • ज्ञानदीपबोध

ग्रंथालय

जळगावला प्राचार्य शंकर कृष्णा जोगी यांनी नाथ संप्रदायांवरील सर्व जुन्या-नव्या-दुर्मीळ ग्रंथांचे, हस्तलिखितांचे एक संदर्भ वाचनालय स्थापन केले आहे.

नवनाथ
मच्छिंद्रनाथगोरखनाथगहिनीनाथजालिंदरनाथकानिफनाथभर्तृहरिरेवणनाथनागनाथचरपटीनाथ