सतोरी
Appearance
साटोरी याच्याशी गल्लत करू नका.
सतोरी (चिनी: 悟; पिन्यिन भाषा: wù; कोरियन भाषा: 오 o; व्हिएतनामी भाषा: ngộ) ही प्रबोधनासाठीची किंवा ज्ञानोदयासाठीची जपानी भाषेतील संज्ञा आहे. झेन बौद्ध परंपरेत केन्शोचा निर्देश करण्यासाठी सतोरी ही संज्ञा वापरली जाते. केन्शो म्हणजे "स्वतःच्या वास्तव स्वरूपात पाहणे".
सतोरी आणि केन्शो यांना प्रतिशब्द म्हणून "एन्लायटनमन्ट" ही संज्ञा वापरली जाते. हीच संज्ञा बोधी, प्रज्ञा आणि बुद्धत्व यांच्या भाषांतरासाठीही वापरली जाते.