महिना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एका महिन्यात सर्वसाधारण ३० दिवस असतात.

अरबी किंवा युरोपियन महिन्यांच्या तुलनेत भारतीय हिंदू महिने अधिक अचूक आणि वैज्ञानिक आहेत.

हिंदू किंवा भारतीय महिने[संपादन]

 • चैत्र
 • वैशाख
 • ज्येष्ठ
 • आषाढ
 • श्रावण
 • भाद्रपद
 • आश्विन
 • कार्तिक
 • मार्गशीर्ष
 • पौष
 • माघ
 • फाल्गुन

हिंदू महिने हे हिंदू सणांच्या सोईसाठी आहेत. हिंदू महिन्यातील विशिष्ट तिथीला विशिष्ट सण येतो. हिंदू महिने हे चंद्राच्या पृथ्वीभोवती होणार्‍या प्रदक्षणेवरून ठरवले जातात. त्यामुळे ही चांद्र कालगणना आहे. साधारणपणे दर तीन वर्षांनी एका अधिक महिन्याची भर घालून हिंदू महिने सौर कालगणनेच्या बरोबरीला आणले जातात. हिंदू पंचांगातला मकरसंक्रांत हा सण सौर पद्धतीचा आहे.

भारत सरकारने राष्ट्रीय पंचांग बनवताना हिंदू महिन्यांची नावे वापरली आहेत.

ख्रिस्ती महिने हे पृथ्वीच्या सूर्याभोवती होणार्‍या प्रदक्षणेवर आधारलेले आहेत. अर्थात ते सौर महिने आहेत.

ख्रिस्ती किंवा युरोपियन महिने[संपादन]

 • जानेवारी
 • फेब्रुवारी
 • मार्च
 • एप्रिल
 • मे
 • जून
 • जुलै
 • ऑगस्ट
 • सप्टेंबर
 • ऑक्टोबर
 • नोव्हेंबर
 • डिसेंबर

मुसलमानी किंवा अरबी महिने[संपादन]

 • मोहरम
 • सफर
 • रबिउल अव्वल
 • रबि उस्सानी
 • जमादिल अव्वल
 • जमादुस्सानी
 • रज्जब
 • शाबान
 • रमजान
 • शव्वाल
 • जिल्काद
 • जिल्हेज

मुसलमानी महिने हे हिंदु महिन्यांप्रमाणेच चांद्रमानावरून ठरवले जातात. पण हिंदू महिन्यांप्रमाणे अधिक महिन्याची व्यवस्था नसल्याने मुसलमानी महिने सौर कालगणनेच्या मागेमागे पडत जातात.

पारशी महिने[संपादन]

 • फारवर्दिन
 • आर्दीबेहेस्त
 • खोर्दाद
 • तीर
 • अमरदाद
 • शेहरेवर
 • मेहेर
 • आबान
 • आदर
 • दए
 • बहमन
 • स्पेन्दामर्द

पंजाबी तथा शीख महिने[संपादन]

 • बैसाख
 • जेठ
 • हाड
 • सावन
 • भादो
 • असू
 • कत्तक
 • मगर
 • पोह
 • माघ
 • फागुन
 • चेतWiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.