Jump to content

भारतीय रुपया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रुपया या पानावरून पुनर्निर्देशित)

हा लेख भारतीय रुपयावर आहे. रुपयाच्या इतर उपयोगांसाठी येथे टिचकी द्या.

rupia india (es); Indversk rúpía (is); Rupee India (ms); Rupee nin Indya (bcl); Индийы рупи (os); Rupee India (kge); ভারতীয় রুপি (bpy); Индийска рупия (bg); rupi Ndiya (kcg); Rupie indiană (ro); بھارتی روپیہ (ur); Indická rupia (sk); індійська рупія (uk); ರೂಪಾಯಿ (tcy); Рупии Ҳиндустон (tg); lo rupninuru (jbo); 인도 루피 (ko); ভাৰতীয় টকা (as); barata rupio (eo); Индиска рупија (mk); Indische Rupie (bar); भारतीय रुपिया (bho); ভারতীয় টাকা (bn); roupie indienne (fr); Инди рупийĕ (cv); भारतीय रुपया (mr); Rupee Ấn Độ (vi); Индияса рупия (kv); Indijas rūpija (lv); Indiese roepee (af); индијска рупија (sr); Indisk rupi (nn); indisk rupi (nb); Hindistan rupisi (az); ಭಾರತದ ರೂಪಾಯಿ (kn); ڕووپیەی ھیندی (ckb); Indian rupee (en); روبية هندية (ar); รูปีอินเดีย (th); Ρουπία Ινδίας (el); အိန္ဒိယရူပီးငွေ (my); 印度盧比 (yue); indiai rúpia (hu); ભારતીય રૂપિયો (gu); індыйская рупія (be-tarask); Indiar errupia (eu); Indijska rupija (hr); Їндїиска роупиꙗ (cu); rupia índia (ca); Ropia d'Índia (oc); Indische Rupie (de); Indisk rupee (sv); rúipí na hIndia (ga); Հնդկական ռուփի (hy); 印度盧比 (zh); indisk rupi (da); भारतीय रुपिया (ne); インド・ルピー (ja); రూపాయి (te); Hindistan rupisi (tr); روبيه هندى (arz); Indiase roepie (nl); רופי הודי (he); Һиндстан рупиясе (tt); रूप्यकम् (sa); भारतीय रुपया (hi); ᱥᱤᱧᱚᱛᱤᱭᱟᱹ ᱴᱟᱠᱟ (sat); Intian rupia (fi); rupī (mi); индийская рупия (ru); இந்திய ரூபாய் (ta); الروپًية لهندية (ary); rupia indiana (it); Éng-dô rupee (cdo); ინდური რუპია (ka); Rupie (nds); India ruupia (et); भारतीय रुपया (mai); ଭାରତୀୟ ଟଙ୍କା (or); Hindiston rupiyasi (uz); индијска рупија (sr-ec); Rupee Índíà (yo); ਭਾਰਤੀ ਰੁਪਈਆ (pa); rupia indiana (pt); rupi Indjan (mt); Inđían Ruppaí (brh); ინდური რუპია (xmf); Indijos rupija (lt); indijska rupija (sl); Rupee ng India (tl); بھارتی روپیا (pnb); Ìn-tō͘ rupee (nan); Rupee India (id); Rupia indyjska (pl); ഇന്ത്യൻ രൂപ (ml); Indijska rupija (sh); 印度卢比 (wuu); Индиатәи арупи (ab); indická rupie (cs); rupee Indiaidd (cy); rupia india (gl); روپیه هند (fa); rupia ìndia (vec); Індыйская рупія (be) moneda de la India (es); India hivatalos pénzneme (hu); ભારતનું ચલણ (gu); валюта Индии (ru); Währungseinheit in Indien (de); یکای پول هندوستان (fa); 印度货币 (zh); kurum a̱gwomna̱ti Ri̱pobi̱lik Ndiya (kcg); Hindistan'ın para birimi (tr); インドの通貨 (ja); מטבע הודי (he); रुपयकम् (sa); भारत की आधिकारिक मुद्रा (hi); ਭਾਰਤ ਦੀ ਮੁਦਰਾ (pa); ভাৰতৰ ৰাষ্ট্ৰীয় মুদ্ৰা (as); valuto uzata en Barato (eo); měna (cs); فلوس (ary); valuta dell'India (it); ভারতীয় প্রজাতন্ত্রের সরকারি মুদ্রা (bn); monnaie de l'Inde (fr); валюта Індыі (be-tarask); भारताचे अधिकृत चलन (mr); Tiền tệ chính thức của Ấn Độ (vi); amptelike geldeenheid van die Republiek van Indië (af); valuta (nb); ଭାରତର ମୁଦ୍ରା (or); Intian rahayksikkö (fi); official currency of the Republic of India (en); mata uang India, Bhutan, Nepal, dan Zimbabwe (id); Waluta Indii (pl); ഇന്ത്യയുടെ കറൻസി (ml); valuta (nl); padrão monetário da Índia (pt); arian cyfred India (cy); ಭಾರತದ ಔದ್ಯೋಗಿಕ ಹಣ (kn); دراوی فەرمی وڵاتی هیندستان (ckb); moeda da India (gl); عملة متداولة (ar); officiel valuta i Indien (da); валюта Індії (uk) Rupias, Rupias indias, rupia, INR (es); Валюта Индии, рупия (ru); Taka, Tanka, Rubai, Rupaye (de); Валюта Індыі (be); ভারতীয় রূপি (bpy); 印度卢比, Rs. (zh); ₹, Rupaya, Rupee, INR (kcg); რუპია (ka); Indisk rupie (sv); INR (oc); भारतीय रुपये, INR, Rupee (hi); Indian Rupie, Indian rupee, 印度卢比; (wuu); Indian rupee convertibility, Indian Rupee, Indian silver rupee, Sicca rupee, Rupee Convertibility, Indian rupees, টকা, Indian National Rupee, Indian Re, India Rs, रू. (as); Hinda rupio (eo); INR (cs); இந்திய ரூபா (ta); ₹, Rupie indiane, Rupia dell'India (it); ভারতীয় রূপি, रू., Rupee, INR (bn); ₹, INR (fr); рупія, INR (be-tarask); भारतीय नाणी, भारतीय रुपये, रुपया (mr); Rúpia indiana, Rupia da Índia (pt); רופיה הודית (he); ₹, INR, Indijas rūpijas (lv); рупи (os); Рупија, Индијски рупи (sr); rupija, INR (sl); Indian rupee (yo); рупія (uk); ଭାରତୀୟ ମୁଦ୍ରା (or); భారతీయ రూపాయి, భారతదేశ రూపాయి, భారత రూపాయి, Rupee, INR (te); Rupia d'Índia, Rupia de l'Índia, Rupies índies, Rúpies (ca); ഇന്ത്യൻ കറൻസി, രൂപ, രൂപാ (ml); Indiase rupee (nl); rupi, Indisk rupie (nb); روپیهٔ هند, پول هندوستان (fa); INR (et); ڕووپیە (ckb); Rupaya, INR, Rupee (en); الروبية الهندية, روبيه هنديه, روبي هندية (ar); Ινδική Ρουπία, INR (el); indiske rupees, indisk rupee, indisk rupier (da)
भारतीय रुपया 
भारताचे अधिकृत चलन
forgalomban lévő bankjegyek
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
उच्चारणाचा श्राव्य
प्रकारचलन,
रुपया
स्थान भारत
कार्यक्षेत्र भागभारत
उत्पादक
नंतरचे
  • East African rupee
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr
भारतीय रुपये
रुपये
ISO 4217
Code INR (numeric: 356)
Subunit ०.०१
चलनाचे विभाजन
Subunit
 १/१०० (पैसा) {{{subunit_name_1}}}
Banknotes ₹१०, ₹२०, ₹५०, ₹१००,₹२०० ,₹५००
Coins ₹१, ₹२, ₹५, ₹१०
भौगोलिक माहिती
User(s) भारत ध्वज भारत

भारतीय रुपया (अनेकवचन: रुपये) हे भारतीय गणराज्याचे अधिकृत चलन आहे. एक भारतीय रुपया हा शंभर पैशांमध्ये (एकवचन: पैसा, अनेकवचन: पैसे) विभागला जातो. भारतीय चलनामध्ये नोटानाणी वापरली जातात. सर्व भारतीय चलनी नोटा या भारतीय रिझर्व बँकेतर्फे बनविल्या जातात.भारतीय चलनासाठी युनिकोडमध्ये U+20B9 ही नियमावली ठरवण्यात आली आहे.[] रुपया हा शब्द संस्कृत मधील रूप्य (रुप्याचे नाणे) किंवा रौप्य (रुपे) या शब्दापासून आला आहे.(रुपे हा चांदी-रजत, या धातूपासून बनलेला एक मिश्र धातू आहे. रुप्यापासून बनविलेला तो रुपया-पूर्वीचे राजे चलनासाठी चांदीचे नाणे बनवीत असत.)

इतिहास

[संपादन]

पूर्वी वस्तुविनिमय पद्धत होती पैसा  असा  नव्हताच एका वस्तूबद्दल दुसरी वस्तू दिली जायची ,प्राथमिक स्वरूपात हत्तीचे दात ,प्राण्यांचे केस ,झाडांच्या साली,बिया शंख ,शिंपले इत्यादी पैसा म्हणून वापरले जाऊ लागले ,बक्सरच्या लढाई नंतर सन १७६४-६५ मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात मोगल बादशाह शाह आलमची नाणी पाडून देण्यास सुरुवात केली. त्यावेळची नाणी हाताने तयार करण्यात येत असत. त्यामुळे ती गोल, साचेबद्ध, एकसारखी नसत. पुढे सन १७९० मध्ये भारत देशात यासाठी मशीन मागविण्यात आले. त्याद्वारे तयार करण्यात आलेली नाणी बरीच सुबक झाली.

भारतात गोल, सुबक, सारख्या वजनाची, प्रमाणित नाणी (Uniform Coinage) तयार करण्याचा मान जेम्स प्रिन्सेप (James Princep) यांना जातो. जेम्स प्रिन्सेप यांना भारतीय नाणक शास्त्राचे (Numismatics) जनक मानले जाते. त्यांनी भारतीय नाण्यांचा सखोल अभ्यास करून भारतीय नाणी साचेबद्ध आणि सारख्या वजनाची असावीत म्हणून एक अहवाल तयार केला आणि लॉर्ड विल्यम बेंटिक यांच्याकडे पाठविला. तो अहवाल मंजूर झाला आणि प्रिन्सेप यांनी पाठविलेल्या सहा नमुन्यांपैकी एक मंजूर करण्यात आला. त्या पहिल्या नाण्यावर तत्कालीन ब्रिटिश राजे चौथे विल्यम यांची भावमुद्रा होती. तेव्हापासून भारतीय नाणी यंत्रांद्वारे तयार करण्यात येऊ लागली. प्रिन्सेप यांनीच भारतात वजन आणि मापे प्रमाणित असावीत (Standard Weights & Measures) म्हणून सरकार दरबारी पाठपुरावा केला. तोही अहवाल मंजूर होऊन भारतात वजन आणि मापे प्रमाणित झाली.

या सोबतच कोणते नाणे कुठे तयार करण्यात आले ते समजण्यासाठी सर्व प्रकारच्या नाण्यांवर एक छोटी खूण (मिंट मार्क) करण्यात येऊ लागली. अशी खूण पाहून नाणी जमा करणे हा या छंदातला एक महत्त्वाचा भाग समजला जातो.

सन १८३३-३४ पासून विल्यम राजाच्या छापाची नाणी तयार व्हावयास सुरुवात झाली. त्यानंतर अनुक्रमे व्हिक्टोरिया राणी, आठवे एडवर्ड, पंचम जॉर्ज आणि सहावे जॉर्ज सहावे या राजांची मुद्रा असलेली नाणी सन १९४७ पर्यंत भारतात तयार करण्यात आली. या कामासाठी तत्कालीन भारताच्या तिन्ही म्हणजे (१) बंगाल, (२) मुंबई आणि (३) मद्रास या प्रांतात अनेक नवीन टांकसाळी तयार करण्यात आल्या. तांबे, चांदी आणि सोने वापरून नवीन नाणी तयार करण्यात आली. त्यासाठी नवा कायदाही अस्तित्वात आला.

सगळ्यात लहान नाणे म्हणजे १ पै, ३ पैचा १ पैसा, ६ पैसे मिळून १ आणा, १६ आण्यांचा १ रुपया, १५ रुपये म्हणजे १ मोहर (सोन्याचे नाणे) असे प्रमाण ठरविले गेले. त्यावर एका बाजूला राजा/राणीच्या भावमुद्रा (छाप = Obverse side) तर दुसऱ्या बाजूस (काटा = Reverse side) ईस्ट इंडिया कंपनी, नाण्याची किंमत वगैरे माहिती लिहिली जात असे.

व्हिक्टोरिया राणी रुपया, १८८७.

ब्रिटिश कालीन भारतीय नाणी दोन मुख्य प्रकारात मोडतात. पहिला काळ सन १८३३ पासून १८५७ पर्यंतचा. या काळातील नाण्यांवर ईस्ट इंडिया कंपनीचे नाव दिसून येते, तर दुसरा काळ सन १८५७ पासून १९४७ पर्यंतचा. १८५७ साली झालेल्या राष्ट्रीय उठावानंतर कंपनी सरकारचे अधिकार कमी करण्यात आले आणि राज्य सत्ता थेट ब्रिटिश राजघराण्याकडे गेली. त्यामुळे नवीन नाण्यांवरील ईस्ट इंडिया कंपनीचे नाव लुप्त झाले. तर व्हिक्टोरियाची नाणी व्हिक्टोरिया राणी (क्वीन) आणि व्हिक्टोरिया सम्राज्ञी (एम्प्रेस) अशा दोन मुख्य प्रकारांत निघाली.

भारताच्या स्वातंत्र्य मिळण्याचे निश्चित झाल्यावर नाण्यांमध्ये थोडा बदल करण्यात आला. एकीकडे सहावे जॉर्ज यांची भावमुद्रा तशीच ठेवण्यात आली तर दुसऱ्या बाजूस भारताचे प्रतीक म्हणून सिंहाचे चित्र आले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५० पर्यंत ही नाणी सुरू रहिली. १९५० साली मात्र पूर्णपणे भारतीय नाणी तयार करण्यात आली. ही नवी नाणी चांदीची नव्हती पण त्यांचे रुपया हे नाव मात्र स्वीकारण्यात आले. ब्रिटिश राजे-राण्यांचे चित्र काढून टाकण्यात आले. आता त्याऐवजी चारही दिशांकडे पाहणारे चार सिंहाचे मानचित्र आले. १९५७ सालानंतर आणखी बदल करून एक रुपयाचे १०० पैसे असे प्रमाण ठरविण्यात आले. तेव्हापासून आजपर्यंत नाण्यांच्या धातू, वजन वगैरे मध्ये वेळोवेळी बदल होत गेले. मुख्य म्हणजे दर्शनी भागावर काहीही फरक झालेले नाहीत.

रुपयाची उत्क्रांती

[संपादन]

फुटी कौडी पासून कौडी आली. कौडी पासून दमडी आली. दमडी पासून धेला आला. धेला पासून पाई आली. पाई पासून पैसा आला. पैसा पासून आणा आला. आणा पासून रुपया आला.


जुनी भारतीय चलन प्रणाली कशी मोजले जात होती ते खालील विभक्तीकरणा वरून लक्षात येईल

फुटकी कवडी - कवडी


कवडी- दमडी

दमडी- धेला

ढेला - पाई

पाई - पैसा

पैसा- रुपया

२५६ दमडी= १९२ पाई= १२८ ढेला= ६४ पाई= १६ आणे= १ रुपया

यातील आणे पद्धती पन्नासच्या दशकानंतर बाद केली जाऊन पैसे पद्धत सुधारण्यात आली व १०० पैशाचा १ रुपया अशी मोजदाद होऊ लागली

इतर भाषांत रुपयाचे शब्दप्रयोग

[संपादन]

भारतात रुपयास प्रत्येक प्रांतात विविध स्थानिक नावांनी संबोधले जाते:

  • हिंदी भाषेत : रुपया, रुपय्या, रुपैया. अनेकवचन : रुपये (क्वचित्‌ रुपए)
  • गुजराती भाषेत (રૂપિયો) रुपियो. अनेकवचन रुपिया.
  • तेलुगू भाषेत (రూపాయి) रूपायि.
  • तुळू भाषेत (ರೂಪಾಯಿ) रूपायि.
  • कन्नड भाषेत (ರೂಪಾಯಿ)रूपायि.
  • तमिळ भाषेत (ரூபாய்) रूबाय .
  • मल्याळम भाषेत (രൂപ) रूपा.
  • मराठी भाषेत रुपया, रुपये (अनेकवचन).
  • संस्कृत भाषेत रूप्यकम्, रूप्यकाणि(बहुवचन).
  • ईशान्येकडील राज्ये वगळता उर्वरित भारतात रुपया/रुपये हे रोमनलिपीतील "Re/Rs" ह्या अक्षरांद्वारे दर्शवितात. मराठीत ’रु’ हे लघुरूप वापरतात.
  • पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मिझोरम, ओरिसा, आणि आसाम मध्ये रुपयाला टाका/टोका/तोका म्हणतात..
  • बंगाली भाषेत (টাকা) टाका.
  • आसामी भाषेत (টকা) तोका.
  • ओरिया भाषेत (ଟଙ୍କା) तनक.
  • आग्नेयेकडील राज्यांत रोमनलिपीतील अक्षर 'T'चा वापर करून रुपये दर्शविले जातात. नोटांवरही त्या भाषांतील मजकुरासाठी असेच छापतात.



प्रतीकचिन्ह

[संपादन]

भारतीय रुपयासाठी प्रतीकचिन्ह (₹) तयार करण्यात आले आहे. डी.उदयकुमार या आय आय टीच्या विद्यार्थ्याने केलेल्या रेखांकनाची यासाठी निवड करण्यात आली.[] या प्रतीकचिन्हाच्या वापराने,भारतीय रुपयाला जागतिक अर्थव्यवस्थेत नवा आयाम मिळणार आहे.दिनांक १५ जुलै २०१० रोजी झालेल्या भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत यास मंजूरी देण्यात आली.आयएसओ-आयईसी १०६४६ व आयएस १३१९४ याअंतर्गत युनिकोडित केल्यावर हे प्रतीकचिन्ह आंतरराष्ट्रीय अर्थव्यवहारासाठी उपयोगात आणले जाईल. रुपया अशा रीतीने चिन्हांकित केल्यानंतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये यास स्थान दिले जाईल.[]

२००५ साली बनवली जाणारी चलने (नाणी व नोटा) खालीलप्रमाणे आहेत:

नोटा

[संपादन]

सध्या ५ रुपयांपासून २००० रुपयांपर्यंतच्या नोटा चलनात आहेत. पूर्वी चलनात असलेल्या एक व दोन रुपयांच्या नोटा अजूनही ग्राह्य आहेत परंतु या किंमतींच्या नवीन नोटा छापल्या जात नाहीत.

भारतीय चलनातील १०० रुपयांच्या नोटेच्या पृष्ठभागावरील हिमशिखर म्हणजे ‘माउंट कांचनगंगा’ होय[]

नोव्हेंबर २०१६मध्ये मोदी सरकारने त्याकाळी चलनात असलेल्या ५०० व १,००० रुपयांच्या नोटा रातोरात रद्द झाल्याचे जाहीर केले. त्याऐवजी ५०० रुपयांची नवीन नोट व २,००० रुपयांची नोट चलनात आणली गेली.

सध्या चलनात असलेल्या नोटा

[संपादन]
महात्मा गांधी श्रेणी [१] Archived 2011-10-26 at the Wayback Machine.

येथील चित्रे ०.७ पिक्सेल प्रति मिलिमीटर, या प्रमाणात चित्रित केलेली आहे. हे प्रमाण जगातील सर्व चलनी नोटांच्या बाबतीत लागू होते.

सुलट बाजूचे चित्र उलट बाजूचे चित्र मूल्य आकार मुख्य रंग वर्णन चलनात आल्याचे वर्ष
सुलट उलट
₹५ ११७ × ६३ मिमी हिरवा महात्मा गांधी ट्रॅक्टर इ.स. २००२
₹१० १२३ × ६३ मिमी तपकिरी कोणार्क सूर्य मंदिर इ.स. २०१७
₹२० १२९ × ६३ मिमी पिवळा वेरूळ लेणी इ.स. २०१९
₹५० १३५ × ६६ मिमी निळा हंपी इ.स. २०१७
₹१०० १४२ × ६६ मिमी जांभळा रानी की वाव इ.स. २०१८
₹२०० १४६ × ६६ मिमी नारिंगी सांची स्तूप इ.स. २०१७
₹५०० १५० × ६६ मिमी राखाडी लाल किल्ला इ.स. २०१६

२०१६मधील नवीन नोटा

[संपादन]

२०१६मध्ये वापरात असलेल्या ५०० आणि १००० रुपये किंमतीच्या नोटा ८ नोव्हेंबर २०१६ च्या मध्यरात्री १२ :०० वाजल्या पासून रद्द केल्या गेल्या आणि त्याजागी ५०० आणि २००० किंमतीच्या नव्या नोटा जारी करण्याचे जाहीर केले गेले.

नाणी

[संपादन]
जुनी नाणी

खालील चलने नाण्यांच्या रूपांत वापरली जातात:

  • ₹७५ (दि. ३० डिसेंबर २०१८ला विमोचित, नेहमीच्या वापरासाठी नाहीत.)[]
  • ₹१०
  • ₹५
  • ₹२
  • ₹१
  • ५० पैसे (३०जून२०११ पासून भारतीय चलनातील सर्वात कमी किमतीचे चलन)
  • २५ पैसे (३०जून२०११ पासून ५० पैशांखालील किमतीची सर्व नाणी चलनातून अधिकृतरीत्या बाद झाली आहेत.)

पहा : जुने भारतीय चलन

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "चारबेस संकेतस्थळ (इंग्रजी मजकूर)". 2013-07-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-07-15 रोजी पाहिले.
  2. ^ "हिंदुस्थान टाइम्सचे संकेतस्थळ (इंग्रजी मजकूर)". 2010-07-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-07-16 रोजी पाहिले.
  3. ^ दूरदर्शनचे संकेतस्थळ (इंग्रजी मजकूर)
  4. ^ उमेश झिरपे (२४ डिसेंबर २०१५). "अष्टहजारी शिखर मोहीम!". लोकसत्ता. २५ डिसेंबर २०१५ रोजी पाहिले.
  5. ^ पीटीआय, पोर्टब्लेअर. टेलिग्राफ इंडिया संकेतस्थळ "Modi renames Ross, Havelock and Neil islands in the Andamans:Narendra Modi also released a commemorative stamp, its first-day cover and a Rs 75 coin on this special day" Check |दुवा= value (सहाय्य). ३१-१२-२०१८ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)(इंग्रजी मजकूर)
सध्याचा भारतीय रुपयाचा विनिमय दर
गूगल फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर
याहू फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर
ओझफॉरेक्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर
एक्सई.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर
ओआंडा.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर