"कीर्तन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?) |
No edit summary खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?) |
||
ओळ ६२: | ओळ ६२: | ||
<br /> |
<br /> |
||
==वारकरी |
==वारकरी कीर्तनकार== |
||
१. गोविंदस्वामी आफळे |
१. गोविंदस्वामी आफळे |
||
ओळ ७८: | ओळ ७८: | ||
१३. संदीपान महाराज हसेगावकर |
१३. संदीपान महाराज हसेगावकर |
||
१४ .श्री प्रकाशबुवा मुळे गोंदीकर |
१४ .श्री प्रकाशबुवा मुळे गोंदीकर |
||
==नारदीय कीर्तनकार== |
|||
* कै.रामचंद्रबुवा पारनेरकर |
|||
* रामनाथबुवा अय्यर |
|||
==प्रसिद्ध कीर्तनकार== |
==प्रसिद्ध कीर्तनकार== |
||
ओळ ८३: | ओळ ८८: | ||
बंडातात्या कराडकर (कराडचे), [[संत गाडगे बाबा]], [[संत तुकडोजी महाराज]], [[मामासाहेब दांडेकर]], [[निजामपूरकर]], [[भगवानबाबा]], असे अनेक नामवंत कीर्तनकार महाराष्ट्रात होऊन गेले आहेत, किंवा अजूनही कार्यरत आहेत. गोविंदस्वामी आफळे आणि त्यांचे चिरंजीव [[चारुदत्त आफळे]] हे मराठीतले सुप्रसिद्ध कीर्तनकार आहेत. |
बंडातात्या कराडकर (कराडचे), [[संत गाडगे बाबा]], [[संत तुकडोजी महाराज]], [[मामासाहेब दांडेकर]], [[निजामपूरकर]], [[भगवानबाबा]], असे अनेक नामवंत कीर्तनकार महाराष्ट्रात होऊन गेले आहेत, किंवा अजूनही कार्यरत आहेत. गोविंदस्वामी आफळे आणि त्यांचे चिरंजीव [[चारुदत्त आफळे]] हे मराठीतले सुप्रसिद्ध कीर्तनकार आहेत. |
||
==अलीकडील कीर्तनकार== |
==अलीकडील कीर्तनकार== |
||
शंकर अभ्यंकर (प्रवचनकार), श्रीपादबुवा अभ्यंकर, रामनाथबुवा अय्यर, जगन्नाथ महाराज आर्वीकर, बाबा महाराज इंगळे, ओतूरकर, विश्वास करंदीकर(प्रवचनकार), कऱ्हाडकर, [[कवीश्वर]], कालिदास महाराज (सुरेगाव), तुकाराम महाराज काळे (आजरेकर), विश्वासबुवा कुलकर्णी, कोपरकर, सतीश महाराज गव्हाणे, गणेश गाडगीळ, पांडुरंग महाराज गिरी (घावी गावचे), गणपतबाबा गुडेकर(अलिबागकर महाराज), प्रकाशबुवा मुळे गोंदीकर व त्यांचे चिरंजीव श्रीपादबुवा मुळे गोंदीकर, योगीराज बुवा मुळे गोंदीकर रामचंद्रबुवा गोऱ्हे, एकनाथ महाराज गोळेकर (सिन्नरचे), किसनमहाराज चौधरी, प्रमोद महाराज जगताप, अशोक महाराज जाधव(आकुर्डीचे), हर्शदबुवा जोगळेकर, मोहनबुवा जोशी (चऱ्होलीकर), रामराव महाराज ढोक, बापूसाहेब तुपे(प्रवचनकार), रूपचंद महाराज दहीवदकर, मोहन दांडेकर, मामा दिघे(प्रवचनकार), चैतन्य महाराज [[देगलूरकर]], योगीराजमहाराज पैठणकर, संजय नाना धोंडगे, नाना महाराज नरडाणेकर, संजय महाराज पाचपोर, पुरुषोत्तम महाराज पाटील, लक्ष्मण महाराज पाटील, हेमंत महाराज पाटील(आळंदीचे), श्रेयस बडवे, बडोदेकर, जयवंत महाराज बोधले, प्रा. जगन्नाथ माने(प्रवचनकार), नारायण महाराज मालपूरकर, रमेश रावेतकर, दीपकबुवा रास्ते, चंद्रकांत महाराज वांजळे (अहिरे गावचे), मच्छिंद्र महाराज वाडीभोकरकर, विश्वनाथ महाराज वाडेकर, लालचंद महाराज वाळकीकर, शेखरबुवा व्यास, जंगले महाराज शास्त्री (अहमदनगरचे), शिरवळकर, डॉ. रविदास महाराज शिरसाठ, भागोजी विश्राम शिवगण (ओझरे बुद्रुक-रामवाडी खडीकोळवण महाराज उर्फ-कोळू बुवा), एकनाथ महाराज सदगीर, [[दादा महाराज सातारकर]], दत्तात्रेय महाराज हळदे (आळंदीचे), अशोक महाराज हुंबे, पंडित महाराज क्षीरसागर (आळंदी), वगैरे. |
शंकर अभ्यंकर (प्रवचनकार), श्रीपादबुवा अभ्यंकर, रामनाथबुवा अय्यर, जगन्नाथ महाराज आर्वीकर, बाबा महाराज इंगळे, केशव उकळीकर, ओतूरकर, विश्वास करंदीकर(प्रवचनकार), कऱ्हाडकर, [[कवीश्वर]], कालिदास महाराज (सुरेगाव), तुकाराम महाराज काळे (आजरेकर), विश्वासबुवा कुलकर्णी, द्वा.वा. केळकर, कोपरकर, विलास गरवारे, सतीश महाराज गव्हाणे, गणेश गाडगीळ, पांडुरंग महाराज गिरी (घावी गावचे), गणपतबाबा गुडेकर(अलिबागकर महाराज), प्रकाशबुवा मुळे गोंदीकर व त्यांचे चिरंजीव श्रीपादबुवा मुळे गोंदीकर, योगीराज बुवा मुळे गोंदीकर रामचंद्रबुवा गोऱ्हे, एकनाथ महाराज गोळेकर (सिन्नरचे), श्रीदत्तदास घाग, किसनमहाराज चौधरी, प्रमोद महाराज जगताप, पुंडलिक जंगले, अशोक महाराज जाधव(आकुर्डीचे), जितेंद्रदास महाराज(प्रवचनकार), हर्शदबुवा जोगळेकर, मोहनबुवा जोशी (चऱ्होलीकर), रामराव महाराज ढोक, बापूसाहेब तुपे(प्रवचनकार), रूपचंद महाराज दहीवदकर, मोहन दांडेकर, मामा दिघे(प्रवचनकार), चैतन्य महाराज [[देगलूरकर]], गोविंददेवगिरी महाराज(प्रवचनकार), श्याम धुमकेकर, योगीराजमहाराज पैठणकर, संजय नाना धोंडगे, नाना महाराज नरडाणेकर, संजय महाराज पाचपोर, पुरुषोत्तम महाराज पाटील, लक्ष्मण महाराज पाटील, हेमंत महाराज पाटील(आळंदीचे), डॉ. सुदाम पानेगावकर, श्रेयस बडवे, आसारामजी बडे, बडोदेकर, जयवंत महाराज बोधले, प्रकाश महाराज बोधले, प्रा. जगन्नाथ माने(प्रवचनकार), नारायण महाराज मालपूरकर, महादेव राऊत, रमेश रावेतकर, दीपकबुवा रास्ते, चंद्रकांत महाराज वांजळे (अहिरे गावचे), मच्छिंद्र महाराज वाडीभोकरकर, विश्वनाथ महाराज वाडेकर, लालचंद महाराज वाळकीकर, शेखरबुवा व्यास, जंगले महाराज शास्त्री (अहमदनगरचे), शिरवळकर, डॉ. रविदास महाराज शिरसाठ, भागोजी विश्राम शिवगण (ओझरे बुद्रुक-रामवाडी खडीकोळवण महाराज उर्फ-कोळू बुवा), सद्गुरुदास महाराज(प्रवचनकार), स्वामी सत्यमित्रानंदगिरी(प्रवचनकार), एकनाथ महाराज सदगीर, [[दादा महाराज सातारकर]], संदीपान हसेगावकर, दत्तात्रेय महाराज हळदे (आळंदीचे), अशोक महाराज हुंबे, पंडित महाराज क्षीरसागर (आळंदी), वगैरे. |
||
==स्त्री कीर्तनकार== |
==स्त्री कीर्तनकार== |
||
महाराष्ट्रात अनेक स्त्री कीर्तनकार आहेत, त्यांपैकी काही अशा :- |
महाराष्ट्रात अनेक स्त्री कीर्तनकार आहेत, त्यांपैकी काही अशा :- |
||
* स्मिता आंजेगावकर |
|||
⚫ | |||
* अश्विनीताई इनामदार |
* अश्विनीताई इनामदार |
||
* जयश्री उदास |
* जयश्री उदास |
||
* मंजुश्री खाडिलकर |
* मंजुश्री खाडिलकर |
||
* जयश्री गुप्ते (प्रवचनकार) |
* जयश्री गुप्ते (प्रवचनकार) |
||
* शैलजा जतकर |
* शैलजा जतकर |
||
* अवंतिका टोळ |
|||
⚫ | |||
* रसिका परांजपे |
* रसिका परांजपे |
||
* मानसी श्रेयस बडवे |
* मानसी श्रेयस बडवे |
००:०८, २६ एप्रिल २०१३ ची आवृत्ती
वेगवेगळ्या पद्धतीने काव्य, संगीत, अभिनय आणि क्वचित नृत्य यांच्यासह सादर करीत असलेल्या भक्तिरसपूर्ण कथारूप एकपात्री निवेदनाला कीर्तन असे म्हणतात, आणि हे करणाऱ्या व्यक्तीला कीर्तनकार. भारतातल्या सर्व प्रदेशांत, सर्व भाषांत आणि सर्व संप्रदायांत कीर्तन हा प्रकार आढळतो.
महाराष्ट्रात कीर्तनाची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. येथे होणाऱ्या कीर्तनांत नारदीय कीर्तन आणि वारकरी कीर्तन असे दोन प्रकार आहेत. नारद हा भारतातील आद्य कीर्तनकार आहे, असे मानले जाते.
शब्द व्युत्पत्ती आणि व्याख्या, आरंभ
कीर्तन हा शब्द संस्कृतात 'कॄत्’ या दहाव्या गणातल्या धातूपासून झाला आहे. या धातूचा अर्थ उच्चारणे, सांगणे असा होतो. कीर्तन ज्या स्थानावर उभे राहून करतात ते स्थान म्हणजे देवर्षी नारदांची (कीर्तनाची) गादी. या कीर्तनाच्या पद्धतींच्या अनेक व्याख्या आणि संकल्पना भरत महामुनींच्या नाट्यशास्त्रापासून केल्या गेल्या.
कीर्तनाचा इतिहास
भारतवर्षात नारदमुनींनी कीर्तनाचा आरंभ केला. नारदमुनींनी ते महर्षी व्यासांस शिकवले, व्यास महर्षींनी शुकास शिकवले आणि पुढे त्याचा सर्वत्र प्रसार झाला, अशी कीर्तन परंपरा सांगितली जाते..[१]
[१]
वस्तुतः 'श्रीहरिकीर्तन' खेड्यापाड्यात पोहोचले आहे. सर्व लोकांना ईशभक्तीमध्ये रममाण करणे हा कीर्तनाचा उद्देश आहे.
अनेक कीर्तनकारांनी त्यांच्या कीर्तनांनी शिवाजीच्या काळात व ब्रिटिशांच्या काळात लोकजागृतीचे काम केले.
[२]
कीर्तनाचे प्रकार
नारदीय कीर्तन अणि वैयासिक कीर्तन (महर्षी व्यासानी सुरू केलेले) असे २ कीर्तन प्रकार होते. एक संगीत/नाट्यमय अणि दुसरा गद्यात सांगितला जाणारा असे यातील फरक आहेत.
भगवंताचे अणि थोर विभूतींचे गुणगायन करणारा व पराक्रमाचे वर्णन करणारा हा प्राचीन कला प्रकार आहे. नंतरच्या काळात नारदीय कीर्तनातून वारकरी, रामदासी, राष्ट्रीय कीर्तन असे वेगळे संप्रदाय निर्माण झाले. पण सर्व भारतात कीर्तन, थोडा फार बाह्यरूपात बदल झाले तरी, त्याचा मूळ गाभा कायम राखून आहे. स्वातंत्र्य चळवळीतसुद्धा कीर्तनकारांनी समाजाच्या जागृतीचे उल्लेखनीय कार्य केलेले आहे.
कीर्तनाची अंगे
कीर्तनात मुख्य ५ भाग असतात.
सुरुवातीस नमन, पूर्वरंग (तत्त्वज्ञान व आध्यात्मिक चर्चा) नंतर मध्यंतरात नामजप आणि भक्तिगीत. नंतर पूर्वरंगाला साजेसे एखादे कथानक, म्हणजे उत्तररंग किंवा आख्यान आणि शेवटी भैरवी गायन, देवाकडे मागणे आणि आरती असते.
कीर्तन ही खरेतर मूलतः एक भक्ती आहे. श्रीमद् भागवतात सांगितल्याप्रमाणे नवविधा भक्तींपैकी ही दुसरी भक्ती आहे. "श्रवणं कीर्तनं विष्णो: स्मरणं पादसेवनम्! अर्चनं वन्दनं दास्यं, सख्यं आत्मनिवेदनम!" अशा ९ भक्तींपैकी एक. कीर्तन हे पूर्वी प्रसार, प्रचार, लोकशिक्षण, आणि समाजप्रबोधनाचे एक उत्तम माध्यम होते. काळाच्या ओघात अणि प्रसार माध्यमांच्या प्रगतीमुळे आज कीर्तनाचे महत्त्व कमी झाले असेल तरी आजही धार्मिक उत्सव अणि नित्य उपक्रमांत अणि काही मंदिरांत नियम म्हणून १२ महिने कीर्तनाचा प्रघात आहे.
कीर्तन आणि पदे
कीर्तन आणि संगीत
पुढे कीर्तनाला संगीताची साथ लाभली. टाळ, मृदंग, एकतारी ही वाद्ये साथीला घेत. हल्ली पेटी तबला तर कधी बासरी अशी वाद्ये वापरली जातात.
हरिकथा
सर्व भारतीय भाषात होणारे कीर्तन हरिकीर्तन, हरिकथा या नावानेही ओळखले जाते.
कीर्तनकारांची परंपरा आणि संतांचे योगदान
मध्यंतरीच्या काळात मंदिरात होणारे कीर्तन वाळवंटात प्रथमच आणले ते संत नामदेवांनी. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, समर्थ रामदास हेही कीर्तन करीत. संत साहित्यामुळे कीर्तन समृद्ध झाले. आजही कीर्तनाला संत साहित्याचा भक्कम आधार असतो.
वंशपरंपरा, गुरुपरंपरा आणि घराणी
जुन्या काळात कीर्तनाची कला वंश परंपरेने आणि गुरु परंपरेने चालत आली. अनेक घराणी तयार झाली.
ग्रंथ परंपरा
"कीर्तन सुधा धारा" नावाचे ३ खंडांत केलेले लेखन उपलब्ध आहे. त्यशिवाय "कीर्तन सुमनहार" हे ग्रंथ आहेत. इ.स. १९२६ साली "कीर्तनचार्याकम्" नावाचे छोटे पुस्तक काशी येथून ह.भ.प.(हरिभक्तिपरायण विनायक गणेश भागवत यांनी प्रसिद्ध केले. त्यानंतर इ.स. १९८२ मध्ये ह.भ.प. गंगाधरबुवा कोपरकर यांनी ' "कीर्तनाची प्रयोग प्रक्रिया" नावाचे उत्तम पुस्तक लिहिले. आज तरी त्याच्या इतके परिपूर्ण पुस्तक उपलब्ध नाही. आता अनेक लेखकांनी आणि संस्थांनी अनेक पाठ्यपुस्तके तयार केली आहेत.अलीकडच्या काळात कीर्तनभूषण श्री प्रकाशबुवा मुळे गोंदीकर यांनी 'कीर्तन रहस्य 'नावाचा सर्व कीर्तन परंपरांचा अभ्यास करून संशोधनात्मक ग्रंथ लिहून प्रकाशित केला आहे .
कीर्तन प्रशिक्षण आणि इतर संस्था
महाराष्ट्रात मुंबई येथे सन १९४० मधे "अखिल भारतीय कीर्तन संस्था" या संस्थेची स्थापना झाली [२]. आजही ही संस्था कार्यरत आहे, अणि कीर्तन प्रवचन या जुन्या भक्तियुक्त कला प्रकारांचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्याचे कार्य करीत आहे. संस्थेचे कार्यालय द.ल. वैद्य मार्ग, दादर (प), मुंबई २८ येथे आहे. पुणे येथे "नारद मंदिर" नावाची संस्था सदाशिव पेठेत हेच काम करते. नागपूर येथेही कीर्तन महाविद्यालय आहे. सांगलीला १९९२साली स्थापन झालेली अखिल भारतीय कीर्तनकुल नावाची संस्था आहे. तिच्या २०-२५ शाखा आहेत. संस्थेची पिंपरी-चिंचवड येथेही शाखा आहे. याशिवाय पंढरपूर, धरणगाव, धुळे, निकुंभे येथे कीर्तनाचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आहेत.
कीर्तन प्रशिक्षिका
१. विजया वैशंपायन
वारकरी कीर्तनकार
१. गोविंदस्वामी आफळे २. चारुदत्त आफळे ३. बंडातात्या कऱ्हाडकर ४. पांडुरंग महाराज घुले ५. रामराव महाराज ढोक ६. चैतन्य महाराज देगलूरकर ७. योगिराज महाराज पैठणकर ८. प्रकाश महाराज बोधले ९. रामकृष्णदास लहवीतकर १०.[[नारायण लक्ष्मण वाजे-अलिबागकर महाराज ] ११. बाबामहाराज सातारकर १२. नामदेवशास्त्री सानप १३. संदीपान महाराज हसेगावकर १४ .श्री प्रकाशबुवा मुळे गोंदीकर
नारदीय कीर्तनकार
- कै.रामचंद्रबुवा पारनेरकर
- रामनाथबुवा अय्यर
प्रसिद्ध कीर्तनकार
बंडातात्या कराडकर (कराडचे), संत गाडगे बाबा, संत तुकडोजी महाराज, मामासाहेब दांडेकर, निजामपूरकर, भगवानबाबा, असे अनेक नामवंत कीर्तनकार महाराष्ट्रात होऊन गेले आहेत, किंवा अजूनही कार्यरत आहेत. गोविंदस्वामी आफळे आणि त्यांचे चिरंजीव चारुदत्त आफळे हे मराठीतले सुप्रसिद्ध कीर्तनकार आहेत.
अलीकडील कीर्तनकार
शंकर अभ्यंकर (प्रवचनकार), श्रीपादबुवा अभ्यंकर, रामनाथबुवा अय्यर, जगन्नाथ महाराज आर्वीकर, बाबा महाराज इंगळे, केशव उकळीकर, ओतूरकर, विश्वास करंदीकर(प्रवचनकार), कऱ्हाडकर, कवीश्वर, कालिदास महाराज (सुरेगाव), तुकाराम महाराज काळे (आजरेकर), विश्वासबुवा कुलकर्णी, द्वा.वा. केळकर, कोपरकर, विलास गरवारे, सतीश महाराज गव्हाणे, गणेश गाडगीळ, पांडुरंग महाराज गिरी (घावी गावचे), गणपतबाबा गुडेकर(अलिबागकर महाराज), प्रकाशबुवा मुळे गोंदीकर व त्यांचे चिरंजीव श्रीपादबुवा मुळे गोंदीकर, योगीराज बुवा मुळे गोंदीकर रामचंद्रबुवा गोऱ्हे, एकनाथ महाराज गोळेकर (सिन्नरचे), श्रीदत्तदास घाग, किसनमहाराज चौधरी, प्रमोद महाराज जगताप, पुंडलिक जंगले, अशोक महाराज जाधव(आकुर्डीचे), जितेंद्रदास महाराज(प्रवचनकार), हर्शदबुवा जोगळेकर, मोहनबुवा जोशी (चऱ्होलीकर), रामराव महाराज ढोक, बापूसाहेब तुपे(प्रवचनकार), रूपचंद महाराज दहीवदकर, मोहन दांडेकर, मामा दिघे(प्रवचनकार), चैतन्य महाराज देगलूरकर, गोविंददेवगिरी महाराज(प्रवचनकार), श्याम धुमकेकर, योगीराजमहाराज पैठणकर, संजय नाना धोंडगे, नाना महाराज नरडाणेकर, संजय महाराज पाचपोर, पुरुषोत्तम महाराज पाटील, लक्ष्मण महाराज पाटील, हेमंत महाराज पाटील(आळंदीचे), डॉ. सुदाम पानेगावकर, श्रेयस बडवे, आसारामजी बडे, बडोदेकर, जयवंत महाराज बोधले, प्रकाश महाराज बोधले, प्रा. जगन्नाथ माने(प्रवचनकार), नारायण महाराज मालपूरकर, महादेव राऊत, रमेश रावेतकर, दीपकबुवा रास्ते, चंद्रकांत महाराज वांजळे (अहिरे गावचे), मच्छिंद्र महाराज वाडीभोकरकर, विश्वनाथ महाराज वाडेकर, लालचंद महाराज वाळकीकर, शेखरबुवा व्यास, जंगले महाराज शास्त्री (अहमदनगरचे), शिरवळकर, डॉ. रविदास महाराज शिरसाठ, भागोजी विश्राम शिवगण (ओझरे बुद्रुक-रामवाडी खडीकोळवण महाराज उर्फ-कोळू बुवा), सद्गुरुदास महाराज(प्रवचनकार), स्वामी सत्यमित्रानंदगिरी(प्रवचनकार), एकनाथ महाराज सदगीर, दादा महाराज सातारकर, संदीपान हसेगावकर, दत्तात्रेय महाराज हळदे (आळंदीचे), अशोक महाराज हुंबे, पंडित महाराज क्षीरसागर (आळंदी), वगैरे.
स्त्री कीर्तनकार
महाराष्ट्रात अनेक स्त्री कीर्तनकार आहेत, त्यांपैकी काही अशा :-
- स्मिता आंजेगावकर
- अश्विनीताई इनामदार
- जयश्री उदास
- मंजुश्री खाडिलकर
- जयश्री गुप्ते (प्रवचनकार)
- शैलजा जतकर
- अवंतिका टोळ
- अनुराधा देशपांडे
- रसिका परांजपे
- मानसी श्रेयस बडवे
- रोहिणी माने
- निवेदिता मेहेंदळे
- पुष्पलताबाई रानडे (जन्म १९२०; मृत्यू ११-९-२०१०)
- संगीता श्रोत्री
- जयश्री सांगवीकर (प्रवचनकार)
- भगवतीबाई सातारकर
- डॉ. अपर्णा साबणे (प्रवचनकार)
- खानदेशातील कीर्तनकार (खाली पहा)
खानदेशातील कीर्तनसंस्था, कीर्तनकार
खानदेशात कीर्तनकारांची एक फळीच निर्माण झाली आहे. वारकरी संप्रदायाचा प्रचार करताना, प्रसारासोबत व्यसनमुक्तीचे ते धडे देतात. टीव्ही चॅनेल, मोबाईलच्या जमान्यात अनेकजण कीर्तनापासून दूर जात असतानाही खानदेशात कीर्तनकारांची संख्या वाढत आहे.
महाराष्ट्र राज्यात सुमारे साडेतीन हजार प्रमुख कीर्तनकार आहेत.[ संदर्भ हवा ] खानदेशात ही संख्या तीनशेच्या आसपास आहे. कीर्तनकारांना सोबत म्हणून गायनाचार्य, पखवाज वादक, हार्मोनिअम मास्टर गावोगावी आहेत. कीर्तनात हिंदू कीर्तनकारच नव्हे, तर जैन, मुस्लीम, मारवाडी हे अन्य धर्मीयही आढळून येतात. दहा वर्षापूर्वी हाताच्या बोटावर मोजण्याइतके कीर्तनकार होते. आत ३० ते ३५ वर्षे वयोगटातही कीर्तनकार आहेत. महिला, बाल कीर्तनकारांची संख्या सहाशेच्या आसपास आहे.[ संदर्भ हवा ]
खानदेशात धरणगाव, धुळे, निकुंभे येथे कीर्तनाचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आहेत.
खानदेशातील स्त्री कीर्तनकार
अंजनाबाई पवार (नांदगाव), राधाताई महाराज (भोलाणे), प्रतिभाताई पाटील (सोनगीर), सुनीता महाराज (बुधगाव), मनीषा महाराज (गोंदूर), प्रतिभा सोनवणे (जवखेडे), वंदनाताई महाराज (चिमठाणे), उषाताई माळी (पाळधी) इत्यादी. आणि, आता(इ.स. २०१३) हयात नसलेल्या माजलगावच्या जैतुनबी.
मराठवाड्यातील कीर्तनकार
मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील गोदावरी नदीच्या किनारी असणाऱ्या श्रीक्षेत्र गोंदीच्या मुळे घराण्याने कीर्तनाची परंपरा अनेक पिढ्यांपासून श्रद्धेने टिकवली आहे. कीर्तन केसरी श्री अच्युतबुवा मुळे गोंदीकर हे स्वातंत्र्यपूर्व काळात औंध जि .सातारा येथे श्रीमंत राजेसाहेब बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांच्या कीर्तन महाविद्यालयात, खास कीर्तन शिकण्यासाठी, वयाच्या १०व्या वर्षी, पायी प्रवास करत गेले होते. अच्युतबुवांच्या या कलेचे जतन पुढे त्यांचे चिरंजीव प्रकाशबुवा मुळे यांनी केले. हैदराबाद नभोवाणी केंद्रावरून अच्युतबुवा मुळे यांची कीर्तने निजामकालीन राजवटीतही प्रसारित होत असत. आज प्रकाशबुवांची ही परंपरा त्यांचे चिरंजीव श्रीपादबुवा व योगीराजबुवा समर्थपणे चालवीत आहेत. गोंदीकर घराणे नारदीय, वारकरी, रामदासी या सर्वच पद्धतींची कीर्तन परंपरा कुशलतेने सांभाळीत आहे. [ संदर्भ हवा ]
हेसुद्धा पाहा
संदर्भ