महालक्ष्मी रेल्वे स्थानक
Appearance
महालक्ष्मी मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक | |
---|---|
फलक | |
स्थानक तपशील | |
पत्ता | मुंबई |
गुणक | 18°58′57″N 72°49′27″E / 18.98250°N 72.82417°E |
मार्ग | पश्चिम |
फलाट | २ |
इतर माहिती | |
विद्युतीकरण | होय |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | पश्चिम रेल्वे |
स्थान | |
|
महालक्ष्मी हे मुंबई शहराच्या परळ भागामधील एक रेल्वे स्थानक आहे. महालक्ष्मी स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावर स्थित आहे.
महालक्ष्मी रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला महालक्ष्मी घोडे शर्यत पटांगण आहे. येथे राष्ट्रीय दर्जाचे घोडे आणि घोडेस्वार अटीतटीच्या शर्यतीत भाग घेण्यासाठी भारतातील अनेक शहरातून दाखल होतात. अनेक नाट्य-सिनेकलावंत ह्यामध्ये हिरहिरीने भाग घेऊन बक्षिसाच्या रूपात अमाप पैसा कमावतात. येथे येणारे सिनेकलावंत त्यांच्या अत्याधुनिक वेशभूषेसाठी प्रसिद्ध असतात आणि त्यांच्या नवीन व आकर्षक वेशभूषांचे नवीन पिढीच्या समाजात अनुकरण केले जाते.
महालक्ष्मी | |||
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक: मुंबई सेंट्रल (लोकल) |
मुंबई उपनगरी रेल्वे:पश्चिम | उत्तरेकडचे पुढचे स्थानक: लोअर परळ | |
स्थानक क्रमांक: ६ | चर्चगेटपासूनचे अंतर: ५ कि.मी. |
जवळचे भाग
[संपादन]महालक्ष्मी मंदिर, महालक्ष्मी रेस कोर्सला जाण्याकरता येथे उतरावे.