शिंगॉन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शिंगॉन (真言宗) हा एक जपानी बौद्ध संप्रदाय आहे. हे जपानी बौद्ध धर्माच्या मुख्य प्रवाहातील प्रमुख प्रणालींपैकी एक आहे. वज्रबोधीअमोघवज्र यांसारख्या भटकत्या साधूंनी भारतातून चीनमध्ये नेलेल्या आणि तिसऱ्या-चौथ्या शतकापासून सुरू झालेल्या गोपनीय बौद्धमतांपैकी शिंगॉन एक आहे. कूकै या बौद्ध साधूच्या मार्गदर्शनाखाली नंतर जपानमध्ये या मताचा उत्कर्ष झाला. गोपनीय शिकवणीच्या प्रसारास परवानगी मागण्यासाठी कूकै तंग राजवटीच्या काळात चीनमध्ये गेला होता. त्याच्यामुळे या मताला जपानी गोपनीय बौद्धमत किंवा पारंपरिक गोपनीय बौद्धमत असेही म्हटले जाते. झेन्यान या चिनी शब्दावर बेतलेल्या "शिंगॉन" या संज्ञेचा अर्थ "सत्य शब्द" असा होतो. झेन्यान हा शब्द "मंत्र" या संस्कृत शब्दावर बेतलेला आहे.