Jump to content

शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मुंबई पारबंदर प्रकल्प या पानावरून पुनर्निर्देशित)
शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू
प्रकल्पाचा नकाशा
प्रकल्पाचे कल्पित चित्र
मार्ग वर्णन
देश भारत ध्वज भारत
लांबी २२ किलोमीटर (१४ मैल)
सुरुवात शिवडी, मुंबई
शेवट जवाहरलाल नेहरू बंदर
स्थान
शहरे मुंबई, नवी मुंबई
जिल्हे मुंबई शहर जिल्हा, रायगड जिल्हा
राज्ये महाराष्ट्र


मुंबई पारबंदर प्रकल्प (Mumbai Trans Harbour Link) किंवा शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू हा मुंबई महानगर क्षेत्रामधील एक प्रकल्प आहे. अरबी समुद्राच्या ठाणे खाडीवर २२ किमी लांबीच्या व भारतातील सर्वात मोठ्या पूलाद्वारे दक्षिण मुंबईमधील शिवडी भाग नवी मुंबईसोबत जोडला गेला आहे. हा मार्ग मुंबई–पुणे द्रुतगतीमार्गासोबत देखील जोडला आहे ज्यामुळे पुण्याहून दक्षिण मुंबईकडे वाहतूक सुलभ झाली. तसेच प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील दक्षिण मुंबईहून कमी अंतरात गाठता येते.

मुंबईला रायगड जिल्ह्यासोबत जोडणाऱ्या सागरी मार्गाची संकल्पना सर्वप्रथम १९६३ साली रचली गेली. महाराष्ट्र शासनाने ह्या प्रकल्पामध्ये सुरुवातीस फारसे स्वारस्य न दाखवल्यामुळे व राजकीय रस्सीखेचीमुळे हा प्रकल्प बासनातच राहिला. २०१२ साली केंद्रीय पर्वावरण मंत्रालयाने ह्या प्रकल्पास मंजूरी दिली. परंतु ह्या पूलामुळे येथील नैसर्गिक खारफुटी नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात होती. तसेच सध्या कोणत्याही प्रमुख खाजगी कंपनीने ह्या प्रकल्पामध्ये रस दाखवला नव्हता. ह्या कारणांस्तव ₹ ११,००० कोटी खर्च अपेक्षित असलेल्या मुंबई पारबंदर प्रकल्पाचे भविष्य अज्ञात होते.

बाह्य दुवे[संपादन]