Jump to content

गूढवाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रहस्यवाद या पानावरून पुनर्निर्देशित)
पर्सेफनी ही देवता, अथेन्सच्या नॅशनल आर्किऑलॉजिकल म्युझिअममधील द ग्रेट इल्युसिनिअन उठावचित्रामधून
आय ऑफ प्रॉविडंस : आचेन कॅथेड्रलच्या कळसावरील सर्व-दर्शी डोळा
अविलाच्या संत तेरेसासमोर प्रकट झालेली पवित्र चेतना, पीटर पॉल रुबेन्स

वास्तवाच्या विविध पैलूंचे किंवा जाणिवेच्या अवस्थांचे किंवा अस्तित्वाच्या स्तरांचे सामान्य मानवी संवेदनेपलीकडील ज्ञान आणि प्रामुख्याने व्यक्तिगत अनुभव म्हणजे गूढवाद किंवा रहस्यवाद होय. गूढवादात काही वेळा सर्वोच्च सत्तेचा अनुभव किंवा तिच्याशी संवाद यांचाही समावेश होतो.

अभिजात उद्गम

[संपादन]

"मिस्टिकोज" ही गूढ धर्माची दीक्षा घेतलेली व्यक्ती असे. इल्युसिनिअन मिस्टरीज ( ग्रीक : Ἐλευσίνια Μυστήρια) हे डिमिटरपर्सेफनी या देवतांच्या पंथातील वार्षिक दीक्षासमारंभ होते. ते प्राचीन ग्रीसमधील अथेन्स नगराजवळ असलेल्या इल्युसिस इथे होत असत.[] ख्रिस्तपूर्व सुमारे १६०० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या ह्या मिस्टरीज्‌ दोन हजार वर्षे सुरू राहिल्या.

आधुनिक आकलन

[संपादन]

गूढवादाचा आधुनिक अर्थ प्लेटोमत व नवप्लेटोमतामार्फत आलेला आहे. या मतांनी इल्युसिनिअन दीक्षांकडे आध्यात्मिक सत्यांची व अनुभवांची 'दीक्षा' म्हणून पाहिले. गूढवादाचा आधुनिक अर्थ "थेट अनुभव, अंतःप्रज्ञा, अंतःस्फूर्ती किंवा अंतर्दृष्टी यांच्यामार्फत अंतिम सत्य, दिव्यत्व, आध्यात्मिक सत्य किंवा ईश्वराशी संवाद साधण्याचा, एकरूप होण्याचा प्रयत्न" असा आहे. अशा अनुभवांना पोषक ठरणाऱ्या गोष्टींवर गूढवाद भर देतो. गूढवाद द्वैती अर्थात स्व आणि दिव्य यांच्यात भेद असतो असे मानणारा किंवा अद्वैती असू शकतो.

जगातील सगळेच नसले तरी अनेक धर्म गूढवाद्यांच्या शिकवणीवर (बुद्ध, येशू, लाओ त्सेश्रीकृष्ण यांच्यासहित) आधारलेले आहेत आणि बहुतेक सर्व धार्मिक परंपरा मूलभूत गूढ अनुभवांचे किमान गुप्तपणाने वर्णन करतात. ज्ञानोदय किंवा उद्बोधन ह्या अशा अनुभवांसाठीच्या जातिगत संज्ञा आहेत. त्या लॅटिन इल्युमिनॅशिओ पासून व्युत्पन्न झालेल्या आहेत आणि बुद्धासंबंधित ग्रंथ इंग्रजीत भाषांतरित करताना वापरल्या गेलेल्या आहेत.

पारंपरिक धर्मांची संस्थात्मक रचना मजबूत असते, तिच्यात औपचारिक उच्चनीचभेद असतात, पवित्र ग्रंथ आणि/किंवा श्रद्धा असतात. त्या धर्मातील व्यक्तींनी या श्रद्धा पाळणे आवश्यक असते, म्हणून गूढवाद बऱ्याचदा टाळला जातो किंवा त्याला पाखंड मानले जाते.[]

पुढील तालिकेत जगातील प्रमुख धर्मांमधील गूढवादाची रूपे आणि त्यांच्या मूलभूत कल्पना दिलेल्या आहेत.

प्रमुख धर्मांमधील गूढवाद
यजमान धर्म गूढवादाचे रूप मूलभूत कल्पना माहितीचे स्रोत
बौद्ध शिंगॉन, वज्रयान, झेन निर्वाण, सतोरी, बोधी मिळविणे, महामुद्रा वा झॉग्चेनशी ऐक्य साधणे [][]
ख्रिश्चन कॅथलिक अध्यात्म, क्वेकर परंपरा, ख्रिश्चन गूढवाद, ज्ञेयवाद आध्यात्मिक ज्ञानोदय, आध्यात्मिक दर्शन, ईश्वरी प्रेम, ईश्वराशी ऐक्य (थिऑसिस) [][][]
फ्रीमेसन्री - उद्बोधन []
हिंदू वेदान्त, योग, भक्ती, काश्मिरी शैव संप्रदाय कर्मचक्रातून मुक्ती (मोक्ष), आत्म-ज्ञान, कैवल्य, अंतिम सत्याचा अनुभव (समाधी), सहजस्वभाव [][१०]
इस्लाम सुन्नी, शिया, सुफी मत ईश्वरावर आंतरिक विश्वास (फित्र); फना (सुफी मत); बक़ा. [११]
जैन मोक्ष (जैन धर्म कर्मचक्रातून मुक्ती [१२]
यहुदी कब्बाला, हसिदी मत अहंकाराचा परित्याग, ऐन सोफ [१३]
रोसिक्रुशिअन - - [१४]
शीख - कर्मचक्रातून मुक्ती [१५][१६][१७]
ताओ - ते: अंतिम सत्याशी संपर्क [१८]

आध्यात्मिक गुरूंनी वापरलेले साहित्यप्रकार

[संपादन]

व्याख्येप्रमाणे गूढ ज्ञान हे थेट लिहिले किंवा बोलले जाऊ शकत नसल्याने (ती अनुभवण्याची गोष्ट असल्याने) असे ज्ञान ध्वनित करणारे अनेक साहित्यप्रकार - बऱ्याचदा विरोधाभासांचा किंवा अगदी विनोदांचाही आधार घेत - बनलेले आहेत. नमुन्यादाखल :

सूत्र, काव्य

[संपादन]

सूत्र व काव्यामध्ये गूढ अनुभवाचा एखादा पैलू शब्दांमध्ये स्पष्ट करण्याचा कलात्म प्रयत्न केलेला असतो :

कोअन, कोडी, विरोधाभास

[संपादन]

झेन कोअन, कोडी आणि ज्ञानमीमांसीय विरोधाभास हे मुद्दामहून उकलता न येण्यासाठी बनविलेले असतात. त्यांचा उद्देश विचार व बुद्धीपासून व्यक्तीला दूर नेऊन थेट अनुभवासाठी प्रयत्न करण्यास लावणे हा असतो.[२०]

या कोड्यांकडे विनोदाने किंवा लक्षणीय गूढ उत्तरे असणारे गंभीर प्रश्न म्हणून पाहिले जाऊ शकते. उत्तर ‘मिळविण्याचा’ प्रयत्न सोडून फक्त ‘असण्याचाच’ अनुभव घेण्याकडे हे प्रश्न नेतात.

  • पीक कापणे म्हणजे अख्खे जपून ठेवणे, वाकणे म्हणजे सरळ होणे, मोकळे असणे म्हणजे भरणे, थोडेसेच असणे म्हणजे मालकी असणे[२१] ही ताओ कल्पना शिक्षित आत्म्याला रिकामे करण्याच्या मार्गातील एक ज्ञानमीमांसीय विरोधाभास दाखवून देते.

विनोद

[संपादन]

विनोद व विनोदी कथांच्या माध्यमातूनही आध्यात्मिक शिकवण प्रभावीपणे दिली जाऊ शकते :

  • मुल्ला नसरुद्दीनच्या कथा हे उत्तम उदाहरण.[२२] नमुन्यादाखल : नदीकाठी बसलेल्या नसरुद्दीनला एक जण ओरडून विचारतो, “मी पलीकडे कसा येऊ?” यावर तो उत्तर देतो, “तू पलीकडेच आहेस.”
  • सुफी मतातील बेक्ताशी विनोद
  • अमेरिकेचे मूलनिवासी, ऑस्ट्रेलियाचे आदिनिवासी आणि आफ्रिकेतील लोकसमूहांच्या पारंपरिक कथा

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. ^ Kerényi, Karoly, "Kore," in C.G. Jung and C. Kerényi, Essays on a Science of Mythology: The Myth of the Divine Child and the Mysteries of Eleusis. Princeton: Princeton University Press, 1963: pages 101-55.
  2. ^ David Steindl-Rast. The Mystical Core of Organized Religion. ReVision, Summer 1989. 12 (1):11-14. Council on Spiritual Practices Retrieved 29 October 2011
  3. ^ D.T. Suzuki. Mysticism: Christian and Buddhist. Routledge, 2002. ISBN 978-0-415-28586-5
  4. ^ Shunryu Suzuki. Zen Mind, Beginner's Mind. Shambhala. New edition 2011.
  5. ^ Louth, Andrew., The Origins of the Christian Mystical Tradition. Oxford: Oxford University Press, 2007. ISBN 978-0-19-929140-3.
  6. ^ King, Ursula. Christian Mystics: Their Lives and Legacies Throughout the Ages. London: Routledge 2004.
  7. ^ Fanning, Steven., Mystics of the Christian Tradition. New York: Routledge Press, 2001.
  8. ^ Michael R. Poll. Masonic Enlightenment - The Philosophy, History And Wisdom Of Freemasonry. Michael Poll Publishing, 2006.
  9. ^ S. N. Dasgupta. Hindu Mysticism. BiblioBazaar, 2009. ISBN 978-0-559-06989-5
  10. ^ K.A. Jacobson. Theory and Practice of Yoga, 2005. Page 10 and throughout.
  11. ^ Reynold A. Nicholson. Studies in Islamic Mysticism. Routledge. New edition 2001. ISBN 978-0-7007-0278-7
  12. ^ T.K. Tukol. Yoga, Meditation & Mysticism in Jainism (Shri Raj Krishen Jain memorial lectures). Shri Raj Krishen Jain Charitable Trust, 1978.
  13. ^ Elior, Rachel, Jewish Mysticism: The Infinite Expression of Freedom, Oxford. Portland, Oregon: The Littman Library of Jewish Civilization, 2007.
  14. ^ A.E. Waite. Rosicrucian Rites and Ceremonies of the Fellowship of the Rosy Cross by Founder of the Holy Order of the Golden Dawn. Ishtar, 2008. ISBN 978-0-9783883-4-8
  15. ^ Mohan Singh Uberoi. Sikh Mysticism. 1964.
  16. ^ Krishna Chattopadhyay. The world of mystics: A comparative study of Baul, Sufi and Sikh mysticism. R.K. Prakashan, 1993.
  17. ^ "Sikh Beliefs". God and the cycle of life. BBC. 24 September 2009. Retrieved 24 July 2012.
  18. ^ Harold D Roth. Original Tao: Inward Training (Nei-yeh) and the Foundations of Taoist Mysticism. Columbia University Press. New Edition, 2004. ISBN 978-0-231-11565-0
  19. ^ जलालुद्दीन रुमीच्या कविता http://www.poemhunter.com/i/ebooks/pdf/mewlana_jalaluddin_rumi_2004_9.pdf
  20. ^ Koun Yamada. The Gateless Gate: The Classic Book of Zen Koans. Wisdom Publications. New edition, 2005. ISBN 978-0-86171-382-0
  21. ^ Tao Te Ching. LinYutan version. Chapter 22, sentence 1. For other versions see TTC Compared
  22. ^ नसरुद्दीनच्या कथा http://en.wikibooks.org/wiki/Sufism/Nasrudin