अरुण जाखडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अरुण जाखडे हे एक मराठी ग्रंथप्रकाशक आणि लेखक आहेत. पद्मगंधा ही त्यांची प्रकाशनसंस्था. गणेश देवी, रा.चिं. ढेरे, व.दि. कुलकर्णी अशा मराठीतील अनेक लेखक-संशोधकांचे ग्रंथ त्यांनी प्रसिद्ध केले आहेत. विविध वृत्तपत्रांतून त्यांनी पाच वर्षांहून अधिक काळ सातत्याने लेखन केले आहे. त्यांच्या संपादकत्वाखाली 'पद्मगंधा' आणि 'आरोग्य दर्पण' हे दिवाळी अंक निघतात.

बालपण आणि शिक्षण[संपादन]

अरुण जाखडे यांचे गाव लहान होते. गावात पोस्टमन, शाळा, दवाखाना, एस.टी. वगैरे वगैरे काहीच नव्हते. त्यामुळे त्यांचे बालपणच नव्हे तर वयाची वीस वर्षे रानावनांत भटकण्यात, काट्याकुट्यातून चालण्यात, नद्या-ओढ्यांत बागडण्यात गेली. हायस्कूलसाठी थोड्याशा मोठ्या गावात ते गेले, बोर्डिगमध्ये राहिले. त्यांचे माझे महाविद्यालयीन शिक्षण अहमदनगर येथे झाले. एफ.वाय.बी.एस्‌सी.नंतर त्यांना नैराश्य आले आणि शिक्षणाला रामराम ठोकून ते कायम वास्तव्यासाठी गावी पततले. एक वर्षाने आईची भुणभुण टाळण्यासाथी ते परत नगतच्या काॅलेजात दाखल झाले. त्या एका वर्षात निसर्गातच नाही तर माणसे, कुत्री, जनावरे, पशुपक्षी यांच्यातही ते रमले. त्यांच्या या अनुभवाचा फायदा त्यांना 'इर्जिक' लिहिताना झाला.

नोकरी[संपादन]

बी.एस्‌सी. झाल्यावर अरुण जाखडे 'कायनेटिक इंजिनिरिंग'मध्ये नोकरीला लागले. काही काळाने कायनेटिक सोडून ते 'कायनेटिक' सोडून 'ड्रिल्को मेटल कार्बाईड'मध्ये आले. मेटलर्जीच्या परीक्षा देणे शक्य व्हावे म्हणून 'ड्रिल्को' सोडून १९८२ साली ते पुण्याला 'बजाज टेम्पो'त आले. कारखान्यातील कामगारांचे साहित्य प्रकाशित करण्यासाठी अरुण जाखडे यांनी १९८८ मध्ये ‘पद्मगंधा’चा पहिला दिवाळी अंक काढला.


अरुण जाखडे यांनी लिहिलेली/संपादित केलेली पुस्तके[संपादन]

 • इर्जिक (लोकसत्तेतल्या पहिल्या वर्षी दर महिन्याला एकदा आणि दुसऱ्या वर्षी महिन्यातून दोनदा प्रकाशित होणाऱ्या स्तंभलेखनातील लेखांचा संग्रह)
 • धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज
 • पाचरुट (कादंबरी)
 • पावसाचे विज्ञान (बालसाहित्य)
 • People's Linguistic Survey of India, दुसरा भाग - The Languages of Maharashtra - १७वा खंड (इंग्रजी, सहलेखक : गणेश देवी)
 • प्रयोगशाळेत काम कसे करावे
 • भारताचा स्वातंत्र्यलढा
 • भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण
 • विश्वरूपी रबर
 • शोधवेडाच्या कथा
 • हुसेनभाई बाताड्या (कादंबरी)

अरुण जाखडे यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान[संपादन]


(अपूर्ण)