"बेला शेंडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो →बालपण |
No edit summary |
||
ओळ ३९: | ओळ ३९: | ||
| संकेतस्थळ = http://www.belashende.com |
| संकेतस्थळ = http://www.belashende.com |
||
}} |
}} |
||
'''बेला संजीव शेंडे''' |
'''बेला संजीव शेंडे''' या हिंदी, [[मराठी]] तसेच [[तमिळ]] चित्रपट सृष्टीतील एक आघाडीची [[पार्श्वगायिका]] आहेत. |
||
==बालपण== |
==बालपण== |
||
बेला धेंडे यांचा जन्म गायक घराण्यात झाला. त्या लहान होत्या, तेव्हा त्यांची मोठी बहीण [[सावनी शेंडे]] ह्या त्यांच्या आजी म्हणजेच किराणा घराण्याच्या प्रसिद्ध गायिका '[[कुसुम शेंडे]]' यांच्याकडे रीतसर शिक्षण घेऊ लागल्या होत्या. त्यावेळेस शेजारी बसून बेला शेंडे बहिणीचे गाणे ऐकत असत; आई वडिलांबरोबर अनेक कार्यक्रमांना जात असत. त्यांच्या आवाजाची पट्टी वरची आहे हे लक्षात आल्यावर त्यांनी पुरुष गायकाकडे शिकावे असे सुचवले गेले. ह्यानंतर बेला शेंडे यांनी आपल्या वडिलांकडे गायनाचे धडे घ्यायला सुरुवात केली. त्यांच्या आजीमुळे त्यांच्या घरी [[माणिक वर्मा]], डॉ. [[प्रभा अत्रे]], [[शोभा गुर्टू]] अश्या गायिकांचे येणे-जाणे होते, त्यामुळे बेला शेंडे यांचे गाणे समृद्ध व्हायला खूप मदत झाली. |
|||
==कारकीर्द== |
|||
==कारकिर्द== |
|||
बेला शेंडे यांनी वयाच्या ११-१२ व्या वर्षी स्टेजवर गाणे म्हणायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी झी 'सा रे ग म' ची लहान मुलांची स्पर्धा जिंकली. तेव्हा त्या १४-१५ वर्षाच्या होत्या. दहावीत असतांना ही 'सा रे ग म'ची ही स्पर्धा होती. त्या स्पर्धेत भाग घेण्याबद्दल त्या जरा साशंक होत्या, पण घरच्या आणि शाळेतल्या सार्यांचा पाठिंबा होता. अभ्यास आणि गाणे हे दोन्ही सांभाळायचे होते, आणि हे त्यांनी सांभाळले आणि त्या ती स्पर्धा जिंकल्या. |
|||
मोठ्यांच्या झी 'सा रे ग म' मेगा फायनलमध्ये भाग घेण्याची संधी त्यांना लवकरच मिळाली. ही स्पर्धादेखील त्या जिंकल्या. त्या वेळेस [[पंडित जसराज]], [[अनिल विश्वास|अनिल बिस्वास]], [[हरिप्रसाद चौरसिया]] अशा अनेक महान मंडळींकडून त्यांना मार्गदर्शन आणि प्रशंसा मिळाली. तेव्हापासून बेला शेंडे यांच्या गाण्याच्या प्रवासाला खर्या अर्थाने सुरुवात झाली. त्या |
|||
ह्या स्पर्धेनंतर त्यांना अनेक |
ह्या स्पर्धेनंतर त्यांना अनेक अल्बममध्ये, हिंदी- मराठी चित्रपट, शीर्षक गीते गायला मिळाली. पार्श्वगायनाची पहिली संधी त्यांना [[महेश मांजरेकर]] यांनी दिली. |
||
== |
==बेला शेंदे यांची गाणी असलेले चित्रपट== |
||
⚫ | |||
⚫ | |||
# एहसास |
# एहसास |
||
⚫ | |||
# [[जोधा अकबर (चित्रपट)|जोधा अकबर]] |
# [[जोधा अकबर (चित्रपट)|जोधा अकबर]] |
||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
# [[नटरंग (मराठी चित्रपट)|नटरंग]] |
# [[नटरंग (मराठी चित्रपट)|नटरंग]] |
||
⚫ | |||
# बेशरम |
# बेशरम |
||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
==बेला शेंडे यांना मिळालेले पुरस्कार== |
|||
⚫ | |||
# झी गौरव पुरस्कार |
# झी गौरव पुरस्कार |
||
⚫ | |||
# नर्गिस दत्त पुरस्कार |
# नर्गिस दत्त पुरस्कार |
||
⚫ | |||
⚫ | |||
# सुशीलस्नेह पुरस्कार |
# सुशीलस्नेह पुरस्कार |
||
⚫ | |||
# कलागौरव पुरस्कार |
|||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
{{DEFAULTSORT:शेंडे, बेला}} |
{{DEFAULTSORT:शेंडे, बेला}} |
१४:४५, २० डिसेंबर २०१५ ची आवृत्ती
बेला शेंडे | |
---|---|
बेला शेंडे | |
आयुष्य | |
जन्म स्थान | पुणे,महाराष्ट्र. |
व्यक्तिगत माहिती | |
धर्म | हिंदू |
नागरिकत्व | भारतीय |
देश | भारत |
भाषा | मराठी, हिंदी |
पारिवारिक माहिती | |
वडील | डॉ. संजीव शेंडे |
नातेवाईक | कुसुम शेंडे |
संगीत साधना | |
गुरू | कुसुम शेंडे, डॉ. संजीव शेंडे |
गायन प्रकार | पार्श्वगायन |
संगीत कारकीर्द | |
पेशा | पार्श्वगायिका |
गौरव | |
गौरव | महाराष्ट्र राज्य पुरस्कार २०१० उत्कृष्ट पार्श्वगायिका |
बाह्य दुवे | |
संकेतस्थळ |
बेला संजीव शेंडे या हिंदी, मराठी तसेच तमिळ चित्रपट सृष्टीतील एक आघाडीची पार्श्वगायिका आहेत.
बालपण
बेला धेंडे यांचा जन्म गायक घराण्यात झाला. त्या लहान होत्या, तेव्हा त्यांची मोठी बहीण सावनी शेंडे ह्या त्यांच्या आजी म्हणजेच किराणा घराण्याच्या प्रसिद्ध गायिका 'कुसुम शेंडे' यांच्याकडे रीतसर शिक्षण घेऊ लागल्या होत्या. त्यावेळेस शेजारी बसून बेला शेंडे बहिणीचे गाणे ऐकत असत; आई वडिलांबरोबर अनेक कार्यक्रमांना जात असत. त्यांच्या आवाजाची पट्टी वरची आहे हे लक्षात आल्यावर त्यांनी पुरुष गायकाकडे शिकावे असे सुचवले गेले. ह्यानंतर बेला शेंडे यांनी आपल्या वडिलांकडे गायनाचे धडे घ्यायला सुरुवात केली. त्यांच्या आजीमुळे त्यांच्या घरी माणिक वर्मा, डॉ. प्रभा अत्रे, शोभा गुर्टू अश्या गायिकांचे येणे-जाणे होते, त्यामुळे बेला शेंडे यांचे गाणे समृद्ध व्हायला खूप मदत झाली.
कारकीर्द
बेला शेंडे यांनी वयाच्या ११-१२ व्या वर्षी स्टेजवर गाणे म्हणायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी झी 'सा रे ग म' ची लहान मुलांची स्पर्धा जिंकली. तेव्हा त्या १४-१५ वर्षाच्या होत्या. दहावीत असतांना ही 'सा रे ग म'ची ही स्पर्धा होती. त्या स्पर्धेत भाग घेण्याबद्दल त्या जरा साशंक होत्या, पण घरच्या आणि शाळेतल्या सार्यांचा पाठिंबा होता. अभ्यास आणि गाणे हे दोन्ही सांभाळायचे होते, आणि हे त्यांनी सांभाळले आणि त्या ती स्पर्धा जिंकल्या.
मोठ्यांच्या झी 'सा रे ग म' मेगा फायनलमध्ये भाग घेण्याची संधी त्यांना लवकरच मिळाली. ही स्पर्धादेखील त्या जिंकल्या. त्या वेळेस पंडित जसराज, अनिल बिस्वास, हरिप्रसाद चौरसिया अशा अनेक महान मंडळींकडून त्यांना मार्गदर्शन आणि प्रशंसा मिळाली. तेव्हापासून बेला शेंडे यांच्या गाण्याच्या प्रवासाला खर्या अर्थाने सुरुवात झाली. त्या ह्या स्पर्धेनंतर त्यांना अनेक अल्बममध्ये, हिंदी- मराठी चित्रपट, शीर्षक गीते गायला मिळाली. पार्श्वगायनाची पहिली संधी त्यांना महेश मांजरेकर यांनी दिली.
बेला शेंदे यांची गाणी असलेले चित्रपट
- उत्तरायण
- एहसास
- जोधा अकबर
- तेरा मेरा साथ रहे
- नटरंग
- पहेली
- बेशरम
- मी शिवाजीराजे भोसले बोलतोय
त्यांनी 'अनुबंध, शुभं करोति, हा खेळ सावल्यांचा, एक झोका, वृंदावन' अशा अनेक दूरचित्रवाणी मालिकांसाठी शीर्षकगीते गायली आहेत.
बेला शेंडे यांना मिळालेले पुरस्कार
- कलागौरव पुरस्कार
- झी गौरव पुरस्कार
- झी संगीत पुरस्कार
- नर्गिस दत्त पुरस्कार
- राष्ट्रीय पुरस्कार (’झाले मोकळे आकाश’साठी)
- रेडिओ मिर्ची म्युझिक पुरस्कार
- सुशीलस्नेह पुरस्कार
- स्टार स्क्रीन पुरस्कार,(मनमोहना या ’जोधा-अकबर’मधील गाण्यासाठी)
- सर्वोत्कृष्ट गायिका (झी टी.व्ही); (चित्रपट - नटरंग),