माण नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
माण
इतर नावे माणगंगा
उगम कुळकजाई सीतामाई डोंगर
मुख माणदेश
ह्या नदीस मिळते माण
धरणे आंधळी धरण, राजेवाडी

माण नदी ही भारतातील एक नदी आहे. भीमा नदीच्या या उपनदीला माणगंगा असेही म्हटले जाते. माण ही महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातून वाहणारी पूर्ववाहिनी नदी असून तिचा उगम माण तालुक्यातील कुळकजाई परिसरातील सीतामाई डोंगररांगातून होतो. पुढे ती पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे भीमा नदीला मिळते. या नदीच्या काठी असलेल्या सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतील परिसराला माणदेश म्हणतात.

माणगंगा नदीवर ३२ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. नदीच्या एका काठाला उंच डोंगर, दुसऱ्या बाजूला खोल दरी, झाडाझुडपांनी नटलेला परिसर, पुरातन मंदिरे व औषधी वनस्पती होत्या. सद्य स्थितीतील नदी परिसर काटेरी झुडपांनी वेढला आहे. या नदीला कृष्णा नदीला जोडायचे काम चालू होते ते आता अपुरे राहिले आहे. टेंभू उपसा जलसिंचन योजना आशिया खंडातील सर्वात मोठी उपसा जलसिंचन योजना आहे.