भाकरी
भाकरी हा महाराष्ट्रातील प्रमुख अन्नपदार्थ आहे.[१] महाराष्ट्रात भाकरी करण्याच्या विविध पद्धती दिसून येतात.[२] भाकरी हा आहारदृष्ट्या शरीरासाठी पौष्टिक अन्नपदार्थ मानला जातो.[३]
पाककृती
[संपादन]पारंपरिकदृष्ट्या ज्वारी/ बाजरी/ नाचणी /तांदूळ यांपासून बनवलेली ज्वारी/ बाजरी/ नाचणीचे पीठ पाण्यात भिजवून, त्याचे छोटे गोळे बनवून, हाताने गोलाकार थापून भाकरी तव्यावर काही काळ भाजली जाते.[१] तव्यावर भाजत असताना भाकरीला पातळ पापुद्र्यासारखा पदर सुटण्यासाठी एका बाजूला पाण्याचा हात लावला जातो.[२] काही काळानंतर भाकरी तव्यावरून काढून चुलीच्या जाळावर भाजली जाते. मातीच्या तव्यावर भाजलेली भाकरी उत्कृष्ट समजली जाते.
खाण्याच्या पद्धती
[संपादन]छोट्या आकाराच्या भाकरीस पानगे म्हणतात. गरम भाकरीचा पदर फाडून त्यात लोणकढे तूप व मीठ लावल्यास भाकरी रुचकर लागते. दूध, विविध भाज्या, पालेभाज्या, कोशिंबीर, ठेचा इत्यादींसमवेत भाकरी खाल्ली जाते पण विशेषतः पिठ्ल्याबरोबर भाकरी खाल्ली जाते.
अन्य
[संपादन]ज्वारीच्या पिठात डाळीचे पीठ मिसळून धपाटे व थालीपीठ हे खाद्यपदार्थ बनतात.सोलापुरातील ज्वारीची कडक भाकरी प्रसिद्ध आहे. कोकणात तांदळाच्या पिठाची भाकरी केली जाते.[४] झुणका भाकरी हा महाराष्ट्रातील आवडीचा पदार्थ आहे.[५]
संदर्भ
[संपादन]- ^ a b Kapoor, Sanjeev; Kapoor, Alyona (2005). Konkan Cookbook (इंग्रजी भाषेत). Popular Prakashan. ISBN 978-81-7991-216-4.
- ^ a b Khandekar, Saee Koranne- (2019-10-31). Pangat, a Feast: Food and Lore from Marathi Kitchens (इंग्रजी भाषेत). Hachette India. ISBN 978-93-88322-92-8.
- ^ Salunkhe, D. K. (1984). Nutritional and Processing Quality of Sorghum (इंग्रजी भाषेत). Oxford & IBH Publishing Company.
- ^ Dandekar, Vaidya Suyog (2013-09-01). Ruchkar Tarihi Pathyakar Pakkruti. Sukrut Prakashan, Pune. ISBN 978-81-909746-9-1.
- ^ Desāī, Raṇajita (1990). Mekha mogarī. Mehatā Pabliśiṅga Hāūsa.