कथकली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
केरळमधील टेकाडी येथील कथकलीचे सादरीकरण

कथकली किंवा कथकळि ही केरळ राज्यातील नृत्यशैली आहे.[१] कथा याचा अर्थ आहे गोष्ट आणि कलीचा अर्थ आहे खेळ.

स्वरूप[संपादन]

अभिनय, नृत्य आणि नाट्य अशा तीन कलांच्या समन्वयातून हा कलाप्रकार सादर केला जातो. कलाकाराने वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे धारण करून संगीताच्या अभिव्यक्तीच्या आधारे गोष्ट सादर करणे असे याचे स्वरूप आहे. यामधे आपले भाव अणि मुद्रा यांच्या समन्वयाने पौराणिक कथेचे सादरीकरण तांडव प्रधान नृत्यशैलीच्या आधारे केले जाते.प्रामुख्याने रामायण, महाभारत आणि विविध पुराणे यातील कथा या नृत्याच्या माध्यमातून सादर करण्याची परंपरा आहे.[१]

इतिहास[संपादन]

सतराव्या शतकात दक्षिणेतील नर्तक केरल वर्मा यांनी आज प्रचलित असलेल्या या नृत्याचा विचार मांडला. महाकवी वल्लथोल यांना या कलाप्रकाराच्या पुनरुज्जीवनाचे श्रेय दिले जाते.मूक अभिनयातून सादर होणारे व्याख्यानात्मक संगीत नाटक असे याचै स्वरूप प्रचलित दिसते.[२]

प्रसिद्ध कलाकार[संपादन]

शंकरन् नंबुद्रीपाद,गोपीनाथ, कनक रेळे, कृष्णनकुट्टी हे या शैलीचे प्रसिद्ध कलाकार आहेत.

चित्रदालन[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b "कथकली नृत्य - भारतकोश, ज्ञान का हिंदी महासागर". bharatdiscovery.org. 2020-09-29 रोजी पाहिले.
  2. ^ डाॅॅ.गर्ग सत्यनारायण, संगीत विशारद, 1994