Jump to content

मेंढा (लेखा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मेंढा ‍लेखा हे गाव देशातील महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्हातील धानोरा तालुक्यात वसलेले गोंड आदिवासींचे मध्य भारतातील इतर गांवासारखेच एक लहानसे गाव आहे.एकूण १०५ घरे व ५५० लोकसंखा असलेले हे गाव गडचिरोली धानोरा हायवे रस्त्यावर धानोरा या तालुक्याचा गावापासून फक्त्त ४ कि.मी.अंतरावर व जिल्हाच्या ठिकाणापासून ३५ कि.मी. वर आहे.

  ?मेंढा(लेखा)

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
१९.३ चौ. किमी
• २३०.६५ मी
जवळचे शहर गडचिरोली
विभाग नागपूर
जिल्हा गडचिरोली
तालुका/के धानोरा
लोकसंख्या
घनता
लिंग गुणोत्तर
४७३ (२०११)
• २४/किमी
९६२ /
भाषा मराठी
स्वयंशासनासाठी लोकांनी दिलेली घोषणा
मेंढ्यातील ग्रामसभा

भौगोलिक स्थान व लोकसंख्या

[संपादन]

ग्रामपंचायत कार्यालय असलेले लेखा हे गाव याच्या सीमेला लागून आहे. या गावाचे क्षेत्रफळ १९३० हेक्टर असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात १०५कुटुंबे व एकूण ४७३ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर गडचिरोली ३० किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये २४१ पुरुष आणि २३२ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित महाराष् ४७३ लोक आहेत. ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५३८९८३[] आहे.

साक्षरता

[संपादन]
  • एकूण साक्षर लोकसंख्या: २९८
  • साक्षर पुरुष लोकसंख्या: १७० (५७%)
  • साक्षर स्त्री लोकसंख्या: १२८ (४३%)

शैक्षणिक सुविधा

[संपादन]

गावात दोन शासकीय शाळा आहेत. एक उच्च माध्यमिक शाळा, एक अगनवा पॉलिटेक्निक, व्यावसायिक प्रशिक्षण शाळा व पदवी महाविद्यालय धानोरा येथे तीन किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळील अभियांत्रिकी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय, व्यवस्थापन संस्था व अपंगांसाठी खास शाळा गडचिरोली येथे ३० किलोमीटर अंतरावर आहे.

वैद्यकीय सुविधा (शासकीय)

[संपादन]

सर्वात जवळील सामूहिक आरोग्य केंद्र ५ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील प्रसूति व बालकल्याण केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळचे क्षयरोग उपचार केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील ॲलोपॅथी रुग्णालय ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील पर्यायी औषधोपचार रुग्णालय ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील दवाखाना ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील पशुवैद्यकीय रुग्णालय ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील फिरता दवाखाना ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील कुटुंबकल्याण केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे.

पिण्याचे पाणी

[संपादन]

गावात नळाच्या पाण्याचा पुरवठा नाही. गावात सरकारी विहिरी पाच आहेत. दगडाने बांधलेले खाजगी विहिरी दोन आहेत.हॅन्डपंप तीन आहेत.सदर विहिरी मध्ये बाराही महिने पाणी असतो.

स्वच्छता

[संपादन]

गावात उघडी गटारव्यवस्था आहे. गावात सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध नाही.

ग्रामसभा

[संपादन]
ग्रामसभा मीटिंग

गावातील मतदार यादीतील सर्व प्रोढ स्त्री-पुरुषांची सभा म्हणजेच ग्रामसभा, गावाची ग्रामसभा लोकशाहीची तत्त्वे प्रत्यक्षात आणण्यासाठी कार्यरत आहे.[].[] ऐकायचे सर्वांचे ,पण करायचे तेच जे ग्रामसभा ठरवेल,असे ठरलेले आहे.ग्रामसभेत सर्व स्त्री -पुरुषांना आपले मत मांडण्याचा समान अधिकार आहे.निर्णय घेण्यासाठी ग्रामसबा व अभ्यास करण्यासाठी अभ्यास मंडळ अशा दोन स्वंतत्र्य रचना आहेत.अभ्यास मंडळात फक्त्त चर्चा करायची ,निर्णय घ्यायचा नाही,असेही ठरलेले आहे.अभ्यास मंडळ या मंडळातील सहभाग पूर्णपणे ऐच्छिक आहे.अभ्यास मंडळात गावाबाहेरील व्यक्त्तीही सहभागी होऊ शकतात.पण ग्रामसभेत नाही.सर्व लोक चर्चा करून ,सर्वाचे मत घेऊन सर्वसहमतीनेच निर्णय घेतात.कोणतीही व्यक्त्ती मग स्त्री असो की पुरुष ,गरीब असो की श्रीमंत सहमत नसेल तर तिच्यावर निर्णय लादत नाही.त्या व्यक्तीचे म्हणणेही कदाचित बरोबर असेल असे मानून सर्वसहमती होईपर्यत चर्चा सुरू राहते.ग्रामसभेत निर्णय होऊ शकला नाही तर त्यावर अभ्यास मंडळात पुन्हा चर्चा होते व कोणत्याही परिस्थितीत बहुमताने निर्णय घेत नाहीत.[]

दिल्ली मुंबईत आमचे सरकार, आमच्या गावात आम्हीच सरकार

[संपादन]

याच्या अर्थ ग़ावासबंधी काही ठरवायचे असेल ,निर्णय घ्यायच्या असेल तर गावातील सर्व स्त्री -पुरुष मीळून ठरवतील.आमच्या वतीने निर्णय घेण्याचा अधिकार कोणत्याही प्रतिनिधीला न देता तो आम्हीच वापरू म्हणजे आमच्या गावात आम्हीच सरकार पण एकापेक्षा जास्त्त गावांचा किंवा जिल्हा ,राज्य व् देशाचा प्रश्न असेल तर त्यासाठी आमच्या प्रतिनिधीला अधिकार देऊ .म्हणजेच - दि्ल्ली - ्मुंबईत आमचे सरकार[]

महाराष्ट्र ग्रामदान कायदा - १९६४

[संपादन]
ग्रामदान म्हणजे काय
[संपादन]

व्यक्त्तीच्या नावावर असलेली जमीन गावाच्या नावाने करणे ,त्यापैकी विसावा हिस्सा भूमिहिनांना वाटप करून उरलेली जमीन ज्याची त्यानेच कसणे,कसण्याच्या हक्क राहील,पण गावाबाहेर विकण्याची परवानगी राहणार नाही.जो मेहनत करायला तयार आहे,पण कसायला जमीन नाही ,असा कुणीही गावात राहु नये उत्पनातून चाळीसावा हिस्सा गाव फंडात जमा करणे.गावाचे ग्रामंडळ बनवून गावाचा कारभार गावानेच ग्राममंडळाच्या म्हणजेचे ग्रामसभेच्या माध्यमातुन सर्वसहमतीने निर्णय घेऊन चालवीणे हा ग्रामदानाचा अर्थ आहे.

ग्रामसभेचे सामुहिक फंड

१. धान्य कोष

गावातील प्रत्येक शेतकरी आपल्या शेतातील एकूण उत्पना तील 2.50% धान्य कोषात धान्य जमा करतात. मेन्ढा‍‍‍ लेखा येथे तीन मोहला समिती आहेत.त्याप्रमाणे धान्य कोष्याची व्यवस्थापन केले जाते.आणि मोह्ल्या प्रमाणे रेकार्ड ठेवला जातो. सदर गोळा केलेला धान्य गावातील कुंटुबाना अडीअडचणीचा वेळी उदा.शेती ,लग्न्न कार्य,नामकरण ,मयत इ.कामासाठी गावातील बचत गट मार्फत कर्ज म्हणून दिला जातो.यासाठी ग्रामसभेने धान्य कोष समिती स्थापन केली आहे.आणि समितीचे नावे भारतीय स्टेट बँक शाखा धानोरा येथे बचत खाते उघडलेले आहे.

२. १० टक्के रक्कम

[संपादन]

गावातील प्रत्येक कुंटुबातील मजूरी करणारी महिला किवा पुरु व्यक्त्ती गावाच्या हद्दीत केलेल्या कामाचे एकूण मजूरीतुन १० % रक्कम कोष्यात जमा करतात.व गरज पडल्यास शेती,शिक्षण, लग्न्न,मरण,नामकरण,इ.आवश्यक कामासाठी बचत गटामार्फत ग्रामसभेकडुन कर्ज म्हणून घेतले जातो. सदर काम करण्यसाठी ग्रामसभेने महिलांचे ग्राम कोष्य समिती स्थापन केली आहे.आणि समितीचे नावे भारतीय स्टेट बँक शाखा धानोरा येथे बचत खाते उघडलेले आहे.

निस्तार हक्क

[संपादन]

: व्यक्तिगत व सामूहिक

[संपादन]

‘आमच्या गावात आम्हीच सरकार, मुंबई-दिल्लीत आमचे सरकार’[] ही घोषणा देऊन ती प्रत्यक्षात आणणारे गाव, ही मेंढा (लेखा) गावाची ओळख आहे.[] गावाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असणाऱ्या या ग्रामसभेने, २००६ साली पारित झालेला ‘अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन-निवासी (वन हक्कांची मान्यता) अधिनियम, अर्थात वनाधिकार कायदा' व २००८ साली झालेले नियम[] अंमलात आणून शेत जमिनींवर व्यक्तिगत व जंगलावर सामूहिक वनहक्क प्राप्त केला. अशा प्रकारे गावाच्या परिसरातील वनावर सामूहिक हक्काचा दावा मान्य करून घेणारे मेंढा हे देशातील पहिले गाव ठरले. हा दावा दि.२८-८-२००९ रोजी मान्य झाल्यामुळे मेंढा गावाला गावाच्या पारंपरिक हद्दीतील एकूण १८०९.६१ हेक्टर वनाचे संवर्धन व व्यवस्थापन करण्याचा अधिकार मिळाला.[] दि.१५ डिसेंबर २००९ रोजी तत्कालीन राज्यपालांच्या हस्ते सामुहिक वनहक्क अभिलेख ग्रामसभेला देण्यात आला.

ग्रामसभेचा सामुहिक वनहक्क अभिलेख

रोजगार हमी योजना

[संपादन]

१९ एप्रिल २०१२ रोजी महाराष्ट्र राज्य शासनाने केलेल्या शासन निर्णयाद्वारे मेंढा(लेखा) या ग्रामसभेला सामुहिक वन्नहक्काच्या वनक्षेत्रात जल व मृद्संधारणाची कामे करण्यासाठी ‘पथदर्शी प्रकल्पांतर्गत महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेची[] (मनरेगा) अंमलबजावणी यंत्रणा’ म्हणून मान्यता मिळाली. ग्रामसभेला अशा प्रकारे अंमलबजावणी यंत्रणा म्हणून मान्यता मिळण्याचा मनरेगाच्या इतिहासातील पहिले उदाहरण आहे.[] रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामसभा मेन्ढा‍ ‍‍लेखा यांनी आतापर्यत बांबू रांझी जवळ जलशोषक चर खोदणे , अंतर्गत रस्ते,अस्थाई रोवाटीका ,मिश्र रोपवन,दगडी बंधारे ,मजगी, इ.कामे केलेले आहेत.

अहिंसक मध संकलन व प्रक्रिया केंद्र

[संपादन]

गावाजवळच्या जंगलात आग्या[१०] मधमाशांची पोळी आहेत. आग्या जातीच्या मधमाशा आकाराने मोठ्या असून तीक्ष्ण दंश करतात. गावातील युवकांचा बचत गट अहिंसक पद्धतीने पोळ्यातील मध काढण्याचे काम गेली २० वर्षे करत आहे. रात्रीच्या वेळी माशा शांत असताना संरक्षक पोशाख घालून पोळ्याच्या जवळ जाऊन मधाचा साठा असलेला भाग हळुवारपणे कापून घेतला जातो. यामुळे मधमाशांची वसाहत, अंडी व माशा सुरक्षित राहतात. पारंपरिक पद्धतीत धूर, आग करून माशांना इजा केली जाते. यामुळे मधमाशांच्या वसाहतींची संख्या अतिशय कमी होत चालली आहे. आधुनिक असे हे तंत्र विकसित करण्यासाठी गावाला वर्धा येथील 'सेंटर फॉर बी डेव्हलपमेंट' या संस्थेची मदत मिळाली. इतर गावातील लोकांनाही हा बचत गट प्रशिक्षण देत असतो. या तंत्रामुळे परिसरातील पोळ्यांचे प्रमाण वाढले आहे. माशा परागीभवन करत असल्याने शेती व जंगलातील उत्पादनात वाढ दिसून येत आहे.[११]
ग्रामसभेने गावात मध प्रक्रिया केंद्र उभे केले आहे. शास्त्रशुद्ध पद्धतीने मधाची प्रक्रिया व पॅकिंग करून तयार उत्पादन विविध आकाराच्या बाटल्यांमधून 'मेंढा हनी' या नावाने विकले जाते.

स्वयंसाहाय्यता महिला बचत गट

[संपादन]

बचत गटाचे नाव काम

[संपादन]

१.नर्मदा महिला बचत गट - धान्य,मोह , खरेदी करणे,

२.मॉं.दंतेश्वरी महिला बचत गट - तेलघाणी यंत्र चालविणे

३.आदिवासी महिला बचत गट - धान्य खरेदी करने

४.पेरसापेन महिला बचत गट - सध्या बचत करणे

५. गडमाता महिला बचत गट - सध्या बचत करणे

६.लक्ष्मी महिला बचत गट - राशन दुकान चालविणे

७.हितानाटांग वेलाह पेन महिला बचत गट - केरोसीन दुकान चालविणे

८. मंहानकाली पेन महिला बचत गट - चारोळी यंत्र चालविणे

गावातील वेगवेगळे समिती

[संपादन]

अ.क्र. समितीचे नाव

[संपादन]

१. बांबू व्यवस्थापन समिती ६. ग्रामसभा,मेन्ढा(लेखा) शेतकरी गट

२. सामुहिक वनहक्क व्यवस्थापन समिती ७.ग्रामसभा कोष्य समिती

3. ग्रामसभा,मेंढा(लेखा)एम.आर.ई.जीएस.कार्य.समिती

4. न्याय समिती

5. धान्य कोष्य समिती

तेंदूची पाने

संपर्क व दळणवळण

[संपादन]

सर्वात जवळील पोस्ट ऑफिस गावा पासून ४ कि.मी अतरावर धानोरा येथे आहे. सर्वात जवळील पोस्ट व तार ऑफिस ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. गावात . गावात मोबाईल फोन सुविधा उपलब्ध आहे. सुविधा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील खाजगी कूरियर १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे.
गावात शासकीय बस सेवा उपलब्ध आहे. सर्वात जवळील खाजगी बस सेवा १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील रेल्वे स्थानक १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील टॅक्सी ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. गावात ट्रॅक्टर उपलब्ध नाही.सर्वात जवळील ट्रॅक्टर १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. राष्ट्रीय महामार्ग गावाला जोडलेला नाही. सर्वात जवळील राष्ट्रीय महामार्ग१० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. राज्य महामार्ग गावाला जोडलेला आहे. जिल्यातील मुख्य रस्ता गावाला जोडलेला आहे. जिल्ह्यातील दुय्यम रस्ता गावाला जोडलेला आहे.

बाजार व पतव्यवस्था

[संपादन]

सर्वात जवळील एटीएम ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. गावात व्यापारी बँक नाही.सर्वात जवळील व्यापारी बँक ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील सहकारी बँक ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील शेतकी कर्ज संस्था ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. गावात स्वयंसहाय्य गट आहेत. गावात रेशन दुकान आहे. सर्वात जवळील आठवड्याचा बाजार ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे.

आरोग्य

[संपादन]

गावात एकात्मिक बाल विकास योजना पोषण आहार केंद्र व अंगणवाडी (पोषण आहार केंद्र) उपलब्ध आहे. गावात 'आशा' आरोग्य स्वयंसेविका आहे. सर्वात जवळील समाज भवन (टीव्ही सह/शिवाय)५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील क्रीडांगण ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील खेळ / करमणूक केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील चित्रपटगृह/व्हिडिओ केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील सार्वजनिक ग्रंथालय ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील सार्वजनिक वाचनालय ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील वृत्तपत्र पुरवठा ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील विधानसभा मतदान केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे. सर्वात जवळील जन्म व मृत्यु नोंदणी केंद्र ५ किलोमीटरहून कमी अंतरावर आहे.

घरगुती, शेती व व्यापारी उपयोगासाठी प्रतिदिवस १४ तासांचा वीजपुरवठा उन्हाळ्यात (एप्रिल-सप्टेंबर) व हिवाळ्यात (ऑक्टोबर-मार्च) उपलब्ध आहे.

जमिनीचा वापर

[संपादन]

मेंढा ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ):

  • वन : १७४१.६१
  • बिगरशेती वापरात असलेली जमीन: ८८.३९
  • कुरणे व इतर चराऊ जमीन: २३
  • पिकांखालची जमीन: ७७
  • एकूण कोरडवाहू जमीन: ५४.५३
  • एकूण बागायती जमीन: २२.४७

सिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ)

  • विहिरी / कूप नलिका: १.३५
  • तलाव / तळी: ५३.१८

उत्पादन

[संपादन]

मेंढा या गावी पुढील वस्तूंचे उत्पादन होते ( महत्त्वाच्या उतरत्या अनुक्रमाने): भात, बांबू, तेंदूपत्ता, मोहाची फुले, मध, डिंक, मासे

संदर्भ

[संपादन]
  1. ^ http://www.censusindia.gov.in/2011census/dchb/DCHB.html
  2. ^ "Paryavaran Vigyan". paryavaranvigyan. 2016-03-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 12 Oct 2020 रोजी पाहिले.
  3. ^ "सकाळ - लोकशाहीची खरी गोष्ट सांगणारं गाव". web.archive.org. 2016-03-06. 2016-03-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-10-12 रोजी पाहिले.
  4. ^ a b c "eSakal". web.archive.org. 2016-03-05. 2016-03-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-10-12 रोजी पाहिले.
  5. ^ "संग्रहित प्रत". 2020-08-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-12-26 रोजी पाहिले.
  6. ^ "संग्रहित प्रत". 2016-03-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-12-26 रोजी पाहिले.
  7. ^ "संग्रहित प्रत". 2020-09-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-12-26 रोजी पाहिले.
  8. ^ http://www.nrega.nic.in/netnrega/home.aspx
  9. ^ https://www.youtube.com/watch?v=OQUwFVMfAoc
  10. ^ https://en.wikipedia.org/wiki/Apis_dorsata
  11. ^ https://www.youtube.com/watch?v=RbCmI1dQwEI