मंगळागौर
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
मंगळागौर हे हिंदू धर्मातील एक व्रत आहे.[१] ते श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित महिलेने लग्नानंतर पहिली पाच वर्षे करावयाचे असते. यासाठी अशाच इतर नवविवाहितांनाही बोलावून सकाळी एकत्रित पूजा करतात व त्यानंतर रात्री जागरण करतात.
पूजा
[संपादन]सकाळी स्नान करून पूजा करण्यात येते.त्यात मंगळागौर म्हणजे पार्वतीची धातूची मूर्ती (बहुधा, अन्नपूर्णा या पार्वतीच्या रूपाची) मांडण्यात येते. शेजारी महादेवाची पिंडही ठेवतात.मंगळागौरीची षोडषोपचारपूजा करतात.[२] मग आरती करून प्रसाद वाटला जातो. त्यानंतर पूजेसाठी आलेल्या सवाष्णींचे भोजन होते. श्री शिव आणि पार्वती हे आदर्श गृहस्थाश्रमाचे उदाहरण मानले जाते.
पत्री पूजा
[संपादन]वेगवेगळ्या झाडांच्या पत्री (पाने) व फुले या पूजेत वापरली जातात. ही झाडे औषधीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची म्हणून आयुर्वेदात मानली गेली आहेत अर्जुनसादडा, आघाडा, कण्हेर, चमेली, जाई, डाळिंब, डोरली, तुळस, दुर्वा, धोत्रा, बेल, बोर, माका, मोगरा, रुई, विष्णूक्रांता, शमी, शेवंती वगैरे झाडांची पाने या कामाला येतात. पूजा करतांना १६ प्रकारच्या पत्री देवीला अर्पण केल्या जातात.[३]
मंगळागौरीच्या वेळी खेळण्यात येणारे खेळ
[संपादन]जागरणाच्या वेळी, विविध खेळ खेळण्याचा प्रघात आहे. खेळांमध्ये परंपरागत चालत आलेली गाणीही म्हणतात - लाट्या बाई लाट्या सारंगी लाट्या, अठूडं केलं गठूडं केलं आदी गाणे म्हणण्यात येतात.[४] नऊवारी लुगडे नेसून व नाकात नथ, पारंपरिक दागिने घालून हे व्रत करण्यात येते.वटवाघूळ फुगडी, बस फुगडी, तवा फुगडी, फिंगरी फुगडी, वाकडी फुगडी, आगोटापागोटा, साळुंकी, गाठोडे, लाटा बाई लाटा, घोडा हाट, करवंटी झिम्मा, टिपऱ्या, गोफ, सासू-सून भांडण, अडवळ घुम पडवळ घुम, सवतीचे भांडण, दिंड, घोडा - इत्यादी. असे साधारणतः ११० प्रकारचे खेळ यात खेळले जातात.यात सुमारे २१ प्रकारच्या फुगड्या, ६ प्रकार आगोटा पागोट्याचे असतात.[५]
या सर्व खेळ प्रकारांमुळे शरीराच्या विविध अवयवांना व्यायाम होतो हा हे खेळ खेळण्याचा मुख्य उपयोग सांगता येईल. पूर्वीच्या काळी केवळ घरातील कामे करणा-या महिलांना या खेळातून आनंदही मिळे. हे खेळ खेळताना महिला त्याजोडीने गाणीही म्हणतात.मंगळागौर हे व्रत कष्टाचे, दमणुकीचे नसून चापल्य देणारे, चैतन्य देणारे व सामुहिक जीवनाचा आनंद देणारे आहे.[६]
संदर्भ
[संपादन]- ^ Trivedi, Mridual; Trivedi, T. P. (2007). Vaivahik Vilamba Ke Vividh Aayam Evam Mantra (हिंदी भाषेत). Motilal Banarsidass Publishe. ISBN 978-81-208-2250-4.
- ^ "महिलांसाठी खास क्षण आला मंगळागौरीचा सण, जाणून घ्या पूजाविधी आणि महत्व". Maharashtra Times. 2022-08-09 रोजी पाहिले.
- ^ "गणपतीला वाहण्यात येणाऱ्या पत्रींचे आयुर्वेदीक महत्व माहित आहे का?". Loksatta. 2022-08-09 रोजी पाहिले.
- ^ "Mangalagaur Khel 2022: मंगळागौरीचे खेळ खेळण्यासाठी साळुंकी, गाठोडे, लाटा बाई लाटासह खेळाचे इतर प्रकार जाणून घ्या, पाहा व्हिडीओ | 🙏🏻 LatestLY मराठी". LatestLY मराठी. 2022-08-02. 2022-08-09 रोजी पाहिले.
- ^ "लोकमत नागपूर- ई - पेपर- दिनांक ११-८-२०१३ पान क्र. ८". 2013-10-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-08-11 रोजी पाहिले.
- ^ "Nashik : चला गं... मंगळागौरीचा करूयात जागर ! | latest marathi News". eSakal - Marathi Newspaper. 2022-08-09 रोजी पाहिले.