Jump to content

नटरंग (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नटरंग (म‍राठी चित्रपट) या पानावरून पुनर्निर्देशित)
नटरंग
दिग्दर्शन रवी जाधव
निर्मिती

झी टॉकीज
निखिल साने
अमित फाळके

मेघना जाधव
कथा आनंद यादव
पटकथा रवी जाधव
प्रमुख कलाकार अतुल कुलकर्णी
सोनाली कुलकर्णी
किशोर कदम
विभावरी देशपांडे
याकुब सय्यद
किशोर चौगुले
सुनील देव
प्रिया बेर्डे
मिलिंद शिंदे
राजेश भोसले
सिद्धार्थ झाडबुके
अमृता खानविलकर
विठ्ठल उमप
संवाद गुरू ठाकूर
संकलन जयंत जठार
छाया महेश लिमये
कला संतोष फुटाणे
गीते गुरू ठाकूर
संगीत अजय अतुल
पार्श्वगायन बेला शेंडे
अजय अतुल
वेशभूषा संतोष गायके
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
प्रदर्शित १ जानेवारी २०१०
वितरक

झी टॉकीज,

सादिक चितळीकर


नटरंग हा २०१० मध्ये प्रदर्शित झालेला रवी जाधव यांनी दिग्दर्शित केलेला मराठी चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये अतुल कुलकर्णी, किशोर कदम, विभावरी देशपांडे, प्रिया बेर्डे आणि सोनाली कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट १ जानेवारी २०१० रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. सुप्रसिद्ध संगीतकार अजय अतुल यांचे संगीत या चित्रपटाला लाभले आहे.

कथानक

[संपादन]

या चित्रपटात चाकोरीबाहेर विचार करणाऱ्या एका सृजनशील माणसाची संघर्ष-कथा मांडलेली आहे. एक तरुण पहिलवान गुनवंतराव कागलकर उर्फ़ 'गुणा' (अतुल कुलकर्णी) याला तमाशामध्ये राजाची मध्यवर्ती भूमिका करायची मनापासून इच्छा असते. ती न मिळाल्याने शेवटी तो स्वतःच तमाशाचा फड काढतो. आणि पुढे...

स्रोत

[संपादन]

या चित्रपटाची कथा आनंद यादव यांच्या 'नटरंग' या कादंबरीवर आधारलेली आहे.

कलाकार

[संपादन]

प्रदर्शन

[संपादन]

नटरंग १ जानेवारी २०१० रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला. प्रदर्शित झाल्यानंतर केवळ २१ दिवसात नटरंगने ७ कोटी रु.ची कमाई केली.[ संदर्भ हवा ]

दिग्दर्शकाविषयी

[संपादन]

रवी जाधव ( १९७१) यांनी सर जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्‌समधून कला शाखेची पदवी घेतलेली आहे. त्यांनी अनेक भाषांमधील जाहिरात क्षेत्रात कला-दिग्दर्शक म्हणून काम केलेले आहे. त्यांना जाहिरात क्षेत्रातील कामाबद्दल अनेक पुरस्कार मिळाले. नटरंग हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट होत.

संगीत

[संपादन]

या चित्रपटाचे संगीत ही सर्वात जमेची बाजू आहे. आजच्या काळातले आघाडीचे संगीतकार अजय अतुल यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे. या चित्रपटाची कथा / पटकथा मुख्यत्वे लोककला आणि लोकसंगीत (तमाशा) यावर आधारलेली असल्यामुळे त्या अनुषंगाने संगीत रचण्यात आलेले आहे. पिंजरा नंतर मराठीमधला हा एक महत्त्वाचा तमाशावर आधारित संगीत असलेला हा चित्रपट आहे. 'नटरंग'चे संगीत बरेच गाजले.

गाणी

[संपादन]
गाणे # गाणे गायक
नटरंग उभा अजय अतुल, कोरस
कागल गावचा गुणा अजय गोगावले
आता वाजले की बारा बेला शेंडे, कोरस
अचूक पडली ठिणगी अजय गोगावले
खेळ मांडला अजय गोगावले
पेटला गडी इरला अजय गोगावले
कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी बेला शेंडे, अजय गोगावले आणि कोरस
अप्सरा आली बेला शेंडे, अजय अतुल

समीक्षा

[संपादन]

हा चित्रपट मामि (मुंबई अकादमी ऑफ मूव्हिंग इमेज)मध्ये प्रदर्शनापूर्वी दाखवला गेला. या चित्रपटाला चित्रपट रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. मराठी चित्रपटांकडे प्रेक्षक पाठ फिरवत असतानाच या चित्रपटाने परत एकदा जादू करून दाखवली व मोठी कमाई केली.

या चित्रपट महोत्सवांत नटरंग दाखवला गेला

[संपादन]
  • मामि - मुंबई चित्रपट महोत्सव.
  • गोवा चित्रपट महोत्सव
  • थर्ड आय आशियन चित्रपट महोत्सव
  • ३३ वा ग्यॉटेबोर्ग महोत्सव
  • म्युनिक चित्रपट महोत्सव

बाह्य दुवे

[संपादन]