चर्चा:भारतीय संस्कृती

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@माहितगार हा लेख इंग्रजीतून घेतलेला दिसतो. विकी मानकानुसार मूळ मराठीतून लेख नीट लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे.आर्या जोशी (चर्चा) @माहितगार: ह्या लेखाचे स्वरूप नेमकेपणाने नाही. ते नव्याने मांडते आहे. त्यासाठी साचा लावून काम करीत आहे.आर्या जोशी (चर्चा)

@ज्ञानदा गद्रे-फडके: नमस्कार ! मी सुरुवात केली आहे. जमेल तसे करते. तुम्हीही भर घालायला हरकत नाही.आर्या जोशी (चर्चा)

@अभय नातू: , @माहितगार:, @वि.नरसीकर: नमस्कार ,सदर लेखात इंगजी कॉपी पेस्ट मजकूर भरपूर होता. तो मी काढला आहे. तथापि असा मजकूर संपादन करताना स्वीकारला कसा गेला असा प्रश्न मला पडला आहे.आर्या जोशी (चर्चा)

{{साद|आर्या जोशी},
सर्वप्रथम, असा मजकूर घालवल्याबद्दल धन्यवाद.
मराठी विकिपीडियावर लिहिला जाणारा सगळा मजकूर तपासण्यासाठी प्रचंड मनुष्यबळ लागते. आपण सगळेच स्वयंसेवक असल्याने प्रत्येक दिवशी प्रत्येक संपादन तपासण्यासाठी कोणीतरी उपलब्ध असेलच असे नाही. तरी नवीन सदस्यांकडून अनवधानाने किंवा संकेत माहिती नसल्याने असा मजकूर येणे शक्य आहे. दिसल्याक्षणी असा मजकूर घालवणे हे श्रेयस्कर.
अभय नातू (चर्चा) १८:४९, २० नोव्हेंबर २०१७ (IST)[reply]