Jump to content

भिवापूर तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?भिवापूर

महाराष्ट्र • भारत
—  तालुका

भिवापूर  —

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
हवामान
तापमान
• उन्हाळा
• हिवाळा


• ४७ °C (११७ °F)
• १५ °C (५९ °F)
मोठे शहर नागपूर
जवळचे शहर नागपूर
लोकसंख्या
साक्षरता
• पुरूष
• स्त्री
१,००,००० (2011)
७३.१२ %
• ७० %
• ६५ %
भाषा मराठी
संसदीय मतदारसंघ रामटेक
तहसील भिवापूर भिवापूर
पंचायत समितीभिवापूर भिवापूर
कोड
पिन कोड
दूरध्वनी

• 441201
• +०७१०६

भिवापूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. हा तालुका मिरचीच्या उत्पादनात आघाडीवर आहे.

प्रास्ताविक

[संपादन]

भिवापूर नाव हे तेथे असलेल्या गव तलावात खोदकाम करतांना कोरीव दगडी बिम(आर्च)सापडले, त्यावरून आधी बिमापुर नंतर बिवापुर कालांतराने भिवापुर हे नाव रुढ झाले. गावात भिमादेवीचे मंदिर असल्याने आख्यायिकेनुसार भिमापुर नावाचा अपभ्रंश भिवापूर असा झाला असा समज आहे. ह्या मंदिरात असलेल्या मातेची मुर्ती तलाव खोदकामात मिळाल्यामुळे तीची पदस्थापना ही सध्या असलेल्या जागेवर स्थापित करून गावातील भाविक मोठ्या श्रद्धेने पुजा करतात. नवरात्रीमध्ये ह्या ठिकाणी फार मोठी यात्रा भरते. आसपासच्या जिल्ह्यांतले लोक या यात्रेला येतात.

तालुक्यातील गावे

[संपादन]
  1. आड्याळ
  2. आकलाबोडी
  3. आलेसूर
  4. बेल्लारपार
  5. बेसूर
  6. भागेबोरी
  7. भगवानपूर(भिवापूर)
  8. भिवी
  9. भिवापूर
  10. भोवरी(भिवापूर)
  11. भुमकोटरगाटा
  12. बोपेश्वर
  13. बोर्डकाला
  14. बोर्डखुर्द
  15. बोरगाव (भिवापूर)
  16. बोटेझरी
  17. चारगाव (भिवापूर)
  18. चिचाळा (भिवापूर)
  19. चिखलापार
  20. चिखली (भिवापूर)
  21. चोरविहारा
  22. धामणगाव (भिवापूर)
  23. धनजीमेट
  24. धापरळा
  25. धर्मापार
  26. डोंगरगाव (भिवापूर)
  27. गाडेघाट (भिवापूर)
  28. गारदापार
  29. घाटुमरी
  30. गोहोडळी
  31. गोंदबोरी
  32. हातीमुंडा
  33. हत्तीबोडी
  34. इंदापूर (भिवापूर)
  35. जांभुरडा
  36. जामगाव (भिवापूर)
  37. जावळी (भिवापूर)
  38. जावराबोडी
  39. कळंद्री
  40. कान्हळगाव (भिवापूर)
  41. कावडासी
  42. कारगाव (भिवापूर)
  43. केसळापूर (भिवापूर)
  44. खैरगाव (भिवापूर)
  45. खैरी (भिवापूर)
  46. खांडाळझरी
  47. खापरी (भिवापूर)
  48. खारकडा
  49. खाटखेडा (भिवापूर)
  50. खोलदोडा
  51. खुरसापार (भिवापूर)
  52. किन्हाळा (भिवापूर)
  53. किन्हीकळा
  54. किन्हीखुर्द
  55. किताडी
  56. कोलारी
  57. कोंडापूर
  58. लोणारा
  59. महादापूर (भिवापूर)
  60. महालगाव (भिवापूर)
  61. माळेवाडा
  62. मांडवा (भिवापूर)
  63. मांगळी (भिवापूर)
  64. मंगरुड
  65. माणकापूर (भिवापूर)
  66. मनोरा (भिवापूर)
  67. मारूपार
  68. मेढा (भिवापूर)
  69. म्हाशाडोंगरी
  70. मोखाळा
  71. मोखेबर्डी
  72. मुऱ्हारपूर
  73. नाड (भिवापूर)
  74. नागतारोळी
  75. नक्षी
  76. नंद (भिवापूर)
  77. नंदीखेडा
  78. नवेगाव (भिवापूर)
  79. नेरी (भिवापूर)
  80. पाहमी
  81. पांढराबोडी
  82. पांढरवणी (भिवापूर)
  83. पांजरेपार
  84. पारसोडी (भिवापूर)
  85. पवारगावडी
  86. पेंढारी (भिवापूर)
  87. पिंपळगाव (भिवापूर)
  88. पिपारडा
  89. पिरवा
  90. पोळगाव
  91. पुल्लर
  92. रानमांगली
  93. रोहाणा (भिवापूर)
  94. सायगाव (भिवापूर)
  95. साकारा (भिवापूर)
  96. साळेभट्टी (भिवापूर)
  97. साळेशहरी
  98. सारंडी
  99. सावरगाव (भिवापूर)
  100. सेलोटी
  101. शिवणफळ (भिवापूर)
  102. शिवापूर (भिवापूर)
  103. सोमनाळा (भिवापूर)
  104. सोनेगाव (भिवापूर)
  105. सोनेपाडा
  106. सुकळी (भिवापूर)
  107. टाक
  108. टास
  109. तातोळी
  110. थुटणबोरी
  111. तिडकेपार टुकुमबोरी
  112. उखळी
  113. उरकुडपार
  114. विरखंडी
  115. वाडधा (भिवापूर)
  116. वाकेश्वर (भिवापूर)
  117. वणी (भिवापूर)
  118. वसी
  119. वेळवा
  120. येडसंभा
  121. झामकोळी
  122. झिलबोडी

शाळा महाविद्यालये

[संपादन]

भिवापूरमध्ये चार हायस्कुले व दोन महाविद्यालये आहेत. त्यापैकी भिवापुर एज्युकेशन सोसायटीची शाळा ही सर्वात जुनी शाळा आहे. या गावात एक सरकारी आयटीआय देखील आहे. भिवापूरचे विद्यार्थी जिल्ह्यात सर्वात हुशार समजले जातात. अनेक मोठ्या सरकारी पदावर देशातील विविध भागात या गावातील नागरिक काम करतात. शिक्षक या पदावर काम करणारे नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे हे या गावाचे विशेष होय.

प्रेक्षणीय ठिकाणे

[संपादन]

भिवापूरच्या जवळ रानाळा हे निसर्गरम्य स्थळ आहे. विशेषतः हिवाळ्यामध्ये लोक येथे जातात. पण सध्या उमरेड करण्डला अभयारण्य झाल्याने येथे लोकांना जाण्यास परवानगी नाकारली जाते पण तेथे एक पौराणिक मंदिर राणीमाताचे असल्याने जंगल विभागाच्या मदतीने जाता येते. शिवाय, उदासीन मठ, बस स्टॅंङ, राधाकृष्ण मंदिर, रामधन चौक, विठ्ठल मंदिर, कुंभारपुरा, श्री गणेश मंदिर भिवापुर गणेश चौक इत्यादी अन्य रमनिय ठिकाणे आहेत. भिमामाता मंदिर हे विशेष जागृत देवस्थान भिवापूर नगरीत आहे.

शेतीची उत्पादने

[संपादन]

भिवापूरच्या आसपासच्या गावांतही मिरचीचे उत्पादन होते. या क्षेत्रात प्रसिद्ध अशा 'वायगाव' हळदीचे उत्पादन होते. वायगाव हळद तिच्यातील 'क्युरकुमिन' या विशेष घटकामुळे प्रथम क्रमांकावर आहे, असा मुंबई मसाला बोर्डाचा अभिप्राय आहे.

व्यवसाय

[संपादन]

भिवापूर या गावी मिरची 'फुलकट' करण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात होतो. फुलकट म्हणजे मिरचीची देठे तोडणे. या कामासाठी आंध्र प्रदेश राज्यातूनही येथे मिरची येते. भिवापूरहून मिरची व हळद विदेशातही जाते. इथले कामगार तिखट मिरची हाताळण्यात वाकबगार आहेत.भिवापूर नगरीत जवळपास १० ते १५ मिरची केंद्रे आहेत.

नगरपंचायत

[संपादन]

२०१५ पूर्वी भिवापूर शहरात ग्राम पंचायत अस्तित्वात होती पण २०१५ या वर्षी प्रथमच नगर पंचायत अस्तित्वात आली एकूण १७ नगरसेवक असलेल्या नगरपंचायत मध्ये सर्वप्रथम नगराध्यक्ष होण्याचा मान लव परमानंद जनबंधू (भारतीय राष्ट्रीय कांग्रेस) तसेच उपनगराध्यक्ष म्हणून श्री. शंकर राजाराम दडमल (शिवसेना) यांना मिळाला.

उद्योग

[संपादन]

भिवापूर नगरीत अनेक दशकांपासून एकमेव असा नोगा जूस कारखाना आहे. नवीन ओद्योगिक परिसरात काही छोटे मोठे उद्योग चालू झाल्याने ओद्योगिक परिसराला महत्त्व आले असले तरी मोठा असा उद्योग भिवापूर नगरीत नसल्याने विकास पाहिजे त्या प्रमाणात होऊ शकला नाही. मिरची हा येथील खूप प्रसिद्ध असलेला व्यवसाय असून मिरची या पिकावरील प्रक्रिया असलेलें एखादे मोठे उद्योग या शहरात किव्हा जवळपास असायला हवे होते. भिवापूर शहराला लागुनच तास परीसरात एक औद्योगिक वसाहत निर्माण झालेली असून ती शाश्नानेच तयार केलेली आहे. त्यात हळुवार का होईना पण छोटे उद्योग सुरू होत आहेत. बेकरी कारखाना तसेच कापूस उद्योग कारखाना व लोखंडी शेतीची अवजारे तयार करण्याचा कारखाना या वसाहतीत सुरू झाला आहे.

भौगोलिक स्थान

[संपादन]

हवामान

[संपादन]

लोकजीवन

[संपादन]

प्रेक्षणीय स्थळे

[संपादन]

नागरी सुविधा

[संपादन]

जवळपासचे तालुके

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate
नागपूर जिल्ह्यातील तालुके
नागपूर शहर तालुका | नागपूर ग्रामीण तालुका | सावनेर तालुका | कळमेश्वर तालुका | नरखेड तालुका | काटोल तालुका | पारशिवनी तालुका | रामटेक तालुका | हिंगणा तालुका | मौदा तालुका | कामठी तालुका | उमरेड तालुका | भिवापूर तालुका | कुही तालुका