शेवंती
शेवंती
शेवंती मुळची आशिया आणि युरोप या देशामधील आहे शेवंती फुले विविध रंगाची असतात.शेवंती हे एक सुगंधी फूल आहे, त्याच्या झाडालाही शेवंती म्हणतात. पुदिण्याच्या वर्गातले हे झाड अतिथंड प्रदेशांपासून ते गरम हवेतही वाढते.शेवंतीच्या फुलांच्या वेण्या केसांत माळायची जुनी पद्धत आहे.
उपयोग :- गौरी, नवरात्रांत देवींना शेवंतीची फुले आणि वेण्या वाहिल्या जातात.
लागवड
[संपादन]जमीन :- हलक्या ते मध्यम प्रकारची पोयट्याची , पाण्याचा उत्तम निचरा होणारी , सामू 6.5 ते 7.0 असलेली जमीन निवडावी.
शेेेणखत :- हेक्टरी 30 टन .
पूर्व मशागत :- आडवी - उभी नांगरट करून आणि वखराच्या 2 ते 3 पाळ्या देऊन शेणखत मिसळून घ्यावे.
सुधारित वाण :- झिप्रि, राजा, पांढरी रेवडी, पिवळी रेवडी, सोनाली तारा, सिलेक्शन - ४ , बग्गी, शरदमाला, इंदिरा .
लागवडीची वेळ :- पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणी एप्रिल - मे व पावसाच्या पाण्यावर लागवड करावयाची असल्यास जून - जुुलै.
लागवडीचे अंतर :- 30 × 30 से.मी
हेक्टरी रोपांची संख्या :- 1,11,111
खत मात्रा :- 300kg नत्र : 240kg स्फुरद : 200kg पालाश , पीक लागवडी पूर्वी स्फुरद व पालाशची पूर्ण मात्रा तर नत्र दोन समान हप्त्यात विभागून द्यावे .
अंतर मशातग :- वेळोवेळी खुरपणी करून शेत भुसभुशीत ठेवावे.
पाणी व्यवस्थापन :- कळ्या व फुले उमळण्याच्या काळात पाण्याचा ताण पडू देऊ नये . जमिनीच्या मगदुराप्रमाणे व पिकाच्या वाढीनुसार पाणी द्यावे.
पीक संरक्षण :- 1) पानावरील ठिपके या रोगाच्या नियंत्रणासाठी 10 ली. पाण्यात 26 ग्रॅम डायथेन एम- 45 पीकावर फवारावे . 2) रोपांची मर या रोगाच्या नियंत्रणासाठी झाडाच्या मुळांशी डायथेन एम-45 या बुरशीनाशकाचे 0.2% तीव्रतेचे द्रावण ओतावे (ड्रीचिंग करावी). 3) भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी 10 ली. पाण्यात 6 ग्रॅम डायथेन एम-45 मिसळून फवारणी करावी. 4) तांबेरा रोगाच्या नियंत्रणासाठी 10 ली. पाण्यात 6 ग्रॅम कॅरथेन मिसळून फवारणी करावी .
काढणी :- लागवडीनंतर पाच ते सहा महिन्यांनी फुले लागतात. कटफ्लॉवरसाठी काढणी करावयाची असल्यास दांड्या सहित फांद्या तोडाव्यात . व्यवस्थापन,खते व पाणी आणि जात यावर उत्पादन अवलंबून असते .
उत्पन्न :- सरासरी हेक्टरी 6 ते 10 हजार किलो फुले मिळतात.
इतर भाषांत नावे
[संपादन]या फुलाला आणि त्याच्या रोपाला इतर भाषांत अशी नावे आहेत. :
- इंग्रजी : क्रिसँथमम किंवा मम्स
- कानडी :
- गुजराती :
- संस्कृत :
- हिंदी :शेवंती
चित्रदालन
[संपादन]हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |