Jump to content

जुने भारतीय चलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मुगल काळापासून ते भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत, खालील प्रकारचे चलन अस्तित्वात होते. सगळ्यात छोटे चलन हे फुटकी कवडी होते. त्यानंतर कवडी, दमडी, पै ,ढेला, पैसा, आणा व रुपया असे चलनाची किंमत वाढत जात होती. खाली त्याबाबतचा तक्ता दिला आहे-

क्र. चलनाचे नाव दुसऱ्या चलनाशी बरोबरी
फुटलेली कवडी सर्वात छोटे चलन
कवडी ३ फुटक्या कवड्या
दमडी १० कवड्या
पै ४ दमड्या
ढेला २ दमड्या
पैसा २ ढेले = ३ पै
४ पैसे १ आणा
१ रुपया ६४ पैसे / १६ आणे / १२८ ढेले / १९२ पया / २५६ दमड्या


शिवाजी महाराजांच्या आधी, शिवाजी महाराजांच्या काळी आणि शिवाजी महाराजांच्या कालोत्तर व्यवहारात असलेल्या चलनांचा शब्दकोष -

  • अटका, अडका- सुपारी
  • अटीचा रुपया- आटविण्यास योग्य, खराब झालेला रुपया
  • अदवानी- होनाचा प्रकार
  • अधेला- अर्धा पैसा
  • अधेली- अर्धा रुपया
  • अर्दी- एक पै
  • अलिबागी- आंग्रे यांचा रुपया
  • अशरफी- अश्रफी, एक सोन्याचे नाणे, मोहर, झेराफिन या पोर्तुगीज शब्दाचा अपभ्रंश
  • अहमदी- टिपू सोन्याचा होन
  • आगुदान- देवगिरिच्या यादवांचे सुवर्णाचे नाणे
  • आसू- देवगिरीच्या यादवांचे एक चांदीचे नाणे
  • इटावप्रत- इटावा येथील रुपया
  • इभ्रामी- इब्राहीम आदिलशहाचा होन
  • उदानका- पैसा
  • एकेरी- दक्षिणेकडील होन
  • कची ठेली- तडे गेलेला, तुटका , पुसट रुपया
  • कंठी रुपया- नीळकंठी रुपया
  • कपर्दक, कपर्दिका-कवडी
  • कलदार- इंग्रजी शिक्क्याचा सूरत येथील रुपया
  • कलेकरी- कलदार रुपया
  • कामील- होनाचा एक प्रकार
  • कावेरीपाक- एक होन प्रकार
  • कार्षापण- जुन्या काळातिल नाणे
  • खुर्दा- मोड
  • खुळा पैसा- दक्षिणेतील तांब्याचे नाणे, ७०० खुळे पैसे= १ रुपया
  • गंजीकोट- गंजीकोट येथील चलन
  • गबर, गंभर, गंभार, - एक सोन्याचे नाणे
  • गिनी- इंग्लंडमधील एक सोन्याचे नाणे
  • गिन्नी- हिन्दुस्थानातील एक आणा किमतीचे नाणे
  • घुला- पिवळसर रंगाची मोठी कवडी
  • चकार, चकारा, चकारी- चवला, दोन आण्याचे नाणे
  • चक्रम- दक्षिणेतील एक सुवर्ण नाणे
  • चतरसिंगी रुपया- पुणे येथील चतुशृंगी रुपया
  • चवल, चवली- दोन आण्याचे नाणे
  • चाम- सुवर्ण नाणे
  • चाल- एक नाणे
  • चौली- चवली
  • दुणेली- एक आणे किमतीचे नाणे
  • छदाम- एका पैशाचा एक चतुर्थांश, दोन दमड्या, सहा दाम
  • जडमोल- होन प्रकार
  • जमखंडी, जमसिरी, जमसेरी - होनाचा एक प्रकार
  • जहाजानी पंचमेळ रुपया- रुपयाचा एक प्रकार
  • जुनथर- जुने चलनातील नाणे
  • जुल्फकारी, झुल्पकारी- हैद्राबादचा रुपया. यावर तरवार चिन्ह असते
  • जैफ- पुसट, गुळगुळीत झालेली किंवा कातरलेली नाणी. ही पोत्यास किंवा सरकारी तिजोरित
  • टाक- चांदीचा रुपया
  • टाली- आठ आणे, अधेली
  • टोली- पैश्याचा आठवा हिस्सा
  • तांग- सोळा पयांचे एक चलन, आणेली
  • ताट- पुतळी, अजमासे पांच रुपये किमतीचे सोन्याचे नाणे
  • तांबली-तांब्याचे एक क्षुद्र नाणे
  • तिवल- दीड आणा
  • दुवल- एक आणा
  • दुवली- आणेली
  • तिरकी- एक पै, रुका
  • तुरू- एक प्रकारचे नाणे
  • दमडी- पैशाच्या चौथ्या हिश्श्याचे किंवा दहा बारा कवड्यांच्या किमतीचे नाणे
  • दाभोळीलारी- दाभोळ बंदर टांकसाळीत पडलेले आदिलशाही चांदीचे नाणे. याचा आकार स्त्रियांच्या हेअर पिनसारखा होता
  • दाम- एक तांब्याचे नाणे=१/६ छदाम
  • दिडकी- एक पैसा, दीड दुगाणी नाणे
  • दिरम, दिरिम- दोन आणे किमतीचे चांदीचे नाणे
  • दुकंडा- दोन कवड्यांचे चलन
  • दुगनी- तांब्याचे जुने नाणे
  • दुगाणी- अर्धा पैसा
  • दुदांडी- दोन समांतर रेषा असलेली पेशवाई शिवराई
  • दुकार- एक आणा
  • दुडु- पैशाच्या एक चतुर्थांश किमतीचे नाणे
  • दुवल- रुपयाचा सोळावा भाग
  • दुवली- आणेली
  • दोकडा- गुजराथमधील नाणे परिमाण
  • धरण- सम्मुचयाने नऊ आणे, पाव होन
  • नासरी- अर्धी दमडी
  • निमती- अधेली, आठ आणे
  • निष्क- एक सोन्याचे नाणे, चार रुपये किंमतीचे एक परिमाण
  • पचकी- दमडीच्या किंमतीचे एक तांब्याचे नाणे
  • पताक- एक रुप्याचे नाणे
  • पाई- पै
  • पागोडा- मद्रासमधील सोन्याचे नाणे
  • पाची- पांच रुपये किमतीचे सोन्याचे नाणे
  • पार्दाव- पोर्तुगीज नाणे
  • पावणा- पाव आणा
  • पावला, पावली- रुपयाचा एक चतुर्थांश, चार आणे किंमतीचे नाणे
  • पै- आण्याचा बारावा भाग
  • पैसा- आण्याचा चौथा भाग, एक तांब्याचे नाणे
  • पोवन- साॅच्हरीन नावाचे सोन्याचे नाणे
  • पुतळी- हिन्दुस्तानात चलनात असलेले प्राचीन ग्रीक रोमन नाणे
  • फनम- दक्षिणेतील चांदीचे किंवा सोन्याचे एक लहान नाणे
  • फसकी- फांसा असलेली पुतळी
  • फाटा, फांटा- रुपयाचा सोळावा भाग, आणा
  • बेल- अर्धा आणा
  • बोडी- वीस कवड्यांचे एक नाणे
  • ब्याळ- अर्धा आणा
  • मुयेद- अट्ठावीस रुपये किमतीचे एक नाणे
  • मोहर- सोन्याचे एक तोळा वजनाचे नाणे
  • म्वार- मोहर
  • रयाल- एक चांदीचे नाणे
  • रुका, रुक्का- आण्याचा बारावा भाग
  • रुपया- सोळा आणे किंमतीचे चांदीचे नाणे
  • रुब- चार पै
  • रुबल- रूस देशातील दीड रुपया किंमतीचे एक नाणे
  • रेवती- अधेली, अर्धा रुपया
  • रेस- आण्याचा २५वा व रुपयाचा ४००वा भाग, एक पोर्तुगीज नाणे
  • लहारी, लारी, लाहरी, लाहारी- तीन आणे किंमतीचे एक चांदीचे स्त्रियांच्या हेअर अहमदी पिन सदृश्य आदिलशाही नाणे
  • लोही- मोहर, सोन्याचे नाणे
  • शाईपैसा- शाही पैसा
  • शिवराई- शिवाजीने पाडलेली सोन्याची व तांब्याची नाणी
  • शिवाई- शिवराई होन
  • शेटवाई, मोहर- सावकाराने पाडलेली मोहर
  • शेणी- दूंडा, ढबू पैसा
  • सणी- सजगनी, ढबू पैसा, दोन पैसे
  • सन्या- अर्धा आणा
  • सप्तगनी, सप्तगाणी- दुंडा पैसा
  • सकरीन- आठ आणे किंमतीचे आणे
  • सजगनी, सणी, ससगणी, ससगाणी- ढबू पैसा
  • सापिका- दीड रुका किंमतीचे तांब्याचे नाणे
  • होन- सोन्याचे साधारण साडेतीन रुपये किंमतीचे नाणे

या चलनांवर आधारित म्हणी, वाक्प्रचार व गाणी

[संपादन]

मराठी

[संपादन]
  • कवडी एक खर्चिता देशी हार मुक्ताफळाहो - देवीच्या आरतीमधील ओळ
  • दातांवर मारायला फुटकी कवडी नाही.
  • दीड दमडीचा नाही पण गोष्टी पहा याच्या. - संवाद
  • नाही खर्चिली कवडी दमडी, नाही वेचला घाम - मराठी गाणे, 'जगाच्या पाठीवर' मराठी चित्रपट

हिंदी

[संपादन]
  • एक फूटी कौडी नही दूंगा - (हिंदी चित्रपटातील डायलॉग)
  • चमडी जाय पर दमडी न जाय ‌- एक हिंदी म्हण
  • ढेलेका काम नही करता वो, सिर्फ बैठके खाता है|
  • पाई पाई (पै) का हिसाब लूंगा -

भारतीय चलनांवरील मराठी पुस्तके

[संपादन]
  • महाराष्ट्रातील चलनाचा इतिहास (पद्माकर प्रभुणे)

अधिक वाचन

[संपादन]