Jump to content

विकिपीडिया चर्चा:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मला मदत हवी आहे!

मदतकर्त्यांना सुचना: आपण मदत केल्यावर हा संदेश काढून टाकावा


प्रताधिकार मुक्ती नमुना विनंती प्रत्र" बनवले आहे आता माझ्या समोर प्रश्न आहे तो हा कि एखाद्या लेखकाने आपल्या विनंतीनुसार "प्रताधिकार मुक्तीची उद्घोषणा" लेखी पाठवण्याचे ठरवले तर ती नेमक्या कोणत्या पत्त्यावर मागवावी. कारण समजा की लेखी परवानगी एखाद्या सदस्याच्या वैयक्तिक पत्त्यावर मागवली आणि तो सदस्य नंतर काही कारणाने विकिपीडियास वेळ देऊ शकला नाही आणि कालांतराने एखाद्या लेखकाच्या वारसदाराने काही आक्षेप घेतले तर मराठी विकिपीडिया त्यावेळी असलेल्या सदस्य नेमके हतबल असतील आणि आधीच्या सद्स्याने साहित्य प्रताधिकार मुक्त करून घेण्याकरता घेतलेली मेहनत निष्फळ ठरणार नाही काय ? बर असे परवानगी पत्र स्कॅन करून इमेज म्हणून चढवले तरी स्कॅन इमेज कायद्यात पुरावा मानली जाणार नाही असा माझा कयास आहे.

कुणी काही उपाय सुचवू शकेल ?

Mahitgar १४:३७, १६ मार्च २०

वर लिहिलेला मजकूर वाचताना त्यातील मराठी थोडे विचित्र असल्यासारखे वाटते. त्यात मी थोड्याफार सुधारणा सुचवण्याचा प्रयत्न करतो आहे; सुधारणा योग्य वाटल्यास विचारात घ्याव्यात. "चर्चा:कायदा" यातील दोन शब्द इतक्या जवळ नकोत. Wikipediaचर्चा: आणि दुसर्‍या ओळीत-- कायदा आणि प्रताधिकारमुक्ती--नवीन प्रकल्पलेख(किंवा बेहतर, संकल्पित लेख).--त्याचे संपादन. हे जास्त चांगले वाटते. "प्रताधिकार मुक्ती नमुना विनंती पत्र" म्हणजे काय? अर्थ स्पष्ट नाही. "प्रताधिकारमुक्ती या विषयावरील लेखासाठी तज्ज्ञांना लिहावयाच्या विनंती पत्राचा नमुना"--असे काहीतरी हवे. पुढच्या वाक्यातील "की" दीर्घ पाहिजे. "उद्‌‌धोषणा" की "उद्‌घोषणा" ? या शब्दाचे इथे काय प्रयोजन आहे-माझ्या काही लक्षात येत नाही. हल्ली उद्‌घोषणा हा शब्द announcementसाठी वापरतात. आपण मला वाटते तो proclamation किंवा declarationसाठी वापरला असावा. शब्द एखादेवेळी बरोबर असेलही, पण घोटाळ्यात टाकणारा आहे. त्याऐवजी 'मी माझ्या अमुकतमुक लेखातील मजकुराचा वापर दुसर्‍या लेखासाठी करण्याची अनुज्ञा देत आहे' असे पत्र....ज्याच्याकडे येईल त्याने ते scanकरून ईमेलने विकिपीडियाच्या स्थायी सदस्याकडे पाठवावे, किंवा असे पत्र लेखकाकडून ईमेलने मागवावे व त्याची छायाप्रत लेखकाकडून प्रतिसाक्षरित करून स्थायी सदस्याकडे (अथवा विकिपीडियावर)ठेवावी. ह्याची कायदेशीर बाजू तपासून घ्यावी लागेल.

वरील मजकुरातील शुद्धलेखनातील काही किरकोळ चुका मी आपल्या अपेक्षित परवानगीने दुरुस्त करीत आहे. ---J १९:०३, २७ मार्च २००७ (UTC)

Start a discussion about विकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प

Start a discussion