Jump to content

मुंबई–हैदराबाद द्रुतगती रेल्वेमार्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मुंबई–हैद्राबाद द्रुतगती रेल्वेमार्ग या पानावरून पुनर्निर्देशित)
मुंबई–हैदराबाद द्रुतगती रेल्वेमार्ग
प्रकार द्रुतगती रेल्वे
प्रदेश भारत
स्थानके १०
मालक भारतीय रेल्वे
चालक राष्ट्रीय द्रुतगती रेल्वे महामंडळ मर्यादित
तांत्रिक माहिती
मार्गाची लांबी ७११ किमी (४४२ मैल)
गेज १४३५ मिमी स्टॅंडर्ड गेज
विद्युतीकरण २५ किलोव्होल्ट एसी
कमाल वेग ३२० किमी/तास
मार्ग नकाशा
मुंबई–हैदराबाद द्रुतगती रेल्वेमार्ग
नवी मुंबई Airport interchange Metro interchange
लोणावळा
पुणे
दौंड
अकलूज
पंढरपूर
सोलापूर
महाराष्ट्र
कर्नाटक
सीमा
गुलबर्गा
कर्नाटक
तेलंगाणा
सीमा
झहीराबाद
हैदराबाद

मुंबई–हैदराबाद द्रुतगती रेल्वेमार्ग हा भारताच्या आर्थिक केंद्र मुंबईला हैद्राबाद शहराशी जोडणारा नियोजित द्रुतगती रेल्वेमार्ग आहे. पूर्ण झाल्यावर, ते मुंबई-नागपूर द्रुतगती रेल्वेमार्ग आणि मुंबई-अहमदाबाद द्रुतगती रेल्वेमार्गासह भारतातील दुरागतो रेल्वे जाळ्यांपैकी एक असेल.[]

मुंबईचा समावेश असलेला हा भारतातील तिसरा द्रुतगती रेल्वेमार्ग प्रकल्प ठरला आहे, हा प्रकल्प दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ सध्याच्या १५ तासांवरून कमी होऊन केवळ साडेतीन तास असेल. हा मार्ग सध्या निर्माणाधीन असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडण्याची योजना आहे. विमानतळाव्यतिरिक्त, ते नवी मुंबईच्या मेट्रोशी आणि मुंबई पारबंदर प्रकल्पाशी जोडले जाणार आहे. []

स्थानक

[संपादन]

नियोजित स्थानके- नवी मुंबई, लोणावळा, पुणे, दौंड, अकलूज, पंढरपूर, सोलापूर, गुलबर्गा, झहीराबाद आणि हैद्राबाद.

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "JICA presents draft report on bullet train project to joint committee". timesofindia-economictimes. 2016-08-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-05-14 रोजी पाहिले.
  2. ^ "Mumbai-Hyderabad bullet train terminal could be at Navi Mumbai airport". Times of India. 27 December 2020.

बाह्य दुवे

[संपादन]

प्राथमिक अभ्यास Archived 2016-03-03 at the Wayback Machine.