देवगिरीचे यादव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(यादव, देवगिरी या पानावरून पुनर्निर्देशित)
देवगिरीचे यादव साम्राज्य
सेऊण (यादव) साम्राज्य
Blank.png इ.स. ८५०१३३४ Blank.png


Asia 1200ad.jpg
राजधानी देवगिरी
शासनप्रकार राजतंत्र
अधिकृत भाषा मराठी
इतर भाषा कन्नड, महाराष्ट्री प्राकृत, संस्कृत

सेवुण/सेऊण राजवंश किंवा देवगिरीचे यादव (इ.स. ८५० - इ.स. १३३४) हे महाराष्ट्रातील प्राचीन शासक आहेत. यादवांचे साम्राज्य नर्मदा नदीपासून तुंगभद्रा नदीपर्यंत पसरले होते. यादवांचे राज्य महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक आणि मध्यप्रदेशाच्या काही भागात विस्तारलेले होते. सुरुवातीच्या काळात ते चालुक्यांचे अंतर्गत होते. नंतर ते स्वतंत्र झाले. राजा सिंघण (द्वितीय) आणि राजा महादेव यांच्या काळात या राज्याची भरभराट झाली.राजा रामदेवरावाला अल्लाउद्दिन खिलजीने पराभुत केले. व त्याचमुळे यादवांची महाराष्ट्रावरची सत्ता सम्पूष्टात आली.

पुस्तक[संपादन]

  • ’देवगिरीचे यादव : इतिहास संशोधक महामहोपाध्याय डॉ. ब्रह्मानंद देशपांडे यांनी महाराष्ट्रातील पराक्रमी अशा यादव राजवंशावर लिहिलेला हा एक ऐतिहासिक ग्रंथ आहे.

मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये आपल्या अजोड पराक्रमाने ४५० वर्षे महाराष्ट्राचे नाव झळकत ठेवणार्‍या कर्तबगार यादव राजांची सविस्तर ऐतिहासिक माहिती या ग्रंथात मिळते. भिल्लम, सेउणचंद्र, भिल्लम (पाचवा), जैतुगी (द्वितीय), सिंघणदेव (द्वितीय), कृष्णदेव, रामचंद्र अशा अनेक पराक्रमी यादवराजांची यशोगाथा या पुस्तकात वर्णिली आहे..