रुई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रुईचे झाड
रुईची पाने
जांभळ्या रुईची फुले
पांढर्‍या रुईची फुले


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

ही एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.या झाडाचे पान तोडल्यानंतर यातुन दुध सद्रुश्य चिकट पातळ पदार्थ निघतो. रुई हा वृक्ष हनुमान या देवतेचा आवडता वृक्ष आहे. याच्या फुलांची माळ करून ती हनुमानास अर्पण करतात. पायात कांटा/काचेचा बारीक तुकडा/शिळक गेली असता याचे दुध लावल्यावर ती जागा पिकत नाही व कांटा लवकर आपोआप बाहेर येतो.

प्रकार[संपादन]

या झाडात दोन प्रकार आहेत. एक जांभळ्या फुलाची रुई व दुसरी पांढर्‍या फुलाची रुई. जांभळ्या फुलाची रुई सर्वत्र आढळते. पांढर्‍या फुलाची रुई क्वचितच सापडते. पांढर्‍या फुलाच्या रुईला 'मांदार' असेही नाव आहे. या १२ वर्षे वयापेक्षा जास्त वयाच्या वृक्षाच्या मुळाशी गणपतीचा आकार तयार होतो असा जुना समज आहे.[ संदर्भ हवा ]

हा श्रवण नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.