"मनमोहन सिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक
सांगकाम्या (चर्चा | योगदान) |
|||
ओळ ५०: | ओळ ५०: | ||
* The Accidental Prime Minister (मूळ लेखक : संजय बारू. याच नावाचा मराठी अनुवाद : [[लीना सोहोनी]], , प्रकाशक मेहता पब्लिकेशन) |
* The Accidental Prime Minister (मूळ लेखक : संजय बारू. याच नावाचा मराठी अनुवाद : [[लीना सोहोनी]], , प्रकाशक मेहता पब्लिकेशन) |
||
* डॉ. मनमोहनसिंग - एक वादळी पर्व (लेखक : सुजय शास्त्री; ग्रंथाली प्रकाशन) |
* डॉ. मनमोहनसिंग - एक वादळी पर्व (लेखक : सुजय शास्त्री; ग्रंथाली प्रकाशन) |
||
==चित्रपट== |
|||
* दि अॅक्सिडेन्टल प्राईम मिनिस्टर (हिंदी, दिग्दर्शक : विजय गुट्टे) |
|||
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------ |
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------ |
२१:५३, ५ ऑगस्ट २०१८ ची आवृत्ती
मनमोहन सिंग | |
कार्यकाळ मे १९, इ.स. २००४ – मे २६, इ.स. २०१४ | |
राष्ट्रपती | प्रतिभा पाटील |
---|---|
जन्म | २६ सप्टेंबर, १९३२ गाह, पश्चिम पंजाब, ब्रिटिश भारत |
राष्ट्रीयत्व | भारत |
राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
पत्नी | गुरुशरण कौर |
अपत्ये | ३ |
धर्म | शीख |
डॉ.मनमोहन सिंग (मराठी लेखनभेद: मनमोहनसिंग ; पंजाबी: ਮਨਮੋਹਨ ਸਿੰਘ ; रोमन लिपी: Manmohan Singh) (सप्टेंबर २६, इ.स. १९३२; गाह, पश्चिम पंजाब, ब्रिटिश भारत - हयात) हे भारताचे १४वे पंतप्रधान (मे २२, इ.स. २००४ पासून मे २६, इ.स. २०१४ पर्यंत) होते. हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य असून राज्यसभेत सध्या आसामचे प्रतिनिधित्व करतात. हे भारताचे पहिले शीख धर्मीय पंतप्रधान होते. यापूर्वी हे इ.स. १९९१ साली पी.व्ही. नरसिंहराव मंत्रिमंडळात केंद्रीय अर्थमंत्रीही होते. त्या काळात यांनी केलेल्या आर्थिक सुधारणा आणि त्यानंतर झालेल्या आर्थिक प्रगतीमुळे यांची कार्यक्षम राजकारणी म्हणून प्रतिमा बनली.
आरंभिक जीवन
त्यांचा जन्म सप्टेंबर २६, इ.स. १९३२ रोजी गाह, पश्चिम पंजाब (आता पाकिस्तान मध्ये) झाला. त्यांच्या बडिलांचे नाव गुरुमुख सिंग आणि आईचे नाव अमृत कौर. मनमोहन सिंग हे अर्थशास्त्रात उच्चशिक्षित आहेत. त्यांनी पंजाब विद्यापीठ, केंब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ येथून शिक्षण घेतले आहे. त्यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास विभागात काम करीत असताना, भारताचे तत्कालीन विदेश व्यापारमंत्री ललित नारायण मिश्रा यांनी मनमोहनसिंगांची आपल्या खात्यात सचिव म्हणून नियुक्ती केली.
जीवनक्रम
- सन १९५७ ते १९६५ - चंदीगडमधील पंजाब विश्वविद्यालयात प्राध्यापक.
- इ.स. १९६९-१९७१ - दिल्ली स्कूल ऑफ इकोनॉमिक्स या संस्थेत आंतरराष्ट्रीय व्यापार विषयाचे प्राध्यापक.
- इ.स. १९७६ - दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयात मानद प्राध्यापक.
- इ.स. १९८२ से १९८५ भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर.
- इ.स. १९८५ से १९८७ – [[भारताचा योजना आयोग|भारताचा योजना आयोग]ाचे उपाध्यक्ष.
- इ.स. १९९० से १९९१ - भारतीय प्रधानमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार.
- इ.स. १९९१ - नरसिंह राव यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारमध्ये अर्थमंत्री.
- इ.स. १९९१ – आसाममधून राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडले गेले.
- इ.स. १९९५ – दुसर्या वेळी राज्यसभा सदस्य
- इ.स. १९९६ - दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये मानद प्राध्यापक
- इ.स. १९९९ - दक्षिण दिल्लीमधून लोकसभा निवडणूक लढले पण त्यात हरले.
- इ.स. २००१ – तिसर्या वेळी राज्यसभा सदस्य आणि विरोधी पक्ष नेता
- इ.स. २००४ – भारताचे पंतप्रधान
या शिवाय त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि आशियायी विकास बँक यांच्या विकासात महत्त्वाचे योगदान दिले आहे.
मनमोहन सिंग यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तके
- The Accidental Prime Minister (मूळ लेखक : संजय बारू. याच नावाचा मराठी अनुवाद : लीना सोहोनी, , प्रकाशक मेहता पब्लिकेशन)
- डॉ. मनमोहनसिंग - एक वादळी पर्व (लेखक : सुजय शास्त्री; ग्रंथाली प्रकाशन)
चित्रपट
- दि अॅक्सिडेन्टल प्राईम मिनिस्टर (हिंदी, दिग्दर्शक : विजय गुट्टे)