भोगी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भोगी
तामिळनाडूतील भोगी
अधिकृत नाव भोगी
साजरा करणारे दक्षिण भारत, श्रीलंका, सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया तील हिंदू [१]
प्रकार हंगामी, पारंपारिक
महत्त्व संक्रांतीच्या अगोदरचा दिवस
दिनांक हिंदू सौर दिनदर्शिका मार्गशीर्ष महिन्यात
यांच्याशी निगडीत मकर संक्रांत
बिहू (तमिळमध्ये भोगली / भोगी)
लोहरी

भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात.[२] हा सण मार्गशीर्ष महिन्यात येतो. ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार, हे सहसा १३ जानेवारी रोजी साजरे केले जाते. हा सण तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.[३][४][५][६] भोगी आणि मकरसंक्रांत हे कृषीशी संबंधित सण आहेत.[७]

स्वरूप[संपादन]

भोगी हा उपभोगाचा सण होय असे मानले जाते.[८] या दिवशी स्त्रिया अभ्यंगस्नान करतात. तमिळनाडूमध्ये संक्रांतीच्या आधी तीन दिवस पोंगल नावाचा उत्सव साजरा करतात.[९] त्यातल्या पहिल्या दिवसाला ‘भोगी पोंगल’ असे म्हणतात. या दिवशी उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या देवराज इंद्राची पूजा केली जाते.[१०][११]

भोगी वर, लोक जुन्या आणि दुर्लक्षित गोष्टी टाकून देतात आणि नवीन गोष्टींवर लक्ष केंद्रित करतात ज्यामुळे बदल किंवा परिवर्तन होते. पहाटेच्या वेळी, लोक लाकूड, इतर घन-इंधन आणि घरातील लाकडी फर्निचरसह शेकोटी पेटवतात जे यापुढे उपयुक्त नाहीत. हे वर्षाच्या खात्यांची समाप्ती आणि दुसऱ्या दिवशी कापणीच्या पहिल्या दिवशी नवीन खात्यांची सुरुवात दर्शवते.[१२][१३][१४]

आहार[संपादन]

यावेळेस मटार, गाजर, वांगी, तीळ आदी पीक विपुल प्रमाणात तयार होते. त्यामुळे या कालखंडात मिळणाऱ्या सर्व भाज्या एकत्र करून, त्यात तिळाचे कूट घालून भाजी तयार करतात.[१५] तीळ लावून बाजरीची भाकरी करतात. ती लोण्यासह खातात. विशेषत्वाने, मुगाच्या डाळीची खिचडीही या दिवशी केली जाते.[१६]

आहारातील महत्त्व[संपादन]

बाजरी आणि तीळ हे दोन्ही उष्ण गुणधर्माचे पदार्थ आहेत. थंडीच्या काळात शरीराला उष्णता मिळवून देण्यासाठी भोगीच्या दिवशी या पदार्थांचा जेवणात विशेष समावेश केला जातो.[८]

भारताच्या विविध राज्यात[संपादन]

दक्षिण भारतात विशेषतः भोगी पंडीगायी नावाने हा दिवस साजरा केला जातो. तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यात विविध नावांनी साजरा केला जातो. मत्तू पोंगल,कान्नुम पोंगल अशी याला नावे आहेत.[१७]

हे देखील पहा[संपादन]

चित्रदालन[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ https://books.google.co.in/books?id=QHwcAgAAQBAJ&pg=PA45&dq=bhogi+festival&hl=en&newbks=1&newbks_redir=1&sa=X&ved=2ahUKEwj0mKfQlq71AhUxT2wGHcolBhkQ6AF6BAgLEAI
  2. ^ "संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी; त्यानिमित्ताने करतात खास पारंपरिक मेन्यू!". लोकमत. 2023-01-09. 2023-01-13 रोजी पाहिले.
  3. ^ "Bhogi 2022: What Bhogi Means? How Is It Celebrated?". Sakshi Post (इंग्रजी भाषेत). 2022-01-11. 2022-01-13 रोजी पाहिले.
  4. ^ Srih, Sri Sri Rangapriya Sri (2019-03-23). Festivals of Bharata (इंग्रजी भाषेत). Bharatha Samskruthi Prakashana. ISBN 978-93-89028-69-0.
  5. ^ Reje, Shailaja Prasannakumar (1968). Mādheracā āhera.
  6. ^ Gupta, C. Dwarakanath (1999). Socio-cultural History of an Indian Caste (इंग्रजी भाषेत). Mittal Publications. ISBN 978-81-7099-726-9.
  7. ^ Fieldhouse, Paul (2017-04-17). Food, Feasts, and Faith: An Encyclopedia of Food Culture in World Religions [2 volumes] (इंग्रजी भाषेत). ABC-CLIO. ISBN 978-1-61069-412-4.
  8. ^ a b "मकरसंक्रांत स्पेशल : जाणून घ्या 'भोगी'चे महत्त्व". आपलं महानगर. १३ जानेवारी २०२०. १३ जानेवारी २०२० रोजी पाहिले.
  9. ^ Meliner, Gwenhaël Le (1992). The Pongal Festival in Tamil Nadu (इंग्रजी भाषेत). éditeur inconnu.
  10. ^ जोशी, होडारकर, महादेवशास्त्री, पद्मजा (२००१). भारतीय संस्कृती कोश खंड सहा. भारतीय संस्कृतिकोश मंडळ प्रकाशन.
  11. ^ नवभारत टाइम्स (१०. १. २०१९). "जानें क्या है भोगी पोंगल, किस देवता को समर्पित है यह पर्व". |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  12. ^ "About Bogi Festival | Bhogi Festival | Bhogi Celebrations". 1 January 2017.
  13. ^ "bhogi pandigai: Bhogi Pandigai 2022: Check date, time & significance of Bhogi Pandigai - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2022-01-13 रोजी पाहिले.
  14. ^ "Citizens speak about the change they would want to see this Bhogi". The Hindu (इंग्रजी भाषेत). 2020-01-13. ISSN 0971-751X. 2022-01-13 रोजी पाहिले.
  15. ^ "'न खाई भोगी तो सदा रोगी' जाणून घ्या भोगीचे महत्त्व ,भाजी सर्वकाही एका क्लिकवर". टीव्ही९ मराठी. 2022-01-13. 2023-01-13 रोजी पाहिले.
  16. ^ Maharashtra (India) (1969). Maharashtra State gazetteers (इंग्रजी भाषेत). Directorate of Government Print., Stationery and Publications, Maharashtra State.
  17. ^ "When Is Bhogi Pandigai 2023? Know History, Significance, Rituals and Celebrations Related To The First Day Of Pongal Festival". LatestLY (इंग्रजी भाषेत). 2023-01-12. 2023-01-13 रोजी पाहिले.