सुईच्या टोकावर किती देवदूत नाचू शकतात?

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सुईच्या टोकावर किती देवदूत नाचू शकतात? हा प्रश्न अनेकदा, विशेषतः मध्ययुगीन देवदूतवादाच्या खंडनासाठी आणि सामान्यतः स्कॉलास्टिक मताच्या खंडनासाठी वापरला जातो. डन्स स्कोटसथॉमस अ‍ॅक्विनास यासारख्या व्यक्तींवर टीका करण्यासाठीही हा प्रश्न विचारला जातो. "सुईच्या टोकावर किती देवदूत बसू शकतात?" अशाही स्वरुपात हा प्रश्न विचारला जातो. आधुनिक काळात कोणतेही व्यावहारिक मूल्य नसलेल्या गोष्टींवर व्यर्थ वेळ घालविण्याच्या प्रवृत्तीसाठी हा औपरोधिक प्रश्न विचारला जातो.