विकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प/नमुना पत्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सुयोग्य चित्र वापरा प्रकल्प
सर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)

लेखकांना प्रताधिकार मुक्ती नमुना विनंती प्रत्र[संपादन]

प्रति,

श्री./श्रीमती

पुणे

विषय: इंटरनेटवरील 'मराठी विकिपीडिया' (मुक्त विश्वकोश) प्रकल्पां संदर्भात प्रताधिकारमुक्ततेचे विनंती पत्र.

सप्रेम नमस्कार, विनंती विशेष.

मराठी विकिपीडिया हे इंटरनेटवरील मराठी ज्ञानकोशाच्या विकासास वाहिलेले मुक्त, अव्यापारी आणि समाईक संकेतस्थळ आहे. मराठी विकिपीडिया व त्याच्या विक्शनरी, विकिबुक्स, विकिक्वोट इत्यादी प्रकल्पात स्वयंसेवी आणि सहयोगी पद्धतीने लेखन केले जाते.

विकिपीडिया व्यक्तींच्या प्रताधिकारांचा संपूर्ण आदर करते. इंटरनेटवरील मराठी समुदायाला विश्वासार्ह आणि मोफत माहितीची खूप गरज आहे.मराठी समाजाची ही गरज तसेच सर्वसामान्य मराठी समाज आणि मराठी भाषेस होणारी दूरगामी मदत म्हणून , आपले "--- " या प्रकाशनाने/संकेतस्थळाने प्रकाशित केलेले "--- "या पुस्तकातील(संकेतस्थळावरील) लेखन मराठी विकिपीडियावर किंवा तिच्या विक्शनरी, विकिबुक्स, विकिक्वोट, विकिसोर्स इत्यादी सहप्रकल्पातून मुक्तस्वरूपात संपूर्ण किंवा अंशिक स्वरूपात उपयोग/प्रकाशित करण्याच्या दृष्टीने विनामोबदला प्रताधिकारमुक्त करावे अशी नम्र विनंती आहे.

मराठी विकिपीडियाच्या http://mr.wikipedia.org/ या संकेतस्थळास भेट देऊन मराठी विकिकरांच्या जातीने परीक्षण करून आपल्या शंका व मार्गदर्शन करून आम्हाला उपकृत करावे. तसेच आपण स्वतः काही अधिक लेखन सहयोग मराठी विकिपीडियास करू शकला तर मराठी भाषेचा ज्ञानभाषा म्हणून संवर्धन करणारे हे आंतरजालावरील दालन अधिकाधिक समृद्ध होण्यात मोठाच हातभार लागेल.

सोबत जोडलेले:

१) मराठी विकिपीडियासंदर्भात महाराष्ट्र टाईम्स मध्ये प्रकाशित लेख जोडत आहोत. आवाहन आणि परिपत्रक विभाग प्रमुख या नात्याने आपण आपल्या सर्व परिचित मराठी विषयाच्या अभ्यासकांना विद्यार्थ्यांना माहितीसाठी पाठवावे तसेच विभागाच्या आणि वाचनालयाच्या सूचना-फलकावर लावावे असे नम्र निवेदन आहे.

२) "प्रताधिकार मुक्तीची उद्घोषणा" या किंवा अशा स्वरूपात आपली "प्रताधिकार मुक्तीची उद्घोषणा" या पत्त्यावर पाठवावी.कृपया त्याच्या दोन प्रतीलिपी करून एक स्वतःजवळ बाळगावी आणि दुसरी आवशकते नुसार प्रकाशक किंवा लेखक यांना माहितीस्तव सुपूर्त करावी.


आपला विनम्र,प्रताधिकार मुक्तीची उद्घोषणा[संपादन]

"मी ( नाव: ।टोपण नाव: ) अशी उद्घोषणा करतो की ".........."ह्या शीर्षकांचे या ".... दुव्या "(...या स्रोतांत प्रकाशित) वरील संपूर्ण लेखन/छायाचित्र माझे मूळ लेखन आहे.त्याचा प्रताधिकार माझ्याकडे आहे. इथे नमूद केलेले हे लेखन (पर्याय-.....या संकेतस्थळा वरील माझे सर्व लेखन/छायाचित्र) मी सार्वजनिक हिताच्या दृष्टीने , बौद्धिक संपत्ती व प्रताधिकारातून मुक्त करत आहे.या नमूद लेखन/छायाचित्राचा उपयोग कुणीही,माझ्या कोणत्याही बंधना शिवाय,( कायद्यांची इतर बंधने असतीलतर,अशी व्यक्ती, स्व-जबाबदारीवर ) कोणत्याही स्वरूपात वापर सार्वजनिक स्वरूपात करू शकते.

प्रताधिकार मुक्तीची उद्घोषणेचा एक उद्देश्य असे लेखन विकिपीडिया किंवा तिच्या सहप्रकल्पा अंतर्गत संबधीत संकेत स्थळांवतर अंशिक किंवा संपूर्ण स्वरूपात वापरले जाण्याची शक्यता असुन ,Wikipedia येथे केलेले कोणतेही लेखन GNU Free Documentation License (अधिक माहितीसाठी Wikipedia Project:Copyrights पाहा) अंतर्गत मुक्त उद्घोषित केले आहे असे गृहीत धरले जाईल याची मी/ आम्ही नोंद घेतली आहे. लेखनाचे मुक्त संपादन आणि मुक्त वितरण करण्यास माझी कोणतीही आडकाठी नाही.