भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका म्हणजेच शालिवाहन शके पंचांग ही भारताची अधिकृत राष्ट्रीय दिनदर्शिका आहे. भारतीय राजपत्र, भारतीय आकाशवाणीने प्रसारित केलेल्या बातम्या, भारतीय संसदेच्या कामकाजात याचा वापर केला जातो. भारताबरोबरच जावा व बाली येथील इंडोनेशियन हिंदू याचा वापर करतात. बालीमधील हिंदू नेपी(Nyepi) हा नववर्ष दिवस साजरा करतात. नेपाळमधील नेपाळ संवत या दिनदर्शिकेची निर्मिती भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेपासूनच झाली.

दिनदर्शिकेचे स्वरूप[संपादन]

ही दिनदर्शिका सौर दिनदर्शिका आहे. तिची सुरवात ग्रेगरीयन दिनदर्शिकेतील २१ मार्च या दिवशी (तिच्या स्वतःच्या लीप वर्षात २२ मार्च रोजी)होते. हिंदू कालगणनेतील महिन्यांची नावेच या दिनदर्शिकेत कायम ठेवण्यात आली आहेत. ते वगळता तिच्याशी या दिनदर्शिकेचे काहीही साधर्म्य नाही.