Jump to content

हायकू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हायकू (जपानी: 俳句) हा एक जपानी भाषेतील काव्यप्रकार आहे. या प्रकारातील कविता तीन ओळींचीच असते व यांत ५-७-५ असे वर्ण असतात. या प्रकारच्या काव्यरचना इतर भाषांतही आढळतात.[]


निवडक प्रसिद्ध कवी

[संपादन]
प्रसिद्ध हायकू कवी[]
कवीकाळवैशिष्ट्य / योगदान
मात्स्यो बाशो१६४४–१६९४हायकू इतिहासातील सर्वात महान कवी. त्यांनी हायकुला एक स्वतंत्र आणि आध्यात्मिक कला म्हणून प्रतिष्ठा मिळवून दिली.
योसा बुसोन१७१६–१७८४ते एक चित्रकार आणि कवी होते. त्यांच्या हायकुमध्ये दृश्य सौंदर्य आणि चित्रमय वर्णन अधिक आढळते.
कोबायाशी इस्सा१७६३–१८२८सामान्य माणसाच्या वेदना, लहान प्राणी आणि कीटक यांच्यावर त्यांनी अत्यंत संवेदनशील हायकू लिहिले.
मासाओका शिकी१८६७–१९०२आधुनिक हायकूचे जनक. त्यांनी या काव्यप्रकाराला हायरू पासून वेगळे करून हायकू हे नाव दिले आणि त्याचे पुनरुज्जीवन केले.
चिओ-नी१७०३–१७७५जपानमधील सर्वात प्रसिद्ध महिला हायकू कवी. त्या निसर्ग आणि मानवी भावनांची सांगड घालत असत.
नात्सुमे सोसेकी१८६७–१९१६हे प्रामुख्याने कादंबरीकार. हजारो दर्जेदार हायकू लिहिले.
संतोका तानेदा१८८२–१९४०त्यांनी पारंपारिक ५-७-५ रचनेचे नियम मोडून मुक्त छंद हायकू लोकप्रिय केले.
रिचर्ड राइट१९०८–१९६०आफ्रिकन-अमेरिकन लेखक. यांनी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या काळात ४,००० पेक्षा जास्त इंग्लिश हायकू लिहिले.
एझ्रा पाउंड१८८५–१९७२पाश्चात्य जगाला हायकूच्या शैलीची ओळख करून देणाऱ्या इमेजिस्ट चळवळीचे ते प्रमुख कवी होते.
जॅक केरुआक१९२२–१९६९बीट जनरेशनचे लेखक. यांनी निसर्गा आणि शहरी जीवनाचे चित्रण करणारे अमेरिकन शैलीतील हायकू रचले.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "Haiku - Japanese poetry". Encyclopædia Britannica. ४ मार्च २०२६ रोजी पाहिले.
  2. "Haiku Society of America". HSA. ४ मार्च २०२६ रोजी पाहिले.